Bluepadअभ्यास आणि आम्ही...
Bluepad

अभ्यास आणि आम्ही...

मयुर
मयुर
29th Nov, 2021

Share

सदस्थिती
अभ्यास आणि आम्ही.. - मयूर वाघमारे अभ्यास म्हटलं की सगळ्यांनाचं कंटाळा येतो, अगदी हौसेने स्वताहून स्वयंप्रेरणेने अभ्यासाला बसणारे दुर्मिळच..... आणि त्यातले आपण नाहीत हे काही वेगळे सांगणे आवश्यक नाही. म्हणजे आपल्यात काही कमी आहेत किंवा आपली आचरण क्षमता कमजोर आहे असेही नाही. आपण आपल्या बुद्धीचा वापर कसा करतो यावर सगळं खेळ अवलंबून आहे. आपल्याला अभ्यासात आवड का नसते ठाऊक आहे का????कारण आपण त्या पुस्तकाला केवळ अभ्यासाचे पुस्तक म्हणून च बघतो. छावा, मृत्युंजय कादंबरी वाचायला घेतली तर ती कधी संपली हे आपल्याला कळतही नाही. आणि त्या कादंबरी मधील सगळे प्रसंग आपल्याला जसेच्या तसे आठवण देखील असतात. कारण फक्त एकच असत आपण त्या कादंबरीतील शब्दनं शब्द चित्रित केलेला असतो. वाचताना त्या शब्दाचा अनुभव घेतलेला असतो. पण तेच अभ्यासाचे पुस्तक असतात ते केवळ परीक्षा पुरतेच वाचले जाते त्याचा अनुभव घेतला जात नाही. त्याचे शब्द आपल्याला जड जड वाटायला लागते. म्हणून वाचन करताना वाचलेला घटक कशाशी तरी लिंक केल्यास तो दीर्घकाळ लक्षात राहतो. बरेचजण काही ट्रिक्स सुद्धा उपयोगात घेतात. त्याचाही वापर आपण अभ्यास करताना करू शकतो पण मोठा प्रश्न असा पडतो की त्या ट्रिक्स कशा तयार करायच्या, लिंक कशा जोडायच्या???? कोणाची ट्रिक तुम्ही विसरू शकता पण स्वताने तयार केलेली ट्रिक्स विसरू शकत नाही... उदाहरणार्थ:- समाजशास्त्र मधील प्रश्न घेल्यास... ग्रामीण समुदायाचे वैशिष्ट्ये काय?? असा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर 1. कुटुंब अर्थव्यवस्था 2. विशेषीकरनाचा अभाव 3. सामाजिक एकरूपता 4. बलुतेदारी पद्धत 5. ग्रामीण कला 6.साधे जीवन असे जर असेल तर याची ट्रिक कशी होईल हे बघायला हवे. एक अक्षर घ्यावे, की एक शब्द घ्यावा व त्याच वाक्य कस करावं हे आपापल्या परीने जुळवले असल्यास ते आपल्या कायम लक्षात राहील. मी उदाहरण दाखल काही मुद्दे सांगितलेले आहेत. अशाप्रकारे आपण अभ्यास करू शकतो. ( अजून काही समस्या असल्यास आपण कॉमेंट द्वारे सांगू शकता. त्याचे निराकरण आपण पुढील लेखाद्वारे करूया)

15 

Share


मयुर
Written by
मयुर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad