Bluepadयेथे यश भाड्याने मिळेल.....अमर्यादित काळासाठी.
Bluepad

येथे यश भाड्याने मिळेल.....अमर्यादित काळासाठी.

डॉ अमित.
डॉ अमित.
17th Jul, 2020

Share

येथे यश भाड्याने मिळेल.....अमर्यादित काळासाठी.

अरेच्चा हे काय लिहिले आहे मी?ते ही शीर्षक.
( आणि हो ही काही पुणेरी पाटी पण नाही...खोचकं लिहायला....) ....
हो अगदी हेचं म्हणायचे आहे मला...

"येथे यश भाड्याने मिळेल"...

कारण असेच मध्यंतरी काही ओळी वाचण्यात आलेल्या होत्या....ज्यात लिहिले होते की यश यावर कोणाचाही मालकी हक्क नसतो...एक वेळ यश मिळवणे सोपे....पण ते टिकवणे खूपचं अवघड असते...एकदा का माणूस यशाच्या शिखरावर
चढला की त्याचं वेळी त्याची घसरण चालू होते...तिथेच तर खरी कसोटी असते त्याची...ते यश डोक्यात न जावू देता त्या वेळी डोक्याने...म्हणजे बुध्दीने...परिश्रमाने...आणि मेहनतीने यशावर स्वार होवून त्याचा आस्वाद घेत राहण्याची....

तर मुद्दा हा आहे की यश जेंव्हा भाड्याने मिळेल असे म्हणतो तेंव्हा त्याला भाडं काही ना काही तरी द्यावेच लागते...ते भाडं हे पैश्यांच्या रुपात नसून ते आहे तुमची जिद्द,कठीण परिश्रम,मेहनत,चिकाटी...ज्यामुळे तुम्हाला मिळवलेले यश टिकवता येईल..
तरीही आपण त्या यशाची मालकी कायम स्वरुपी आपल्या कडे ठेवू शकत नाही...आज ना उद्या हे यश आणखी इतर कोणाचे तरी असू शकेल..तेंव्हा मग एखादी मालकी हक्क नसलेली गोष्ट तिचा आपण गर्व कधीही करू नये.


कामियाबी का सिरा जो सर पर लेके मै चला
जलने वाले मिले मुझे धूप से भी ज्यादा ...

यशाचे कौतुक जेवढे होते किंबहुना त्याहून ज्यास्त त्याचा,ते मिळवणाऱ्याचा मत्सर ही होतो हे ही तितकेच खरे..आपल्याकडे कोणी पुढे जात असेल तर त्याला प्रोत्साहन देण्यापेक्षा त्याला खाली खेचण्यातच काही जण धन्यता मानत असतात.


इतनी धूप है मेरे शहर मे
फिर भी
लोग धूप से नहीं
मुझसे जलते है....

या सर्व गोष्टींचा विचार करता यशाला अनेक गोष्टींचा,संकटाचा सामना करावा लागतो..ही संकटे फक्त बाहेरीलच असतात असे नाही..
बऱ्याच वेळा यशाची गुंगी माणसाला स्वत:ला चढते...यशाची हवाच जणू त्याच्या डोक्यात जाते.
मग हा यशस्वी माणूस कधी कधी बेलगाम,बेताल वागू लागतो.आपल्या पुढे इतरांना तुच्छ लेखू लागतो.
आणि त्याच वेळी त्याची यशाच्या शिखरावरून घसरण सुरू होते.

बडी मुद्दतो के बाद, मुश्कील से
हासिल हुयी थी वो...
कामियाबी जिसे कहते है लोग
सर झुकाये उसका सन्मान करो
वरना देर नही लगती
उसे रुठ जाने मे...

आपल्या कडे काही सुंदर असे दृष्टांत आहेत..

प्रयत्नांती परमेश्वर...
रगडता कण वाळूचे ...तेलही गळे.

ह्या फक्त म्हणी नसून या आहेत जीवनाला
यशाकडे खेचून नेणाऱ्या लहरी.यांचा प्रत्येकाने रोजच्या जीवनात अंमल केला तर त्याला कोणीच यशा पासून दूर ठेवू शकणार नाही.
मेहमान बन के आयेगी वाे
मेहेरबान तुम पे हो जाएगी
कामियाबी जो दस्तक देगी
ज्यादा दिन ना वो रुक पायेगी..


तेंव्हा मिळालेल्या...नव्हे मिळवलेल्या यशाचा सन्मान करून जर प्रत्येकाने ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरच त्याची मालकी तुम्ही जास्तीत जास्त दिवस उपभोगू शकता....
हो की नाही?


डॉ अमित.

10 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad