Bluepadआठवणीतील गंमत......नव्हे एक गंमतीदार आठवण.
Bluepad

आठवणीतील गंमत......नव्हे एक गंमतीदार आठवण.

डॉ अमित.
डॉ अमित.
13th Jul, 2020

Share


एक गंमतशीर अनुभव....आठवणीतील गंमत......नव्हे एक गंमतीदार आठवण.नुकताच माझ्या 'विसरलेल्या आंघोळी' च्या नव्या कोऱ्या लेखाला तुमचा उत्स्फूर्त....(माझ्या लेखी) प्रतिसाद मिळाला....प्रतिसादाच्या वर्षावात अक्षरशः "न आंघोळ करता" मी धुऊन निघालो त्यादिवशी.😃😃
असाच एक काही वर्षांपूर्वीचा एव्हरग्रीन किस्सा आठवला.....
माझ्या नकळत झालेली ती 'गलती ची मिस्टेक'आज जरी आठवली तरी खळखळून हसू येते....(माझ्या पेक्षा जास्त माझा जिवलग मित्र आनंद खूप आनंदी होतो ती माझी घोडचूक पुन्हा पुन्हा नव्याने सांगताना,घोडया सारखा खिदळून हसतो तो आजही प्रत्येक वेळी.)
खूप वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे.
त्यावेळी बार्शीचे आम्ही ४ ते ५ जण कराडला एकत्रच एमबीबीएस ला शिकायला होतो..
एकदा सलग सुट्टीचे दिवस असल्याने आमच्या सगळ्यांचे बार्शी ला जायचे ठरले....आमचा प्रवास हा रात्रीचा होता.. डायरेक्ट बार्शी गाडी नव्हती रात्रीची...मग आम्ही पंढरपूर पर्यंत कराड सोलापूर गाडीने आलो....साधारणतः रात्री १ ते १.३० ची वेळ...ठिकाण पंढरपूर बस स्टँड..आम्ही सगळे उतरलो पंढरपुरात....तेथून कोल्हापुर
वरून येणाऱ्या बार्शी मार्गे जाणाऱ्या गाडीची वाट पाहू लागलो...
आणि इतक्यात एक एशियाड 🚞 गाडी आली....बार्शी ला सुट्टीला यायचे म्हटले की सगळ्यात जास्त उत्साही प्राणी मीच होतो.....पळत पळत जाऊन गाडीचा बोर्ड पाहिला.....कोल्हापूर परभणी गाडी होती...(बहुधा ...असे का म्हटले कळेलच पुढे 😅😅)
"या रे सगळे"मी मोठ्याने सर्वांना बोलावले. ....
सगळे जण अर्धवट झोपेतच होते.....(मी ही आलो त्यात)
सगळे जण गाडीत सामाना सहित चढले आणि मिळेल त्या जागी बसले....गाडीने पंढरपूर बस स्टेशन सोडले...डोळे चोळत चोळत कंडक्टर आला की आमच्या जवळ तिकीट तिकीट असे ओरडत .....
आम्ही आपले म्हणालो द्या ४ बार्शी...
एका झटक्यात उतरली की हो त्या बिचाऱ्या कंडक्टर ची...(झोप म्हणतो मी...😜)
काय राव चांगले शिकले-सवरलेले दिसता की तुम्ही सगळे...हे वाक्य ऐकताच आमच्या सगळ्यांची पण झोप खाडड् दिशी उडाली नव्हं... तो काय बोलतो हे मात्र कळेना...त्याने हात उंचावून बेल वाजविली...गाडी जागच्या जागी कचकन थांबली....बहुधा सर्वच प्रवासी आता जवळ जवळ पूर्ण जागेच झाले गचक्याने ब्रेक दाबल्याने.तो आम्हाला सगळ्यांना बस मधून उतरा खाली पटपट असं म्हणाला...आमची काही ट्यूब पेटेना की लगेच.
गाडी बार्शी हून आली की राव,परत नाही जायची पुन्यांदा... आम्ही एक सुरात म्हणालो का?
गाडी कोल्हापूरला जायची नव्हं..(तो ठणक्यात गुरगुरला...)

पंढरपूर चांगले २ किमी मागे राहिले होते.
रात्रीचे दोन वाजत आले होते...
सारा रस्ता सामसूम...आणि रस्त्यात फक्त आमचीच धूम.
आम्ही चांडाळ चौकडी उतरलो की बस मधून....मी आपला भिगी बिल्ली🐈 सारखा अंग चोरून चालत होतो....
सगळे जण..माझ्यावर तुटून पडले... शब्दांचा...शिवी समान मराठी भाव वचनांचा..😷 माझ्यावर अक्षरशः पाऊस पडत होता.,😱😫
मी आपला बोर्ड आतून पाहिला असेल बहुतेक अशी त्यांची.. नि माझी समजूत घालत होतो..
किंवा एकाच वेळी कोल्हापूर-परभणी नि परभणी कोल्हापूर दोन्ही गाड्या आल्याने असे झाले असेल म्हणा...(खरे काय ते देवाला ठावं)
आम्ही एकंदरीत चुकीच्या गाडीत चढलो होतो....

"एक-दोन _एक-दोन" करत सामान..कसे-बसे उचलत सावरत आम्ही पुन्हा एकदा पंढरपूर च्या दिशेने निशाचरांसारखे रपेट करत रवाना झालो....कुत्री 🐕 सोडून सारे मनुष्य प्राणी गायब होते रस्त्यावरून...
या एव्हरग्रीन गोष्टीला साधरतः एकवीस एक वर्षे झाली असतील....पण तेंव्हा पासून आजतागायत जेंव्हा जेंव्हा आम्ही ही चार आणि त्यात इतरही मित्र मंडळी एकत्र जमतो तेंव्हा या 'गलती से मिस्टेक' चा उद्धार ...(त्या अनुसंगाने माझाही आला त्यात... )होतोच होतो...याचा विलक्षण आनंद होतो तो म्हणजे आमच्या आनंद या मित्राला...हा किस्सा सांगताना त्याचा आनंद अक्षरशः गगनात मावेनासा होतो...

गलती से झालेल्या मिस्टेक चा
आता पर्यंत होतो आहे पुन्हा पुन्हा रिटेक
कानाला खडा लावला तेंव्हापासून
आता पुन्हा करणे नाही अशी चूक एक


तेंव्हा मित्रांनो,

गाडीत चढताना बोर्ड नीट पहा....बाहेरून पाहा😃😃 पुन्हा पुन्हा पाहा खात्री करा.....मगच गाडीत चढा...
नाहीतर एक गंमत तुमची पण वाट पाहत उभी असेल... अगदी माझ्या सारखी......


डॉ अमित.

15 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad