Bluepad | Bluepad
Bluepad
द्वंद्व
Shubham Kokale
Shubham Kokale
22nd Jul, 2020

Share

रणांगण आज उफाळून पेटलय,
अघटित भावनांचा कल्लोळ,
माजलाय विचारांच्या संभ्रमात,
पण तलवार निशब्द आहे,
बेभान वैर जुंपलय,
बुद्धीच्या सामर्थ्याचं मनाच्या गुढतेशी,
ढीग पडलाय प्रश्नांचा पण,
अवशेष ही सापडत नाही उत्तराचा,
असह्याय होतय हे सगळं आता,
अलगद निसटत चाललाय लगाम माझा,
हाच तर रथचक्र आहे जीवनाचा,
अपराधी मात्र शरीर आहे,
त्याला मृत्यू हाच शाप मिळालेला...!

द्वंद्व

7 

Share


Shubham Kokale
Written by
Shubham Kokale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad