Bluepadताल.... टाळी.....टवाळी.
Bluepad

ताल.... टाळी.....टवाळी.

डॉ अमित.
डॉ अमित.
11th Jul, 2020

Share

ताल.... टाळी.....टवाळी.


तुम्ही म्हणाल हे काय शीर्षक आहे का एखाद्या लेखाचं?
बरोबर आहे हे शीर्षक थोड उफराटं वाटतंय वाचताना.नक्कीच.पण थोड थांबा मग कळेल की मी हेच शीर्षक का दिलं असेल.
तर ताल म्हणजे काय तर लयं, नादं एकप्रकारची सुसूत्रता. मग ते संगीत असो वा आपले रोजचे जीवन.त्याला एकप्रकारचा ताल असतो आणि तो असेल तरच ते आपल्याला सुमधुर आणि सुंदर वाटते.हा ताल आपल्याला रोजच्या जीवनात तेंव्हाच जाणवतो जेंव्हा ते आपण प्रामाणिकपणे आणि दुसऱ्याचा विचार करून जगतो.बऱ्याच वेळेस आपल्या नकळत किंवा द्वेषाने किंवा तणावामुळे आपण आपल्यावरच नियंत्रण हरवतो आणि मग तो ताल चुकतो.जेंव्हा हा ताल चुकतो तेंव्हा मग हे जीवन नीरस होते,बेताल होते.तेंव्हा हा ताल लयात ठेवायचा असेल तर आपला आपल्या स्वतःवर विश्वास हवा,नियंत्रण हवे.
तर तुम्हाला जेंव्हा असे वाटेल की हा ताल चुकतोय,आपण थोडसं अस्वस्थ होतोय तेंव्हा फक्त एकांतात जावून टाळी वाजवायची,तेही एकसारखी लयात.तुम्ही म्हणाल की आता आणखीन हे काय नवीनच.हो मी खरं तेच सांगतोय.तुम्ही जेंव्हा अशी टाळी वाजवता ना तेंव्हा तुमच्या शरीरात असंख्य कंपने निर्माण होतात. तुमच्या तळहाताच्या पंजावर असलेले संपूर्ण शरीराचे प्रेशर पॉइंट्स हळू हळू उत्तेजित होतात.ही कंपने मग हळू हळू तुमच्या मेंदू पर्यंत पोहोचतात.तुमचा श्वास आणि तुमचे विचार यांच्यात सुसूत्रता यायला लागते.हा टाळ्यांचा ध्वनी मग तुम्हाला तल्लीन करतो.तुम्हाला स्वतःला एकदम प्रफुल्लित आणि ताजे तवाने जाणवू लागतं.
तुमचा तणावं थोड्या प्रमाणात का होईना कमी होतो.
तुम्ही तुमच्या तणावं निर्माण करणाऱ्या परिस्थितीवर तोडगा काढू शकता किंवा त्याचा मार्ग तुम्हाला सापडू शकतो.
हो हो...करून तर बघा ना एकदा.
हा नक्कीच टवाळी करण्याचा विषय नाही.
हो टवाळी...म्हणजे थट्टा.
पण काय काय हरकत आहे थोडी टवाळी केली तरी चालेल.कारण टवाळी हा विनोदाचाच एक उपहासात्मक भाग.पण त्यातला उपहास सोडला तर निखळ विनोद हाही तुमचा ताल सुयोग्य राखण्यास मदत करतो.
जेंव्हा तुमच्या आयुष्यात निखळ विनोद प्रवेश करतो तेंव्हा तो तुमचे गात्र नि गात्र पुलकित करतो.तुम्ही जेंव्हा एखाद्या विनोदावर मनापासून हसता ना तेंव्हा तो तुम्हाला एका प्रकारे पुन्हा रिचार्ज करतो, नवसंजीवनी देतो.
पण विनोद म्हणजे भिबत्सता नको किंवा एखाद्याच्या मर्मावर गालबोट तर नक्कीच नको.तरच तो तुम्हाला निखळ आनंद देतो.तुम्हाला तुमच्या आयुष्यात मार्गक्रमण करण्यात प्रेरणा देतो.तेंव्हा ही निर्मळ टवाळी तुम्हाला कायम हसवत ठेवेल,नव्हे ती तुम्हाला तुमचं आयुष्य आनंदाने जगवतं ठेवेल.
काय मगं ताल...टाळी..टवाळी हे शीर्षक आहे ना योग्य या लेखासाठी की अजुन काही वेगळं
उफराटं आठवतंय का तुम्हाला?
आठवलं तर नक्की सांगा........द्या टाळी.


डॉ अमित.

12 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad