Bluepadमौन ..... मननं....आणि मी....
Bluepad

मौन ..... मननं....आणि मी....

डॉ अमित.
डॉ अमित.
22nd Jul, 2020

Share

मौन ..... मननं....आणि मी....


मध्यंतरी अश्याच काही ओळी वाचण्यात आल्या होत्या...
दुःख तो तब हुआ जब
उन्होंने पूछा कैसे हो
हमने कहा अच्छा हूं और
वो मुस्कुरांके चले गये....


आज या ओळी प्रकर्षाने आठवण्याचे कारण की आज सकाळी सकाळी माझ्या मित्राने मला सांगितले की तू सध्या जे लिहितोय ते थोडे नकारात्मक छटा असलेले...तू सकारात्मक लिहीत जा....या त्याच्या मेसेजने मला माझे सध्याचे लिखाणं पुन्हा वाचण्यास भाग पाडले...आणि हो तो खरेचं सांगत होता...
त्याने जणू माझे मनचं माझ्या लिखाणातून वाचले.फक्त कसा आहेस मित्रा...ठीक असे ऐकून तो गप्प नाही बसला...
अधून मधून इतक्यात माझ्या लिखाणात नकारात्मकता दिसून येत होती...नव्हे ती उठून दिसत होती.मी जाणून बुजून तसे लिहितोय अश्यातला भाग नव्हता पण शब्दं वेगळे रूप घेऊन कागदावर उमटतं होते....
असे म्हणतात की मनातं जे असते ते एक तर चेहर्यावर उमटतय...किंवा माझ्या बाबतीत ते कागदावर उमटतय...याचा अर्थ मनाने मी नकारात्मक विचार करतोय की अजुन काही यातून व्यक्त होतय....
कदाचित मागील चार पाच महिन्यात जे काही माझ्या सोबत झाले आहे त्याचाच हा अदृश्य परिणाम आहे की काय..मला कळत नाही..
तसे फार काही मोठे नाही झाले...पण गेल्या काही महिन्यात अचानक माझा आवाज मला हळू हळू करत अलविदा करत होता...अशी एक वेळ आली होती की तो पूर्ण बंद झाला होता...
मग त्यासाठी स्वर यंत्राचं एक छोटंसं ऑपरेशन करावे लागले...त्यानंतर सध्या तरी आवाज व्यवस्थित आहे....
पण या काही दिवसात मौन... मननं..यांच्याशी माझी भलतीच गट्टी जमली...
मी मध्यंतरी सद्गुरू यांचे काही विचार ऐकले होते ते म्हणतात की माणूस दिवसभरात बऱ्याच गरज नसलेल्या गोष्टी बोलतो...त्यातल्या जवळ जवळ साठ टक्के गोष्टी निरर्थक असतात..
आपल्या आयुष्यातले बरेच प्रॉब्लेम्स हे आपण असे बोलणे टाळून किंवा काही वेळ मौन धरून नक्कीच टाळू शकतो..हे त्यांचे विचार खरंच मनाला पटतात..
जेंव्हा आपण कमी बोलतो ना तेंव्हा आपोआपचं आपला स्वतःशी संवाद सुरू होतो...आपण नव्याने पुन्हा आपल्या स्वतःला ओळखू लागतो..
मनाची ताकत तर आपल्या सर्वांना माहीत असतेच पण मौनाची ताकत ही खूप अफाट असते...याची आपल्याला जाणीव होऊ लागते.


मौन.... मनात मला म्हणाले हळूचं
कशी वाटतं आहे माझी संगत
मी फक्त हसलो त्याच्याकडे पाहून
मनातून खूप खुशं होऊन
तो म्हणाला बोलू नकोस मौन आहे
तुझा चेहराच मला सांगतो आहे
आता तुझी माझी जोडी जमली म्हणून..


तेंव्हा हे मौन माझ्या शब्दांनाही...सकारात्मकता देऊन मला माझ्या आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांना सामोरे जाण्यास मनाने खंबीर करेल...आणि हे मननं माझी मनाची ताकत वाढवून...माझ्या लिखाणाला एक मार्गदर्शक...सकारात्मक...प्रेरणादायी ठरवेल हीच मनापासून इच्छा व्यक्त करून इथे शब्दांचे मौन मी घेतो...
म्हणजे हा लेख इथेच संपवतो...

क्योंकि...

जो तुम्हारे मौन का अर्थ नहीं समझं सकता.....
वो तुम्हारे शब्दों का अर्थ भी नहीं समझं सकता...


डॉ अमित.

19 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad