Bluepad | Bluepad
Bluepad
चला,आनंदी होऊ........चला,आनंद वाटू.
डॉ अमित.
डॉ अमित.
15th Jul, 2020

Share

चला,आनंदी होऊ........चला,आनंद वाटू.आज सकाळी आमचे चिरंजीव फार खुशीत होते....असणारचं कारण आज सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर....स्वारी जाम आनंदात होती...
बोलता बोलता त्याने सांगितले आज आम्ही बस मध्ये पार्टी करणार आहोत...मी म्हणालो वा! विचारले काय करणार पार्टी म्हणजे?
तेंव्हा तो म्हणाला आम्ही काही मित्र स्नॅक्स घेऊन जाणार आहोत..आणि येताना ते सर्व जण मिळून बस मध्ये एकत्र खाणार आहोत..स्नॅक्स आणि तेही बाहेरच्या पॅकेट बंद प्लॅस्टिक मधले म्हटले की माझ्यातला डॉक्टर त्याला सांगू लागला की असलं बाहेरचं खाऊ नये...वगैरे वगैरे... त्यानेही समजूतदार पणे तो विषय तिथेच संपवला...
मी त्याला बस पर्यंत सोडण्यास गेलो....
बस यायला थोडा उशीर होता....मी जाताना आवर्जून थोडे पैसे सोबत घेतले होते...(त्याला न सांगता हळूच..) बाहेर पाऊस होता म्हणून छत्रीही घेतली सोबतीला.
बस येई पर्यंत चल आपणं तुझ्या बस-पार्टी साठी काही स्नॅक्स घेऊ... त्याला असे मी म्हणालो आणि असे म्हणताचं त्याचा चेहरा जो काही खुललां आनंदाने त्याला तोडचं नाही.....
पाऊस लागू नये म्हणून
वर डोक्यावर धरली छत्री होती
तरीही भिजलो मी मनातून चिंब
आनंदाची हीच तर खात्री होती


पप्पा, आज न मागताच तू कसे काय घेऊन दिलं मला स्नॅक्स?मी आपला म्हणालो आवडलं ना माझं सरप्राइज?तो म्हणाला खूपचं आवडलं..

तसं गोष्टं एकदम साधी नि रोजच्याचं जगण्यातली...पण हीच तर खरी गंमत आहे...आनंद छोट्या छोट्या गोष्टीत शोधण्याची....
तो उपभोगण्याची...नाही का?
मी असं झालं की सुखी होईन...मी अमुक एक गोष्ट मिळाली आनंदी होईन.....पण तो मिळे पर्यंत गेलेला वेळ ..हरवलेला आनंद याचं काय?

रस्त्यावरच्या छोट्या छोट्या विक्रेत्याकडे ,भाजी मंडईतल्या भाजीवाली कडे घासाघीस न करता उलटा एखादा रुपया जास्त देऊन त्यांच्या कडून ती वस्तू घेऊन तर बघा....काय खुलतो त्यांचा चेहरा...न मागताचं वजनाचं तीचं पारडे थोडे जास्तचं झुकलेले असते.ते जास्तीचे जे मिळाले असते ना ते प्रेम असते ..तो आनंद भरभरूनं तिने त्या पारड्यात त्या वस्तूतं आपल्याला परत केलेला असतो....न्यूटन चा तिसरा नियमच तर आपल्याला सांगतो एव्हरी अँक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन...तेंव्हा आनंद वाटा आणि तो तितक्याच नव्हे त्याही पेक्षा कित्येक अधिक पटीने तो परत मिळवा....

चला शोधुया हा आनंद आपणं
छोट्या छोट्या रोजच्याच गोष्टीतं
करूया आनंदी किमान रोज एकाला
मिळवूया आनंद परत तोच शत-पटीतं.
तेंव्हा मित्रांनो काय वाटतंय तुम्हाला?
बरोबर सांगतोय ना मी?तुम्हीही हा अनुभव घेऊन तर बघा.....तुमच्या संपर्कात येणारा कोणीही असो...फक्त एक सुहास्य त्याला देऊन तर बघा....तुमच्यातला आनंदाचा आटत चाललेला झरा... बघा कसा पाझरू लागतो की नाही ते... हा आनंदाचा झरा तुमच्या जीवनाला चैतन्याची उभारी देतो की नाही ते.

गीत गाऊ आनंदाचे...
मनात दडलेल्या स्वप्नांचे
पैसा असो की नसो
गीत गातं राहू या जगण्याचे


गीत गाऊ आनंदाचे
एकमेकांवरील अव्यक्त प्रेमाचे
नात्यातली ओढ जपू हळुवारं
श्वासांना सुवास करून या सहवासाचे


गीत गाऊ आनंदाचे
स्वागत करू मित्रांच्या सोबतीचे
मैत्रीचं हे अनोखं ईत्र दरवळू
आसमंतात या क्षणों-क्षणीं मैत्रीचे

गीत गाऊ आनंदाचे
परस्परांवरील दृढं विश्वासाचे
विश्वास पानिपतात गेला
ठरवू खोटे अर्थ या नि असल्या म्हणीचे


गीत गाऊ आनंदाचे
अंतरीच्या सुखाचे नि समाधानाचे
देऊयात धन्यवादं त्या ईश्वराला
हा जन्म मानवाचा दिला या कृपेचे.डॉ अमित.


17 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad