Bluepadक्षणभरं विश्रांती.... थोडी आगळी-थोडी वेगळी.
Bluepad

क्षणभरं विश्रांती.... थोडी आगळी-थोडी वेगळी.

डॉ अमित.
डॉ अमित.
12th Jul, 2020

Share

लॉक डाऊन मधल्या काही निवांत क्षणात सुचलेले...क्षणभरं विश्रांती.... थोडी आगळी-थोडी वेगळी.फुरसत के कुछं पल मिले तो जी लू....
वरना बहोत दौडाती हैं ये जिंदगी.काही दिवसांपूर्वी अशी अवस्था होती...मला वाटतं थोड्या फार फरकाने आयुष्य जगणाऱ्या सर्वांचीच.जीवनाचे हे रहाटगाडगे असेच सुरू होते.हो की नाही?
रोजचा दिवस प्रत्येक जण जगत होता...याचं आशेवर की कधीतरी थोडी का होईना क्षणभरं विश्रांती मिळेल या जीवाला...आणि त्याच बरोबर जीवनाला....
आणि बघता बघता सर्वांचीच ही ईच्छा पूर्ण झाली....या कारोना मुळे.
सर्वांना अगदी हक्काची(खरं तर सक्तीची हाच शब्दं चपखलं बसेल इथे) विश्रांती मिळाली.
जय वीरू जसे कुठल्याही निर्णयाच्या क्षणी छापा की काटा नाणे उसळून करायचे अगदी तसे....छापा आला तर घरातच बसायचे आणि जर का काटा आला तर घरातून बिल्कुल बाहेर जायचे नाही....म्हणजे काहीही झाले तरी.... घर आहेच.(घरघरच आहे..या जीवाला.😅)
मी थोडीशी आगळी वेगळी फोड करेन विश्रांती या शब्दाची ती अशी.. विसर अंती....म्हणजे आपण जे काम करत होतो त्यात शेवटी थोडा वेळ का होईना ते विसरून तुम्ही दुसऱ्या कशात तरी आपले मन रमविणे....म्हणजे काय तर कामात बदल म्हणजेच विश्रांती....


सद्गुरू म्हणतात की आपल्या शरीराला झोपे पेक्षा जास्त महत्वाची असते ती म्हणजे विश्रांती...
जर धावणारा माणूस थोडा वेळ जरी बसला...त्याच्यासाठी ती विश्रांती..बसून काम करणारा थोडा वेळ आडवा पडला तर ती त्याच्यासाठी विश्रांती.
या विश्रांती मुळे होते काय की आपण पुन्हा ताजे तवाने होतो..आपण करत असलेल्या कामात आपण आपले सर्वस्व पुन्हा नव्याने देवू शकतो.
कामात बदल म्हणजेच विश्रांती हाच फंडा जर आपण येथे लावला तर नक्कीच आपले मन कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त राहील...
आणि आपल्या शरीराची झोपेची गरज नेहमीपेक्षा बरीच कमी होइल....

जेंव्हा तुम्ही तुमच्या शरीराच्या ऊर्जेला वेगवेगळ्या कामात योग्य मार्गाने गुंतवून ठेवता तेंव्हा आपोआपच तुमची क्रियाशीलता वाढू लागते आणि तुमचा उत्साह द्विगुणित होतो.

आपले काम करत असताना कंटाळा आला तर थोडे वाचन करा....वाचून कंटाळा आला तर संगीत ऐका..मित्रांशी गप्पा मारा...रोज थोडे का होईना ध्यान अवश्य करा....ध्यान तुमच्या स्वतःशी तुमचा संवाद घडवून आणेल.जो आजच्या या धकाधकीच्या काळात हरवत चालला आहे.

देव न करो आणि आताच्या सारखी सक्तीची विश्रांती घेण्याची वेळ आपल्या कोणावरही पुन्हा कधीही न येवो...पण या धकाधकीच्या जीवनात या आगळ्या वेगळ्या विश्रांती चा आपण नक्कीच विचार केला पाहिजे...
मग पहा आपले जीवन कसे सर्वांग सुंदर आणि एखाद्या गुलाबा प्रमाणे सदा टवटवित होइल यात शंकाच नाही.


नाराज ना था जिंदगी से
पर थोडा थक सा गया था
जिंदगी की इस दौड मे
थोडा रुक सा गया था
अंदाज जो बदला जिने का
जिंदगी ने भी करवट बदल दी
वो भी है अब हमेशा मुस्कुराती
मेरे साथ अपना वक्त चैनसे बीताती.


डॉ अमित.

19 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad