Bluepad | Bluepad
Bluepad
पाऊस पाऊस..
Dr.Anil Kulkarni
Dr.Anil Kulkarni
11th Jul, 2020

Share

पाऊस पाऊस.
कालचा पाऊस आमच्या गावातंच झाला.
पाऊस तुमचा आमचा सेम नसतो.
कोणासाठी तो निनादणारा असतो. कोणासाठी तो रिमझिम असतो.
प्रेमिकासाठी पाऊस हौस असतो. जगण्याची उमेद असतो
पाऊस अस्वस्थ करतो उधवस्त करतो
दुष्काळानंतर पाऊस आल्यावर डोळ्यातून आनंदाश्रू टपकतात
दुष्काळात पाऊस नसल्यावर अश्रू टपकतात
पाऊस नुसताच येत नाही आपल्याबरोबर भावभावनांचा लवाजमा घेऊन येतो
कुठे दुष्काळ आणतो कुठे पुर आणतो.
कालचा पाऊस आमच्याच गावात झाला.
पाण्याची दहशत दाखवूनगेला.
आस्मानी थैमान दाखवून गेला.
शहराला हदयविकर,लकवा आणून गेला.
होत्याचं नव्हतं करून गेला.
अनेकांना त्याने घरी पोहचुच दिले नाही.
पुरही आता मानवनिर्मित झाले.
आताशा पुलाखालून पाणी वाहत नाही.
ओढे नाले,घाणी मुळे बंद झाल्याने पाणी पुलावरून वाहते.
अनेकजण असाहाय्यपणे विनाशाचे सामनेच पाहतात.
आपत्तीव्यवस्थपन जेव्हा स्विच ऑफ असते, तेव्हा मृत्यू स्वस्त असतो.
पाऊस आता फक्त कविते पुरता ऊरला नाही.
पाऊस इतिहास व भूगोल बदलणारा, निबंधाचा, लेखाचा विषय झाला आहे.
रस्त्यांच्या ही आता नद्या होतात. रस्त्यातूनही आता बोटीने जावे लागते.
ढगफुटी होते पण,निसर्गा प्रती मनफुटी जोपर्यंत होत नाही, नाले,मन तुंबणे जोपर्यंत थांबत नाही. तोपर्यंत निसर्ग कोपणारच.
कवितेतला पाऊस वास्तववात तग धरत नाही
सांग सांग भोलानाथ ची आता गरज नाही.
शाळे भोवती तळे साचायची गरज नाही.
निसर्ग कोपला की शाळेला काय,आयुष्याला सुट्टी मिळत आहे.
आता पत्त्यांचेच बंगले कोसळत नाहीत, तर खरेखुरे बंगले, गाड्या, माणसे कोसळतात. निसर्गाचे कोसळणे थांबवले तरच हे थांबणार आहे.
डॉ. अनिल कुलकर्णी.
पाऊस पाऊस..

14 

Share


Dr.Anil Kulkarni
Written by
Dr.Anil Kulkarni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad