तो पसरतोय...!
काळजी की भीती?
घरात बसून कर्तव्य बजावण्याची की,
मदतीचा हात पुढे करण्याची?
तो फोफावतोय...!
काळजी की भीती?
आपल्यातील देवदूतांची की,
मानवाने निर्माण केलेल्या संहाराची?
तो पसरतोय...!
काळजी की भीती?
पोटात नसलेल्या अन्नाची की,
पळून गेलेल्या भुकेची?
तो फोफावतोय...!
काळजी की भीती?
फाटक्या खिशाची की,
उद्याच्या जबाबदारीची?
वर्तमानाची की भविष्याची?