Bluepadपूर्णत्वाचा ध्यास... नि गगनभरारी ची आस.
Bluepad

पूर्णत्वाचा ध्यास... नि गगनभरारी ची आस.

डॉ अमित.
डॉ अमित.
18th Jul, 2020

Share

पूर्णत्वाचा ध्यास... नि गगनभरारी ची आस."प्रार्थना अशी करा..की सर्व काही ईश्वरा'वर अवलंबून आहे...आणि 'काम ' असे करा की सर्व काही तुमच्यावर अवलंबून आहे...
खूप सुंदर अश्या या ओळी...जे असे सुचवितात की तुम्ही जे कराल ते तुमचे १०० टक्के देवून.. स्वतःला पूर्णपणे त्यात झोकून...
मग भले ती तुम्ही केलेली प्रार्थना असो वा तुम्ही करत असलेले कुठलेही काम..जेंव्हा तुम्हाला ते करताना पूर्ण मन लावून करण्याची सवय लागते तेंव्हा तुम्ही त्यात आपले सर्वस्व देत असता...भले त्यात तुम्हाला शेवटी यश मिळालेले असो वा तुम्ही यशा पासून थोडसं दूर राहिला असाल..
मी त्याला अपयश नक्कीच नाही म्हणणार,कारण तुम्ही ते मिळवण्यासाठी तुमच्या जीवाचे रान केलेले असते...तुमचे प्रामाणिक प्रयत्न त्यात गुंतलेले असतात..हेच प्रामाणिक प्रयत्न असतात जे तुम्हाला समाधान देवून जातात..भले यशाने हुलकावणी दिली असली तरी..

पण होते काय की जेंव्हा जेंव्हा तुम्ही एखादी गोष्ट..पूर्ण मन लावून केलेली असते तेंव्हा आपोआपच त्यात यश मिळण्याची शाश्वता अधिकच वाढलेली असते..ते काम तेंव्हाच पूर्णत्वाच्या दिशेने निघालेले असते...


मंजिल का क्या है.....दूर सही
पर नजरों मे तो है..
रास्ता मुश्कील़ सही...
पर मजबुत इरादों मे तो है....

मला वाटतं ३ इडियट प्रत्येकाने पहिलाचं असेल त्यातला नायक म्हणत असतो कामियाबी के पीछे मत दौडो काबिल बनो... कामियाबी अपने आप तुम्हारे पीछे दौडी चली आयेगी...
हेच ते काबिल बनने आहे म्हणजे स्वतःला सक्षम करणे आहे जे वेळ प्रसंगी तुम्हाला हवे तसे आतून बाहेरून बदलून आलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास शिकवते.
नुकतेच दहावी बारावी चे रिझल्ट्स जाहीर
झाले आहेत..यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे...या साऱ्या चमकणाऱ्या चेहऱ्या मागे काही असे चेहरे आहेत ज्यांनी कमी प्रमाणात यश मिळवले किंवा काही यशापासून दूर राहिलीत.
पण टक्केवारी म्हणजेच यश नव्हे हे जेंव्हा आपल्याला समजेल तेंव्हाच यशाची परिभाषा खऱ्या अर्थाने व्यापक होईल.
कालच एक आर्टिकल सदृश्य बातमी होती की एका तरुण ...फुलणाऱ्या कोवळ्या जीवाचा एन्काऊंटर...जो केला तुम्ही,आम्ही आणि आपल्या या समाजाने ज्याने फक्त टक्केवारी मध्येच यशाला सीमित केले आहे.नव्वद टक्के पेक्षा कमी मार्क्स मिळाल्याने समाजाच्या दृष्टीने त्या तथाकथित हुशार नसलेल्या मुलाने आपला जीव दिला....
का होतं असावं असं?आपण मुलांना इतकं कमजोर बनवतो आहोत का?का आपणच मुलांना अवाजवी अपेक्षांच्या ओझ्याखाली गुदमरून टाकत आहोत?
ऊन, वारा,पाऊस..कधी कधी वादळे...यांचा सामना करून तर शेतात पिके डौलाने उभी राहतात... अशी पिकेचं तर जास्त दाणेदार,फलदायी असतात.म्हणून तर आपण आपल्या मुलांनाही संकटाला न घाबरता त्यांच्याशी दोन हात करण्याचे बळ द्यावे...मनाने खंबीर करावे..पूर्णत्वाचा ध्यास द्यावा,गगनभरारी चे वेड द्यावे..गगन भरारी......🕊️🕊️🕊️🕊️🕊️पंखात तुझ्या बळ स्वप्नांचे
श्वासातं तुझ्या विश्वासं
मनातल्या इच्छेची आस
करण्या पूर्ण घे भरारी तू या नभातं

सोबतीला घे तू खंबीर साथ
मैत्री असो वा असो
नात्यातले अमूल्यं प्रेमं खास
एकमेकां संगे घे भरारी तू या नभातं

लक्ष्यं नेहमी ठेव मोठे
संकटाला नको देवूस तू पाठ
करून सामना धीराने त्याचा
मात करूनी घे भरारी तू या नभातं

धीर नको सोडू कधीच
भले लाख अडचणी येतील जीवनातं
या सुवर्णरुपी जीवनाला
तावून सुलाखून घे भरारी तू या नभातं

तूच आहे शिल्पकार जणू
तुझ्या जीवनाचा नि मनाचा
होवून स्वार या बेभानं मनावर
गवसणी घालण्या घे भरारी तू या नभातं

सिंहावलोकन करूनी जीवनाचे
जात रहा पुढे पुढे सदोदित
ठेवुनी श्रद्धा कर्त्या ईश्र्वरावरं
ध्येयं गाठण्या घे भरारी तू या नभातं

गरुडानांही लाजवेल ही तुझी भरारी
झुकेल दुनिया तुज समोर सारी
होईल आकाश ही ठेंगणे तुला
जिद्दीने पेटून घे भरारी तू या नभातं..


तेंव्हा मित्रांनो... कशी वाटली तुम्हाला ही गगनभरारी ची आस?आवडली ना?नक्की सांगा,कारण तुमचे आवडल्याचे दोन शब्द माझ्या लिहिण्याला नवी प्रेरणा देतात,माझ्या लेखणीला पूर्णत्वाचा ध्यास देतात...😊🙏
डॉ अमित.

19 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad