BluepadथोD' खुशी- थोD मस्ती'.....बD जीत....
Bluepad

थोD' खुशी- थोD मस्ती'.....बD जीत....

डॉ अमित.
डॉ अमित.
16th Jul, 2020

Share

थोD' खुशी- थोD मस्ती'.....बD जीत....अरेच्चा मी हे काय आणि असे का लिहिलंय याचाच विचार करताय ना तुम्ही?अशीच थोD गंमत....पण मी या D च्या का मागे लागलोय उगीच?असाच विचार येतो आहे ना तुमच्या मनात?
आजकाल जमाना ३D आणि ४D किंवा काही ठिकाणी तर ९D पर्यंत पोहोचलाय....
पण खरं सांगू का तुम्हाला या D च्या भाउ गर्दीत आयुष्य जगताना उपयोगी पडणारे ३ D मात्र आपण विसरत चाललोय असं मला वाटतं आहे....
हे तीन महत्वाचे D कोणते तर मी म्हणेन

D...determination.. दृढनिश्चय,ध्येय

D...dedication...समर्पण

&

D... discipline....शिस्त

आपण आपले जीवन जगताना determination म्हणजे दृढनिश्चय,ध्येय खूप महत्वाचे आहे.जर ध्येयच नसेल तर आपण एखादी गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी,मिळवण्यासाठी धडपड करणार नाही,आपल्या जीवाचे रान करणार नाही.हे ध्येयच आपल्याला रोजच्या जीवनात आपले काम करण्यासाठी उत्स्फूर्त करत राहील....
पण नुसते ध्येय मोठे ठेवून भागणार नाही.ते ध्येय पूर्ण करताना त्यासाठी लागणाऱ्या कामात,प्रयत्नात dedication असणे खूप गरजेचे आहे.हेच dedication ज्याला आपण समर्पण असे म्हणतो हे कामासाठी चे समर्पण,निष्ठा ते केलेले काम उच्च श्रेणीचे होण्यास मदत करेल.
हे समर्पण जर आपले आयुष्य शिस्तबद्ध नसेल तर भरकटत जाईल...म्हणजेच आयुष्यात शिस्त discipline ही खूप गरजेची आहे.ही शिस्त कामाच्या बाबतीत असो,वेळेच्या बाबतीत असो किंवा आपल्या वागण्या बोलण्याच्या बाबतीत असो...शिस्त नेहमीच आपल्याला एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवते.
हे तीन D जर आपण आपल्या रोजच्या जीवनात अंगवळणी उतरवले तर नक्कीच आपल्याला चौथ्या D ची म्हणजेच डेस्टिनी ची साथ मिळेल आणि आपण D"ivine असे यश संपादन करू शकू...ज्याला आपण आपली सबसे बD जीत म्हणू शकू.पण बऱ्याच वेळेस आपण या ३D ला सोडून फक्त चौथ्या D वर म्हणजे डेस्टिनी, नशिबावर अवलंबून राहतो.... पण नशीब तेंव्हाच तुमचे सोबत असते जेंव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून आणि पूर्ण तळमळीने करता.
या तीन D शिवाय यशाची वेD आशा करणे मूर्ख पणाचे आहे.मी वाट चाललो एकटाचं
ध्येयाच्या वेडाने झपाटून
पावलां मागे पाऊल टाकतं
प्रयत्नांची शिकस्तं करत
स्वप्नपूर्तीची मनात आस घेवून
माझे मी पण त्याला अर्पून
तो यश देईल नक्की मला
आज हीच मनोकामना करून.

चला तर मग आपणही या ३D च्या शीD ने नक्कीच यशाचे शिखर काबीज करू आणि मग गुणगुणत छाती ठोकपणे सर्वांना सांगू की
अपना टाईम आयेगा.......,नव्हे अपना भी टाईम आयेगा.

टिप.... सदर लेखाचा आणि मागील वर्षी अमेरिकेत झालेल्या हाऊ D मोD या कार्यक्रमाचा कुठलाच संबंध नाही.असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

अफवांवर विश्वास ठेवू नका.आपले काम मन लावून प्रामाणिकपणे करा यश नक्कीच तुमचे आहे.


डॉ अमित.


14 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad