Bluepadबाल बाल........ बच गया.
Bluepad

बाल बाल........ बच गया.

डॉ अमित.
डॉ अमित.
10th Jul, 2020

Share


बाल बाल........ बच गया.

(लॉक डाऊन मधला ...स्वानुभव)
जवळ जवळ एक महिना होवून गेला आहे.... लॉक डाऊन सुरू होवून...कोरोनाचा विळखा अजूनही कमी होत नाही आहे...
निसर्ग मात्र मनातून हसत आहे...त्याने स्वतः घेतलेला मोकळा श्वास...यामुळे निसर्गाचे साैंदर्य आणखीनच खुलले आहे...या सर्वात एक मजेशीर गोष्ट अशी घडत आहे ती ही की..'.तो' ही हल्ली ' ती ' भासू लागला आहे....अरेच्चा बुचकाळ्यात तर नाही ना पडलात...?याला कारण ही तसेच आहे...बंद असलेली सलून ची दुकाने...मला वाटतंय लॉक डाऊन मुळे घरात राहून,सात्विक अन्न खावून ( भरपूर हादडून असेच म्हणायचे होते मला 😄😄) केसांची वाढही नेहमीपेक्षा अधिक झपाट्याने होवू लागली आहे की काय अशी शंका मला राहून राहून येत आहे...दुसरी शंका(आपली सहजच आली मनात)केस वाढल्याने माणूस इतका वेगळा दिसू लागला आहे की कारोना चा विषाणू देखील कन्फ्युज होत असावा की आपण याच्या शरीरात गेलतो की हा नवीन व्यक्ती आहे) कदाचित याच संभ्रमा मुळे काही कोरोना झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत...🤣🤣😂😂)असो.ही आपली शंका मी बोलून दाखवली बाकी काही नाही.
तर मी सांगत होतो वाढलेल्या केसांबद्दल....
आरश्यात बघितल्यावर विनाकारण मला बाला मधल्या आयुष्यमान चा हेवा वाटू लागला आहे..
मध्यंतरी फेसबुक वर आपला सचिन स्वतःची स्वतः कटिंग करताना फोटो व्हायरल झाला होता..ती प्रेरणा मनात होतीच.. मग लागलो कामाला...आरश्यात बघून जेंव्हा मी माझे केस कापायला सुरुवात केली तेंव्हा हे सोपे वाटणारे काम मला एका दिव्या सारखे भासू लागले.कसे बसे थोडे थोडे केस कापून मी माझा हाथ आखडता घेतला...( थोडे फार असलेल्या रूपाचे बेरूप होवू नये हीच मनात एकमेव भीती )
पण माझ्यातली सचिनची प्रेरणा मला स्वस्थ बसू देईना...माझा मुलगा शर्विल मला म्हणाला पप्पा तू माझी कटिंग कर आज...तुला ते सोपे जाईल...मला पण त्याचं थोड थोड उगाचच पटलं. ( याला नसती खाज असेही म्हणतात ) मग सुरू झाली जय्यत तयारी.सर्व आयुधे गोळा करून मी शर्विल च्या कटिंग ला सुरुवात केली.पाहता पाहता थोडे थोडे केस कमी पण केले.पण नेम चुकत होता... केस वाकडे तिकडेचं कापले जावू लागले..मग मात्र मी त्याच्या केसांवर माझे प्रयोग घाबरून थांबवले.. नि माझा भाऊ तेजस(त्याचा याबाबतीतला अनुभव माझ्या पेक्षा खरोखरंच दांडगा...)त्याला फोन करून हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी पाचारण केले.सर्व आयुधे त्याच्या हाथी सोपवून ( मी तेथून पळ काढला एकदाचा😂😂😂)

मला वाटतं मी जर त्याची कटिंग केली असती तर आपले केस बघून शर्विल ने माझ्यावर केसचं ठोकली असती(बाल बाल बचं गया....इन सब झंझट से..और बाल बाल बच गया मेरे हाथोसे शहीद होने से 😃😃😃) असे मला राहून राहून वाटले.
तुम्ही म्हणाल ही माझी फजिती चा लेखं लिहायची काय गरज?..पण म्हणतात ना बाल की खाल निकालना.....ते हेच.
असो तुम्हाला कसा वाटला माझा हा लेख नक्की सांगा?आवडला नाही तरी सांगा...कारण मी घाबरत नाही बिल्कुल....क्योंकी कोई मेरा बाल भी बांका नही कर सकता...😄😄😄😂😂)


डॉ अमित.

12 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad