Bluepadपिझ्झा
Bluepad

पिझ्झा

सायली वर्तक
19th Jul, 2020

Share

"पिझ्झा"


अगदी संथ गतीने का होईना पण हळूहळू आपल आयुष्य आता पूर्वपदावर येऊ लागलं आहे. या lockdown च्या काळात खरतर खूप जणांनी वेगवेगळ्या अडचणींचा सामना केला पण जीवनाच एक वेगळच रूप आपण अनुभवल शाश्वत अशाश्वतेचे हिंदोळे या काळात आपण सगळ्यांनीच घेतले आहेत.
Lockdown म्हणजे कॉफीशॉप ,रेस्टॉरंट सगळच बंद यात सगळ्यात जास्त मी काही miss केल असेल तर ते म्हणजे माझा आवडता "पिझ्झा" जेव्हा पार्सल सेवा सुरू झाली तेव्हा सगळ्यात आधी मी पिझ्झा ऑर्डर केला जेव्हा तो finally माझ्या हातात पडला तेव्हा 'इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है.' हा शाहरूख चा डायलॉगच आठवला
ब्लॅक ऑलिव्ह, कॉर्न,ओनीअन्स, भरपूर चीज आणि मेयोनीज आणि पनीर चे टॉपिंग्ज बस और क्या चाहीये !.खूप दिवसांनी खाल्ल्याने खाण्याची लज्जत अजूनच वाढली होती
तर असा हा pizza माझ्यासारखेच अजून कितीतरी ह्याचे जबर फॅन आहेत.
चौकोनी खोक्यात पॅक होऊन हा गोलाकार पिझ्झा आपण त्रिकोणी आकारात cut करून खातो अगदी तसच क्ष वर्षांचं आयुष्याच चौकोनी box देव आपल्याला देऊन जातो त्यात आपण आपल एक circle तयार करतो यात आपले आईवडील, भावंड, नातेवाईक , मित्रपरिवार colleagues या सगळ्यांची कक्षा स्वतः भोवती आखून घेतो आणि त्याचे 7-8 तुकडे म्हणजे शिशु अवस्था,बालपण, किशोर, कुमार, तारुण्य, प्रौढत्व आणि वार्धक्य ह्या आयुष्याच्या अवस्थाच नाहीत का.
कधी कधी एखादा piece खाताना थोडे टॉपिंग्ज कमी येऊ शकतात कधी चीज कमी जास्त येऊ शकते कधी चिलीफ्लेक्स जास्त आल्यामुळे जीभ भाजू शकते पण अस असल तरी आपण पिझ्झा खात खात enjoy करायचा विसरत नाही मग आयुष्याची एखादी अवस्था, अगदी काही वर्षे , महिने अगदी काही दिवस मनासारखे, आपल्याला हवे तसे जगता आले नाही तर अख्ख आयुष्य आपण enjoy करायच का सोडून देतो काय माहीत कदाचित पुढच्या piece मध्ये देवाने भरभरून दिल असाव.
जस पिझ्याच्या प्रत्येक piece मध्ये मेयोनीज,चिलीफ्लेक्स,ऑरिगेनो,टोमॅटो केचप आपल्या आवडीनुसार टाकून त्याची चव अजून वाढवतो तसच आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर वेगळा छंद, कला जोपासून ध्येय निश्चित करून मुख्यतः स्वतःवर प्रेम करून स्वतः ला explore आणि develop करण्यातच खरी मजा आहे.
चला तर मग प्रत्येक क्षण एंजॉय करायला शिकूया कारण देवाने किती inches च्या आयुष्यरुपी बॉक्स मध्ये आपल्याला पाठवलं आहे माहिती नाही
सायली सुधीर वर्तक
19 july 2020

http://sayalivartakwriting.blogspot.com

https://www.facebook.com/मृदुगंध-110034530773753/

12 

Share


Written by
सायली वर्तक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad