Bluepadहर रात की सुबह..... नई होती है.
Bluepad

हर रात की सुबह..... नई होती है.

डॉ अमित.
डॉ अमित.
14th Jul, 2020

Share

सध्याच्या corona पार्श्वभूमीवर...प्रेरणा देणारा..


हर रात की सुबह..... नई होती है.


इतक्यातच गाण्याच्या काही ओळी कानावर पडल्या....
रात कितनी भी दिलचस्प क्यों न हो...सुबह होना जरुरी है....

किती सहज आणि सुंदर आहेत ना या ओळी....गुणगुणतं जीवनाचं अख्ख सारचं सांगून जातात काही शब्दांत...

दिवस-रात्र.... सुखं-दुःख....प्रेम-राग....
गरिबी-श्रीमंती, विरह-भेट....हसणे-रडणे.... आंबट-गोड हार-जीत या जीवनातल्या परस्परविरोधी...नव्हे मी तर म्हणतो परस्पर पूरक अश्याच काही गोष्टी आहेत..ज्याद्वारे जीवनाचे समतोल निसर्गाने साधले आहे....
या बदलणाऱ्या परस्पर पूरक गोष्टीची सुंदर अशी एक कथा काही दिवसांपूर्वी वाचण्यात आली होती...
एक राजा आपल्या गुरु जवळ आश्रमात जातो आणि गुरूंना विनंती करतो की मला असा एकच मंत्र दे की जो मला जीवनात कुठल्याही प्रसंगी ती वेळ सहज तारून नेण्यास मदत करेल....
गुरु त्यांना एका पानावर काही ओळी लिहून देतात...
त्या अश्या...
"सब्र कर....ये वक्त भी बदल जायेगा."
राजा त्या ओळी आपल्या राजवाड्यात आपल्या नजरे समोर कायम राहतील अश्या ठेवत होता...
म्हणजे काही कठीण प्रसंग आला,दुःखाची काही घटना घडली की राजा त्या ओळी मनात स्वतःशीच म्हणत असे... आणि ही कठीण वेळही निघुन जाईल असे समजून नव्या उमेदीने राज्य कारभार करत असे...तसेच काही चांगल्या गोष्टी घडल्या... सुखाने न्हावून निघाला तरी त्या गोष्टीने उतून किंवा मातून न जाता...त्या वेळीही संयम दाखविण्यात त्या ओळी त्याला मदत करत असत...
किती समर्पक मंत्र दिला होता राजाला गुरूंनी...
हा मंत्र जर आपण कायम आपल्याही जीवनात आपल्या मनात जपला तरी आपले जीवनही असेच सुंदर आणि समतोल असलेले होवून जाईल.....सुखाच्या क्षणी ही आपले पाय जमिनीवरच असतील आणि दुखातही आपण एकदम खचून जावून धीर सोडणार नाही.

हा निसर्गाचा नियम.....फक्त नियम नाही तर जीवन बेचव,बेरंगी होवू नये म्हणून जीवनाला रुचकर...रंगतदार करण्यासाठीची ही अजब खेळी आहे...ह्या खेळात आपण तरबेज व्हायचे असेल,तो सहज जिंकायचा असेल ... तर या खेळाचा हा नियम पाळायलाच हवा...
उम्मीद..उमेद... आशा......हा शब्द किती समर्पक आहे पाहा..
यात...
उ..उत्साह असेल
मे..मेहनत ची जोड असेल
द..दैवातला द..म्हणजे नशीबाची कृपा असेल
तर काहीच अशक्य नाही..अवघड नाही.
उम्मीद पर दुनिया कायम हैं कहते हैं सभी, मंज़िल ज़रूर मिलेगी बरखुरदार कभी न कभी..

हीच उमेद आपल्याला हे रोजचेच जीवन नव्याने जगण्याची उर्मी देत राहते....नव्या दिवसाला नव्या जोशाने....सामोरे जाण्यासाठी नवी प्रेरणा देत राहते...

म्हणूनच म्हणावे वाटते,

रात कितनी भी दिलचस्प क्यों न हो
. ........सुबह होना जरुरी है ....
क्यों की
हर रात की सुबह... नई होती है... जिंदादिलं होती है.


डॉ अमित.
.

18 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad