Bluepad | Bluepad
Bluepad
स्वप्न
मर्मस्पर्शी जीवन
मर्मस्पर्शी जीवन
14th Jul, 2020

Share

आज बरेच दिवसांनी तुमच्या समोर एक नविन लेख घेवून येत आहे. अनेक विषयांवर लेखन करुन ठेवले आहे परंतु आता ती वेळ नाही त्यांना तुमच्या समोर सादर करण्याची . अनेक दिवस झाले हा विषय लिहावा हे माझ्या विचारात होते. " स चे सप्तरंग " भाग १ मध्ये या वर थोडस भाष्य केल आहे, आज तेच भाष्य अजून थोड्या जास्त प्रमाणात होईल. या लेखात स्वप्नाकडे माझा पाहण्याचा दृष्टिकोण मांडेल व काही उदाहरणे देईल.....
अनेकांना स्वप्न पडतात किंबहुना सर्वानांचा, लहान पासून मोठ्या पर्यंत सगळेच या शब्दाशी परिचित आहेत. स्वप्न या शब्दावर काय लिहावं आणि किती याबद्दल जरा विचार करावा लागेल. स्वप्न हा आयुष्याचा अजोड भाग आहे . जसा प्रत्येक व्यक्ति हा श्वास घेण सोडत नाही तसच तो कधी स्वप्न पाहायची सोडत नाही. स्वप्न ही काय प्रकारची किमया आहे आज व कोणाला समजू शकल नाही. याला वैज्ञानिक दृष्टिकोण असेल स्वप्न का पडतात पण प्रत्येक व्यक्ति हे पाहत बसत नाही हे ही तितकेच खरे आहे. एक लहान मुलगा मला काही वर्षापुर्वी भांडण करताना दिसला. फार वात्रटपणा असलेला तो त्याच्या वयाची मुलं त्याच्या ऐवढी वांड नव्हती जितका तो होता. आणि जो दुसरा मुलगा भांडत होता (त्यांनी कधी तरी एखाद्या मोठ्या माणसाच्या तोंडून हे वाक्य ऐकलं असावं ) तो बोलला देव काय झोपला नाही बघतो तो तुझ्या स्वप्नात येवून तुला शिक्षा देईल .मला या भांडणातून हेच समजले मनुष्याला निर्माण करण्याआधी देव झोपला असेल आणि त्याला स्वप्न पडलं असेल आपण मानवाला बनवू. म्हणून श्वास आणि स्वप्न आपल्यापासून वेगळे होत नाही....
स्वप्न विश्व हे आपल्या प्रत्येकाच आहेच आज त्याच स्वप्ननगरीची सफर करुयात आणि तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता हे प्रतिक्रिया ( comment box ) मध्ये लिहा. पहिला प्रकार तसा फार सोपा आहे जे ख-या जीवना अनुभवता येत नाही , जे कधीच मिळू शकत नाही किंवा मिळवता येत नाही. कोणाला बोलता नाही अशा अनेक विविध रंगी गोष्टी पाहण्याचे ठिकाण म्हणजे हे स्वप्न आहे हा प्रकार सर्वाना लागू पडतो आणि अशा प्रकारचे अनेक स्वप्न तुम्हांला मला पडली आहेतच. परंतु दुसरा प्रकार जरा वेगळा आहे. अत्यंत महत्वपूर्ण जी स्वप्ने डोळे बंद करुन झोपेत पाहिली जातात परंतु ती सत्यात साकार करण्यासाठी संपूर्ण हयात निघून जाते या प्रकाराला मी ध्येयपुर्तीची किंवा उद्देशीय स्वप्न मी बोलतो. हा प्रकार सर्वाना मध्ये असेल अस काही नाही. यासाठी तुमच्या अमच्या आयुष्यात काही तरी ध्येय असाव लागत तेव्हाच ते पुर्ण होत. आणि ती एक नशा हवी की स्वप्ने जीवंत करता येईल याची त्यासाठी कमालीचा विवेकभाव व मेहनत लागते.....
तिसरा प्रकार हा जरा खाजगी, व्यक्तिगत भावनेचा नाजुकता असा आहे. तरुण तरुणी या स्वप्नाचे आदी असतात . कारण प्रेमाने ओथंबून वाहणारा आपल्या अगदी जवळ असणा-या व्यक्ति बद्दलची जवळीकता साधणारे स्वप्न जी गाढ झोपेतही सहवासाची अलगद किनार लाभलेला हा प्रकार काही औरच आहे. प्रेमात पडलेल्या कोणत्याही तरुण तरुणीला विचारा अशा अनेक भन्नाट स्वप्नाची रांग लागेल. हा जरा गंमतीचा विषय आहे यावर जास्त काही टिप्पणी नको.. आता चौथा प्रकार जरी शेवटला पण तितकाच हसायला लावणार. असा कोणी नसेल ज्यांने हे वाक्य ऐकल नसेल, तो कोण इतका महान व्यक्ति होता ज्यांने हे वाक्य अस्तित्व आणले हे मला आजवर समजले नाही. आणि ते महान वाक्य हेच " मनी वसे ते स्वप्नी दिसे " या ओळीतच त्याचे संपूर्ण मर्म सामावले आहे..... सुरुवातीला जो एक लहान वात्रटपणा ज्या मध्ये ठासून भसलेला तो एकदा माझ्याकडे येवून म्हणाला. दादा तुला काही तरी सांगायचे, मी बोललो सांग की . अरे मला खरं तर ताडोबा अभयारण्यात जायच होत वाघ पहायला पण माझी काल इच्छाच मेली .मी त्याला विचारलं का रे ?? तो बोलला की रात्री झोपलो तेव्हा मला एक स्वप्न पडलं मी ताडोबा मध्ये गेलो आहे आणि माझ्या समोर वाघ आला आणि माझा भ्रमनिरास झाला. का रे असं काय झालं ?? तो बोलला की अरे त्या वाघाच तोंड अगदी माझ्या वडीलांन सारखं होत आणि माझे वडील जसे घरात डरकाळी फोडतात तसेच त्यांनी पण फोडली मग मला समजले की रोज ज्यांना पाहतो तोच वाघ आहे. मग आता ताडोबा नको घरोबाच बरा....

असा हा वात्रटपणा, हा स्वप्न प्रकार संपूर्ण जगात दिसून येतोच. पहिले तीन प्रकार जरी व्यक्तिगत जीवनावर आधारित असतील मात्र हा शेवटचा अपरिहार्य आहे सर्वाना. विचित्र कल्पनाची सांगड घालणारा जे कधीच शक्य नाही किंवा ती गोष्ट अस्तित्त्वातच नाही अशा कोणत्याही विचार या प्रकारात दिसू शकतो. उदाहरण द्यावं तर मुंगीचा आकार डायनासोरस सारखा होतो मानसाला आठ पाय येणे याला परिसीमा नाही. काही असेही ज्यांना स्वप्न पडली की सांगण्याची भारी हौस असते. आणि समोरचा ऐकण्याच्या मनःस्थितीत नसेल तर झालंच. यात गंम्मत म्हणजे स्वप्नात अनेक वेळा लोक मेलेले दिसतात. यावर घरातील वयोवृद्ध उत्तर जे सांगतात ते तर अधिकच रंजक असतं. जो व्यक्ति स्वप्नात मरतो पण अस्तित्वात जीवंत असतो त्याच आयुष्य वाढणार आहे. अशी उत्तर मी ही ऐकली जर एखादा व्यक्ति मेला असेल तर तो स्वप्नात आला तर तो भूत बनून दिर्घ आयुष्यी होणार का ??? आशा एक ना अनेक समजूत आपल्याकडे आहेत पण असोत. अशी अनेक गंमतीदार खुसखुशीत उदाहरणं तुम्हांला मी देवू शकतो. पण आज इथेच थांबतो. आणि आशा करतो हा लेख तुम्हाला आवडला असेल याची तुम्हांला पडलेल अस एखाद गंमतीदार स्वप्न comment box मध्ये नक्की लिहा. तुमचा कोणाचा तरी अनुभव येणा-या लेखात समाविष्ठ करेल. उदाहरण म्हणून.
©️
● लेखक :- शुभम ज्योती चव्हाण ●
● संपर्क :- ९४०५८३१४३७ ●

24 

Share


मर्मस्पर्शी जीवन
Written by
मर्मस्पर्शी जीवन

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad