Bluepadअब ले तू सता जिंदगी.......
Bluepad

अब ले तू सता जिंदगी.......

डॉ अमित.
डॉ अमित.
21st Jul, 2020

Share

अब ले तू सता जिंदगी.......नुकताच आयुष्यमान खुराणा अभिनित बाला....हा चित्रपट पाहण्यात आला.
तरुण वयात डोक्यावरचे केस गळून टक्कल पडलेल्या ' बाल मुकुंद ' या युवकाची यौवनात होणारी मनाची घालमेल या चित्रपटात अतिशय उत्तम रित्या दर्शविण्यात आली आहे.

जीवन कुठल्याही क्षणी अनपेक्षित वळण कसे घेते आणि आपण त्या वळणावर कसे चक्रात अडकल्यासारखे होतो...मग सुरू होते त्यातून बाहेर पडण्यासाठीची धडपड...पण कधी कधी कितीही धडपड केली तरी त्या चक्रव्युव्हातून बाहेर पडणे अवघड होवून जाते ..आणि ती धडपड मग केविलवाणी वाटावयास लागते....पण जेंव्हा आपण परिस्थिती ला स्वीकारतो,तेंव्हा हा सगळा मनाचा खेळ आहे असे वाटू लागते...आपण कळत नकळत स्वतःहूनच आहे त्या स्थितीत आनंदी राहू लागतो.

याचा अर्थ असा होत नाही की आपण अवघड परिस्थिती आहे तशीच स्वीकारायची.
ती बदलण्यासाठी काहीच करायचे नाही...
जेंव्हा आपण त्या परिस्थितीला स्वीकारून जीवन जगतो तेंव्हा आपोआपच आपल्याला काही नवीन कल्पना, नवे उपाय सुचू लागतात...
कारण जेंव्हा मनात कुठलेही न्यू'न नसते तेंव्हा 'न्यू' म्हणजे नवीन विचार उमलू लागतात, सुचू लागतात.
"अब ले तू सता जिंदगी...
माफ तेरी खता जिंदगी..."


या फक्त या चित्रपटातील गाण्याच्या ओळी नाहीत तर या आहेत न डगमगता,न हारता जीवनाला सामोरे जाण्याचा,समस्येशी दोन हात करण्याचा छोटासा मंत्र.
हे जे झाले किंवा जे विपरीत घडले ते माझ्या सोबतच का?हा विचार करणे,जीवनाला दोष देणे जेंव्हा आपण सोडून देतो तेंव्हा जीवन ही आपल्याला त्या बदल्यात संधी- 'प्रकाश वाट' दाखवत असते.
कारण जीवनात येणाऱ्या अडचणी...समस्या या कधीही फक्त एकट्या येत नाहीत....त्या आपल्या सोबत नवीन संधीही घेवून येतात.त्या संधीला ओळखून त्याचे सोने करणे हे आपल्या हातात असते.

तू ओळखून घे हे जगण्याचे नवे तराणे
डगमगू नको नको विसरू हिम्मतीचे गाणे
संकटातही तू शोध संधी करून टाक तिचे सोने
जिंदगी जिंदादिली आहे नको शोधू बहाणे

मनाला ठेव काबूत मानण्यात आहे सुखी होणे
प्रत्येक क्षण हसून जग सुख-दुःख येणे जाणे
डॉ अमित.


15 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad