Bluepadबुद्धा...!
Bluepad

बुद्धा...!

Hemant Dinkar Sawale
Hemant Dinkar Sawale
29th Nov, 2021

Share

#बुद्धा...!

बुद्धा,
बरं झालं तुझे डोळे आहेत बंद
इथली अराजकता नकोचं बघायला
पण बंद डोळ्याआड कितीतरी विश्र्व चालत असतील
तू अनुभवत असशीलचं
आमचं जगणं मरणं
हसणं रडणं आणि बरंच काही...

तू शांतता प्रस्थापित केलीसं
पण खरं तरं तू होतास विद्रोही
पाण्याच्या संघर्षातून
युध्दाला नाकारलं कितीतरी पिढ्यांच्या अस्तीत्वासाठी
आणि त्याचं क्षणी झालासं बुद्ध....!

#हेमंत_दिनकर_सावळे...!

15 

Share


Hemant Dinkar Sawale
Written by
Hemant Dinkar Sawale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad