Bluepad" स्मृतिगंध: रातराणी"
Bluepad

" स्मृतिगंध: रातराणी"

सायली वर्तक
12th Jul, 2020

Share

" स्मृतिगंध: रातराणी"


पूर्वी आम्ही मी लहान असताना वाड्यात राहायचो. प्रशस्त अंगण, माळवदी घर, आड, विहीर आणि शेजारी शेजारी थाटलेली बिऱ्हाड वाडा म्हटलं की हेच चित्र डोळ्यासमोर उभ राहत.
तिथे एकत्र मोठी झालेली आम्ही मूल आजही अंगणात खेळलेली लपाछपी, खिपऱ्या, सोबत घेतलेला चोरघास, हौसेने लावलेल बाहुला बाहुलीच लग्न, एकत्र खेळलेली रंगपंचमी, दिवाळीत दिव्याने उजळून टाकलेल अंगण,डबा पार्टी, जत्रेत घेतलेल्या तलवारीने केलेली युद्ध, भांडण, रुसवे फुगवे, कट्टीबट्टी अश्या असंख्य आठवणींना आता whatsapp group च्या माध्यमातून उजाळा देतो.
घरासमोरच अंगण मोठ असल्याने त्यात बरीच झाडे होती आम्ही देखील घरासमोर काही झाड लावली होती त्यातच एक आठवणीतला रातराणीचा वेल!
रात्रीच्या शांत क्लान्त वातावरणात थंडगार वाऱ्याची झुळूक रातराणीच्या फुलांचा सुगंध आमच्या घरभर दरवळून टाकायची. उन्हाळ्यात मानसोक्त खेळून झाल्यावर आम्ही मूल रात्री अंगणात अंगतपंगत करायचो ते टिपूर चांदण्यांनी भरलेल आकाश, झाडामागे लपलेला चांदोमामा, पानांचा सळसळता आवाज आणि रातराणीच्या फुलांनी गंधीत झालेल वातावरण अहाहा! अगदी राजेशाही feel यायचा या मेजवानीला.
पुढे आम्ही फ्लॅट मध्ये शिफ्ट झालो आम्हा सवंगड्यांच्या वाटा बदलल्या गाठी भेटी हळूहळू कमी कमी होत गेल्या पण तो वेल मात्र तसाच तिथे होता गतकाळाच्या आठवणी उराशी बाळगून! कधी वाड्यात गेलेच तर दारासमोरचा रातराणीचा वेल बालपणात घेऊन जायचा.
इकडे फ्लॅट च्या gallary मध्ये देखील आम्ही बरीच झाड लावली अगदी रातराणीचा वेलही. तिची तिच शुभ्र पांढरी, फिकट गुलाबी फुलं रोज रात्री उमलतात, तिचा तोच धुंद करणारा मंद सुवास मन मोहरून टाकतो, तेच पिठोरी चांदण पौर्णिमेला चांदण्यांची शिंपण करत. इकडे देखील माझ छान friend circle आहे जेवण झाल्यावर आम्ही गच्चीत शतपावली करताना दिवसभरात घडलेल्या गोष्टी ,प्रसंग एकमेकांशी share करतो पण काहीतरी missing आहे...
काय missing आहे ते नेमक अजूनही कळत नाही
कदाचित मातीत खोल खोल रुजलेल्या रातराणीत आणि कुंडीत बंदीस्त केलेल्या आधाराने चढवलेल्या रातराणीतला हा फरक असावा
कदाचित ती अंगणातल्या ओल्या मातीची माया ही spartex tiles देत नसावी
कदाचित झाडाला बांधलेल्या झोक्याचा feel टांगलेला झोपाळा देत नसावा
आणि अंगणात केलेल्या अंगतपंगतीची सर zoom meetings ला येत नसावी...
सायली सुधीर वर्तक
12/07/2020.

https://www.facebook.com/मृदुगंध-110034530773753/

http://sayalivartakwriting.blogspot.com

13 

Share


Written by
सायली वर्तक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad