Bluepadफूलले रे क्षण माझे..
Bluepad

फूलले रे क्षण माझे..

Sangieta Devkar
Sangieta Devkar
30th Nov, 2021

Share

सकाळ चे आठ वाजले आणि सगळं घर रिकाम झाले. विराज ऑफिस ला गेला मुग्धा आणि वरूण कॉलेज ला आणि घरी राहिली एकटी सुचिता. सुचिता ने न्यूजपेपर घेतला आणि न्यूज वाचत राहिली. त्या तिघांच्या टिफीन साठी भाजी चपाती सकाळी बनवायची त्यातलेच थोडं सुचिता आपल्या साठी बाजूला काढून ठेवायची. नाष्टा विराज सोबत व्हायचा. वरुण एम बी बी एस करत होता आणि मुग्धा बारावी ला होती. त्यामुळे सकाळी सगळे बाहेर पडत मग दुपार नन्तर मुलं घरी येत आणि विराज संध्याकाळीच. दिवसभर सुचिता एकटी असे सगळं घर तिला खायला उठत असे. काम तर सकाळीच उरकत असे नन्तर भांडी झाडलोट करणाऱ्या मावशी येत मग त्यांच्या सोबत जरा गप्पा मारत सुचिता चा थोडा वेळ जायचा. बाकी दिवसभर काय करायचे हा मोठा प्रश्न होता तिच्या पुढे. ती बीकॉम झालेली होती माहेरी आई आणि भाऊ होते वडील तिच्या लहानपणीच वारले होते. त्यामुळे जेमतेम बी कॉम ती झाली होती आणि शेजारी एक संगीत शिकवणाऱ्या बाई होत्या त्याच्या कडे आवड म्हणून गाणं शिकायला जायची. लग्ना नंतर घर मुल याच्या कडे पाहायला कोणी नाही म्हणून तिने नोकरी नाही केली तशी गरज ही न्हवती. विराज चांगल्या कंपनीत मोठ्या पदावर होता. सुचिता ने ही जास्त लक्ष नाही दिले या गोष्टी कडे ती घर मुलं आणि विराज च सगळं करण्यात गुंग झाली.यातच गाण्याची आवड कुठेतरी मागे पडत गेली.  मुलं चांगली शिकत होती विराज चा काही त्रास न्हवता पण आता मुलं मोठी झाली आप आपल्या विश्वात रममाण झाली. विराज चे प्रमोशन झाले होते त्यामुळे त्याचे काम वाढले होते अधुन मधून तो बाहेरगावी ऑफिस च्या कामा साठी ही जात असे. पण सुचिता मात्र एकटी झाली होती. तशा मैत्रीणी होत्या तिला पण मैत्रीणी सोबत किती वेळ घालवणार ना? संध्याकाळी मुलं घरी आली खाणं पिणं आवरून आप आपल्या रूम मध्ये गेली. विराज ही आला चहा घेत तो सुचिता ला म्हणाला,उद्या मला जावे लागेल बाहेरगावी आजच माझी बॅग भरून ठेव. हा रात्री भरते ती बोलली.  तिचा चेहरा उतरला होता ते पाहून विराज म्हणाला,काय झाले सुचिता बरे वाटत नाही का? नाही मी बरे आहे पण अलीकडे मी खूप एकटी असते मुलं कॉलेज ला तुम्ही ऑफिस ला मी काय करू असा प्रश्न पडतो मला. माझा वेळ जातच नाही उगाच मग उदास वाटत राहत. ती म्हणाली. हो,अग मुलं मोठी झाली त्याचे व्याप त्यांना आहेत तू तुझं मन रमव मैत्रीणी ना भेट फिरायला जा मी कुठे अडवले आहे का विराज म्हणाला. तसे नाही विराज पण एक प्रकारचा एकटे पणा जाणवतो माझी गरज नाही राहिली का आता घरच्यांना असे वाटते .सुचिता बोलली हे बघ असे काही ही मनात आणू नको तू आहेस म्हणून आपलं घर आहे ओके मी जरा माज्या फाईलस चेक करतो असे म्हणत विराज उठुन गेला. सुचिता आपल्या कामाला लागली. सकाळी विराज लवकरच गेला. आज शुक्रवार होता तो आता डायरेक्ट सोमवारी येणार होता घरी. बरे झाले उद्या परवा मुलांना सुट्टी निदान घरी असतील मुलं माज्या सोबत असे सुचिता च्या मनात येऊन गेले. थोड्या वेळाने मुल त्याचं आवरून कॉलेज ला गेली. सुचिता उगाच काही काम काढत वेळ घालवू लागली. आज शनिवार मुलं उशिरा उठली त्यांनतर त्यांचा नाष्टा झाला . वरुण म्हणाला,आई मी मित्रा कडे चाललो आहे माझा एक प्रोजेक्ट करायचा आहे उद्या संध्याकाळीच येईन घरी. तसे मुग्धा ही म्हणाली आई मी पण सिनेमा ला जाणार आहे आता आवरून. तसे सुचिता म्हणाली,तुमच सगळं शेड्युल ठरले आहे . मी काय घरीच असते ना माझी काम आणि मी मला कशाला वेळ द्याल? तुम्ही आता मोठे झालात तुम्ही तुमच्या कामात बिझी . मी राहते घरी एकटी माझा विचार कोणीच करू नका असे काहीसे सुचिता बोलत राहिली. तसा वरुण म्हणाला,अग आई आज अचानक काय झाले असे का बोलत आहेत तू मी कायम जातो मित्रा कडे आणि मुग्धा ही जातेच ना सारख सिनेमा आणि शॉपिंग ला नवीन नाही हे काही. तू असे का आज रिऍक्ट होतेस? काही नाही वरुण जा तुम्ही . पण मुग्धा ला आई चे बोलणे मनाला लागले ती विचार करू लागली मग तिच्या लक्षात आले की आपण आई चा विचार करतच नाही ती दिवसभर कंटाळत असेल एकटी असते तिला कोणताच विरुंगळा नाही त्यामुळे ती चिडचिड करत आहे. आई साठी काहीतरी करायला हवे असा विचार करत मुग्धा बाहेर पडली आज ती मैत्रीणी सोबत सिनेमाला जाणार होती. सिनेमा बघून झाला थोडं शॉपिंग करू असा विचार करत मुग्धा आणि तिच्या मैत्रीणी असच फिरत होत्या ऐके ठिकाणी एक बॅनर मुग्धा ला दिसला त्यात लिहिले होते की पुढच्या महिन्यात एक सिंगिंग कॉम्पिटीशन होणार आहे सर्व वयोगटा साठी ती स्पर्धा होती नाव नोंदणी लवकर करा आणि बाकी डिटेल फोन करून विचारा असे होते. मुग्धा ला अचानक क्लीक झाले की तिच्या आई ला गाण्याची आवड आहे लग्ना आधी ती थोडं गाणं शिकली होती असे एकदा बोलता बोलता तिला म्हणाली होती मग मुग्धाने तो नंबर घेतला आणि घरी आली आईला सरप्राइज दयायचे असे तिने ठरवले. मुग्धा ने आई ला बोलावले आणि म्हणाली आई तुझ्या साठी एक छान सरप्राईज आहे. आई म्हणाली,काय आज एकदम सरप्राईज वैगरे काय विशेष? आई तू बस आधी आणि मी जे सांगते ते ऐक आणि मुग्धा ने त्या गाण्याच्या स्पर्धेबाबत सुचिता ला सांगितले. तसे सुचिता म्हणाली,नाही ग मुग्धा मी काय नॉमिनल  शिकले आहे गाणे आता कुठे मला काय जमणार ? नको बाई खूप हुशार आणि चांगले गानारे असतील तिथे . माझा निभाव नाही लागणार आणि मुळात मला धाडस नाही इतकं की मी स्टेजवर गाणं म्हणेन नको मुग्धा मी नाही भाग घेत यात. आई अग अजून एक महिना अवकाश आहे तू गाण्याचा क्लास लाव रियाज कर चांगला तुला सगळं जमेल प्रयत्न तरी कर आधीच का हार मानतेस? एक महिना शिकून बघ नाही जमले तर मग विचार करू आता मला तुझ्या नावाचं रजिस्ट्रेशन करू दे. मुग्धा बोलली. बर तू म्हणतेस तसे करू सुचिता म्हणाली. मग मुग्धा ने तिचे नाव नोंदवले आणि गाण्याचा क्लास कुठे असेल याचा ती शोध घेऊ लागली. नेटवरून बरीच माहिती गोळा केली आणि हे सरप्राइज गुपित ठेवायचे आताच वरुण आणि विराज ला सांगायचे नाही असे त्यांनी ठरवले. ऐके ठिकाणी घराजवळच एक क्लास मिळाला तिथे सुचिता ने जायला सुरवात केली दुपारची वेळ तिने निवडली जेणेकरून सगळं काम आवरुन जाता येईल. तिथे तिला तिच्या वयाच्या मैत्रिणी आणि काही लहान अगदी मुग्धा च्या वयाच्या ही मैत्रीणी मिळाल्या. एकत्रित पुन्हा गाणं शिकणं हा नवीन छंद सुचिता ला मनापासून आवडला.आपण नवीन काहितरी शिकत आहोत आपला वेळ चांगला जात आहे आणि मन प्रसन्न राहत हेच खूप होत तिच्या साठी ती अगदी मनापासून गाणं शिकू लागली मन रमवू लागली. घरी कोणी नसताना ती रियाज करू लागली खूप छान आणि पॉझिटिव  वाटत होतं सुचिता ला . आपण ही काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास तिला मिळाला होता पुन्हा एकदा ती स्वहताला नव्याने अनुभवत होती . मुग्धा सोबत होतीच. त्यामुळे खूप हुरूप सुचिता ला आला होता आपण स्टेज वर गाणं म्हणू शकतो इतका आत्मविश्वास तर क्लास मधून मिळाला होता तशी तयारी ही करून घेतली होती. चार दिवसांनी गाण्याची स्पर्धा होती उद्या गुढीपाडवा होता नवीन वर्षाची सुरुवात होणार होती मुग्धा आईला म्हणाली की उद्याच्या शुभ मुहूर्तावर आपण ही गोष्ट बाबांना आणि दादा ला सांगू दोघांना सरप्राईज देऊ. ठीक आहे सुचिता म्हणाली. सकाळी सगळे लवकर उठले छान तयार झाले आज नवीन वर्षाची सुरवात गुढी उभा करून करायची होती. सुचिता छान पैठणी नेसून तयार झाली वरुण आणि विराज ने कुडता घातला होता आणि मुग्धा ने लेहँगा घातला होता.सर्वांनी पूजा केली मग विराज आणि वरूण ने गुढी उभा केली . गुढी ला नैवेद्य दाखवला आणि सर्वजण जेवायला डायनींग टेबल पाशी आले तसे मुग्धा म्हणाली सर्वांनी लक्ष देऊन ऐका माझ्याकडे एक सरप्राईज आहे. वरुण म्हणाला कसले सरप्राईज सांग पटकन. हो हो तर परवा दिवशी एका संगीत अकॅडमी तर्फे गाण्याची स्पर्धा होणार आहे आणि त्या स्पर्धेत आपल्या लाडक्या आई ने भाग घेतला आहे तुम्हला आठवत नसेल तर मी सांगते आपली आई छान गाते तिला संगीताची आवड आहे म्हणूनच मी तिला या स्पर्धेत भाग घ्यायला भाग पाडले. तसा विराज म्हणाला,अरे वा सुचिता दयाटस ग्रेट पण आई तुझी प्रॅक्टिस कुठे आहे आता वरुण म्हणाला. मुग्धा म्हणाली,गेल्या एक महिन्या पासून आई ने गाण्याचा क्लास लावला आहे मी हे आई ला ही घरी सांगू नको बोलली होते कारण आम्हाला सरप्राईज दयायचे होते. आई मस्तच  वरुण म्हणाला. मुग्धा म्हणाली आपण सगळे आपल्या व्यापात मग्न होतो जो तो बिझी असतो आई मात्र घरी एकटीच असते तिला ही कंटाळा येतो बोलायला कोणी नाही ना काही काम असते की त्यामुळे तिचा वेळ जाईल आणि ही गोष्ट आपल्या कोणाच्याच लक्षात नाही आली की तिच्या साठी काहीतरी करावे पण जेव्हा आई चा एकटेपणा मला जाणवला तेव्हा मी आई ला तिचा गाण्याचा छंद पुन्हा सुरु करण्याचा सल्ला दिला . विराज म्हणाला,सुचिता ही गोष्ट माज्या ही लक्षात नाही आली आय एम सॉरी. आई मी पण सॉरी वरुण पण म्हणाला. तसे सुचिता म्हणाली,अरे सॉरी काय म्हणता मीच हे विसरून गेले होते की मला गाण्याची आवड आहे नूसते घर आणि काम यातच मी अडकून राहिले माझा छंद,माझी आवड मी विसरून गेले पण आता पुन्हा एकदा मी माझ्यातल्या " मला"शोधले आहे तेव्हा हा माझा छंद मी आता जोपासनार आहे आज नविन वर्षाची सुरुवात होतेय तशीच माझ्यातील मी ची पण नव्याने मला ओळख झाली आहे  तेव्हा आता मला मी काय करु हा प्रश्न नाही पडणार माझं गाणं आणि रियाज कायम सोबत ठेवणार. नवीन वर्षाचा हा माझा संकल्प आहे माझा छंद मी आनंदाने जोपासणार आणि माझ्या छंदा साठी फक्त माझ्या साठी काही क्षण तरी भरभरून जगणार. विराज म्हणाला,मी कायम तुझ्या सोबत आहे सुचिता. आणि आम्ही सुद्धा आई असे म्हणत वरुण मुग्धा ने सुचिता ला मिठी मारली आणि मोठ्याने ओरडले आँल द बेस्ट आई. विराज ने ही कौतुकाने हसत सुचिता कडे पहात थम्स अप केले..👍👍

21 

Share


Sangieta Devkar
Written by
Sangieta Devkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad