Bluepadदखल...
Bluepad

दखल...

Dr.Anil Kulkarni
Dr.Anil Kulkarni
14th Jul, 2020

Shareदखल.
दखल सौंदर्याचीच घेतली जाते.
दखल यशाचीच घेतली जाते.
दखल असामान्याचीच घेतली जाते.
सामान्य ही दखलपात्र असतात.
सामान्यात ही वेगळेपण, यशोगाथा असतात.
माणसे जेव्हा बेदखल होतात तेव्हा अंधश्रद्धा, आत्महत्या हात जोडून तयार असतात.
खोटा अभिनय करणाऱ्यांना लाखो लाईक्स मिळतात. त्यांनी जगावं म्हणून प्रार्थना केल्या जातात.
घाम गाळून अभिनय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना trp नाही.
दखलपात्र जीवनाचं परिमाण trp
बेदखल जीवनाच परिमाण rip
आता मृत्यूचे सोहळे ही बंद झालेत.
wrap and rip एवढंच.अंत्यदर्शन ही बंद.
नींदक आहेत म्हणून सृजनाला वाव आहे.
साप शिडी च्या खेळात साप नैराशेच्या गर्तेत नेतो तर शिडी यशोशिखराकडे नेते.
लहानपणी ससा आणि कासव यांच्या शर्यती ची गोष्ट ऐकली होती, ती मोठेपणी कामाला आली.
काहीच नसलं तरीही निवडुंगा सारखं विपरीत परिस्थितीत वाढता यायला हवं.
कुठेही उगवता येतं, कुठेही वाढता येतं,स्वतःतून ही उमलता येतं हे भूछत्री कडे पाहून शिकता येतं..
जे माणसांनी शिकवलं नाही ते विषाणू शिकवून गेले.
नगण्य गोष्टी देखील दखल पात्र असतात.
सृजनाची व वेगळेपणाची दाखल घ्यावीच लागते.
सामान्यातील असामान्यत्व शोधणे म्हणजेच दखल घेणं.

डॉ.अनिल कुलकर्णी.

8 

Share


Dr.Anil Kulkarni
Written by
Dr.Anil Kulkarni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad