Bluepad | Bluepad
Bluepad
दखल...
Dr.Anil Kulkarni
Dr.Anil Kulkarni
18th Jul, 2020

Share

दखल.
भवतांल दखलपात्र गोष्टींनी भरलेल हवं. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये चांगलं वाचायला मिळायचं. घरात चांगली चांगली मोठी माणसे यायची, त्यांचे विचार ऐकायला मिळायचे.वाचन,गाणं, कौशल्य कुटुंबातच झिरपायचं. घराच्या exterior,interior पेक्षा घरातलं culture महत्त्वाचं असतं. घरातinternet आल पण intranet नाही. Mobile ला जोडणारे hotspot आहे,पण मने जोडणारे hotspot कुठे आहे.कुटुंबातून दखलपात्र गोष्टी गायब झाल्या.मालिका सुरू झाल्या. अभिनय सुरू झाले. मालिकेत माणसं जवळ येऊन बोलायला लागले, वागायला लागले पुन्हा तेच तिरस्कार, तेच छळ. पण हे सर्व आभासी. माझ्या नवऱ्याची बायकोच नाव माझ्या नवऱ्याच्या बायका ठेवायला हवं. बबड्या च्या आईने श्यामच्या आईला केव्हाच मागे टाकले आहे.रंग माझा वेगळा मध्ये रंग उधळणं चालूच आहे. आई कुठे काय करते? मध्ये बाई कुठे काय करते? हा प्रश्न पडतो आहे. विवाहबाह्य संबंधांना पूर आला आहे.मालिकेतली पात्रं जेव्हा दखल पात्र होतात तेव्हा घराला घर पण राहत नाही. वैचारिक दारिद्रता सहन करणारा समाजंच एक मालिका झाला आहे. कुणीच पेटून उठत नाही हीच एक एक शोकांतिका आहे.घरातली माणसे तशीच जखडून, अव्यक्त. मालिकेतल्या माणसांची काळजी करणारी. घरातल्यांना दुर्लक्षित करणारी.
मालिकेत माणसांना प्रवेश आहे. सोन्याचे भाव वाढलें पण सोन्यासारख्यां माणसांचे भाव घसरलें. जे कमावलं ते कुचकामी ठरत चाललंय. वैभव दारिद्र्यात जगायला भाग पाडत आहे.
असंख्य काम करणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्यांना घरात प्रवेश नाही. गावातल्या गावात नातेवाईकाकडे,लग्नाला प्रवेश नाही. अंत्यविधीला, मित्रांकडे प्रवेश नाही. निवृत्ती धारक, एकटे राहणारे यांच्याकडे कसलीच सोय नाही.जवळ एखाद मदत केंद्र, फोन नंबर की जिथे यांची सोय होऊ शकेल असं कुठे आहे?त्यांच्याकडे पैसा आहे पण मनुष्यबळ नाही, बाहेर जाता येत नाही, कोणी आणून देऊ शकत नाही. असंख्य लोक ज्यांचा उदरनिर्वाह भाजी, स्टॉल, वर ते चालवत आहेत. भिकारी, असहाय्य, वाहन नसलेले यांचं काय? इंटरनेट नसलेल्यांनी शिकायचचं नाही काय? अनेकांचे प्रश्न अनुत्तरित आहेत.लोकांचे प्रश्न मृत्यू बरोबर संपत आहेत.
मध्यमवर्गीयांना व्यक्त करायला समाज माध्यमे आहेत. सामान्यांचे काय? अनेक हुंकार दबलेले आहेत. अनेक स्फोट व्हायचे बाकी आहेत. अनेक दखल बेदखल झाले आहेत.श्रीमंत, मध्यमवर्गीयांना सगळंच आहे ,गरिबांना काहीच नाही.
अनेकांचे अस्तित्व केव्हाच दुभंगले आहे.
मानसिकरीत्या, शारीरिकरीत्या.
माणसे प्रेताबरोबर जगत आहेत , दिवस भरभरून जगणं सोडा,दिवस ढकलणं चालू आहे. धीर वाढवणारे असाह्य झालेत.Be positive म्हणणारे positive झालेत.
समीकरणें बदलतात तेंव्हा गणित सुटत नाही.गांभीर्य जेव्हा संपत तेंव्हा अस्तित्व ही संपतं.जे दृष्टी आड आहे त्याची आम्ही दखंलच घेत नाही. जीवन गोठतंय, मृत्यू वितळतोय. इतिहासातील वैभव काहीच कामाचं नसतं. इतिहास फक्त दखल घेण्यासाठी असतो. पुढची मजल गाठण्यासाठी प्रेरणा ठरू शकतो.
दखल..
सामान्यांचीही दखल घ्यायला हवी
दखल सौंदर्याचीच घेतली जाते
दखल यशाचीच घेतली जाते
दखल असामान्याचीच घेतली जाते
सामान्य ही दखलपात्र असतात
सामान्यात ही वेगळेपण, यशोगाथा असतात
माणसे जेव्हा बेदखल होतात तेव्हा अंधश्रद्धा, आत्महत्या हात जोडून तयार असतात
खोटा अभिनय करणाऱ्यांना लाखो लाईक्स मिळतात. त्यांनी जगावं म्हणून प्रार्थना केल्या जातात
घाम गाळून अभिनय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना trp नाही
दखलपात्र जीवनाचं परिमाण trp
बेदखल जीवनाच परिमाण rip
आता मृत्यूचे सोहळे ही बंद झालेत
शेवटचे हक्काचे चार खांदे ही आता दुर्मिळ झाले आहेत
माणसा आधी माणुसकी संपत आहे
आता वैभवाचे ही परिमाण बदलतील. आस्वादाचे ही परिमाण बदलतील
आता दोनच जाती ऑनलाईन आणि ऑफलाईन
wrap and rip एवढंच
अंत्यदर्शन ही बंद
नींदक आहेत म्हणून सृजनाला वाव आहे
साप शिडी च्या खेळात साप नैराशेच्या गर्तेत नेतो तर शिडी यशोशिखराकडे नेते
लहानपणी ससा आणि कासव यांच्या शर्यती ची गोष्ट ऐकली होती, ती मोठेपणी कामाला येतेय.
काहीच नसलं तरीही निवडुंगा सारखं विपरीत परिस्थितीत वाढता यायला हवं
कुठेही उगवता येतं, कुठेही वाढता येतं,स्वतःतून ही उमलता येतं हे भूछत्री कडे पाहून शिकता येतं
जे माणसांनी शिकवलं नाही ते विषाणू शिकवून गेले
नगण्य गोष्टी देखील दखल पात्र असतात.
सृजनाची व वेगळेपणाची दाखल घ्यावीच लागते
सामान्यातील असामान्यत्व शोधणे म्हणजेच दखल घेणं
डॉ.अनिल कुलकर्णी.
दखल...

15 

Share


Dr.Anil Kulkarni
Written by
Dr.Anil Kulkarni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad