Bluepad | Bluepad
Bluepad
कोई... मिल गया.
डॉ अमित.
डॉ अमित.
9th Jul, 2020

Share

कोई... मिल गया.


हम राह देखते रहे....किसी की
जिंदगी की इस राह पर चलते-चलते
राह अजनबी सी हो गयी...पर ना आया
कोई हमराही जो मंजिल तक पहुचा सके..

खूपदा असं होतं की कोणीतरी येईल आणि आपले नशीब पालटेल... असं विनाकारण वाटतं राहतं.तुम्ही कुठल्या ना कुठल्या अडचणीत असता,तुम्हाला काही सुचत नसतं... समोर सगळा अंधार पसरला आहे असे तुम्हाला वाटतं....आणि तुम्ही तुमच्याही नकळत कोणाची तरी वाट पाहत राहता...कोणीतरी येईल नि आपल्याला या सर्वांतून बाहेर काढेल...कधी कधी हा कोणीतरी येतोही ....कधी मित्राच्या रूपात..कधी नातलगाच्या रूपात तर कधी असाचं कोणीतरी अनोळखी....
पण तो दर वेळी येईलच असेही नाही...
मग मी म्हणतो का आपण दुसऱ्याच्या येण्याची वाट पाहायची...हे आयुष्य आपले आहे म्हटल्यावर यात येणारी सुख - दुःखे,अडी -अडचणी याही आपल्याचं झाल्या नाही का? आणि मग या सर्वांना आपलेचं मानले की मग त्या सोडवायला दुसऱ्या कोणाची का बरे वाट पाहायची?

गर ढूंढ रहे हो तुम किसीं को
जो तुम्हारी किस्मतं बदल दे
बस सिर्फ इतना कर दो ये दोस्त
सिर्फ मुस्कुराकर आईनां देखं लो...


हो....ती व्यक्ती ज्याची तुम्ही वाट पाहत आहात ती दुसरी तिसरी कोणी नसुन ती तुम्हीच आहात.
तुमच्या स्वतः पेक्षा जास्त तुम्हाला दुसरे कोण ओळखत असणार,समजत असणार?
बऱ्याच वेळा असे होतं की आपण आपल्या स्वतःवरचा विश्र्वासचं गमावून बसलेलो असतो...
हाच आत्मविश्वासं तुम्हाला जर परत मिळवायचा असेल तर तुम्हाला सर्व प्रथम स्वतः वर प्रेम करता यायला हवे.... स्वतःच्या चुकांकडे...स्वतः मध्ये असलेल्या दोषांकडे अगदी तटस्थ पणे पाहता आले पाहिजे...त्यांच्या मुळाशी जाता आले पाहिजे....जेंव्हा आपण असे करतो तेंव्हा नकळत आपल्याला त्या अडचणींवर मार्गही दिसू लागतो..कारण असा कुठलाच प्रॉब्लेम नाही ज्याचं सोल्युशन नाही....कारण प्रत्येक प्रॉब्लेम मध्येच त्याचं सोल्युशन दडलेले असते आपण मात्र त्याचा ब्लेम विनाकारण दुसऱ्यावर टाकत असतो....

Problem....मधला

P ...म्हणजे patience.. धीर धरणे
जेंव्हा एखादा प्रॉब्लेम असतो तेंव्हा तो सोडवताना सगळ्यात महत्वाचा असतो आपण धीर धरणे.
संकटाला घाबरून न जाता त्याच्याशी दोन हात करणे,त्याला सामोरे जाणे.

R...म्हणजे responsibility...जबाबदारी घेणे.
जेंव्हा आपण एखाद्या प्रॉब्लेम ला सामोरे जातो तेंव्हा त्याच्यापासून पळ न काढता त्याला सोडवण्याची पूर्ण जबाबदारी घेणे.एकदा का आपल्या मनाने ही जबाबदारी घेतली की आपोआप हे मन ती जबाबदारी पेलण्यासाठी स्वतःला सक्षम करू लागते.

O...म्हणजे observation..निरीक्षण करणे
जेंव्हा आपण आलेल्या एखाद्या प्रॉब्लेम चे बारकाइने निरीक्षण करतो तेंव्हा त्याची उकल नकळत आपल्या मनात होत असते..

B....म्हणजे boost your self confidence..आत्मविश्वास जागृत करणे
जेंव्हा आपण आपला स्वतःचा आत्मविश्वासं जागृत करतो तेंव्हा आपल्यात असलेले सामर्थ्य...कौशल्य अधिक चांगल्या पद्धतीने आपण त्या प्रॉब्लेम ला सामोरे जाताना उपयोगी आणू शकतो.

L....म्हणजे learn everytime.. नेहमी शिकत राहण्याची तयारी ठेवणे..
जेंव्हा आपले मन सतत काही ना काही नवीन शिकत राहण्याची तयारी ठेवते तेंव्हा आपला क्षणा क्षणाला अंतर्गिक विकास होत असतो...आपण कळतं नकळतं अधिक परिपूर्ण होत असतो.

M....म्हणजे mindset...मानसिकता.
जेंव्हा आपली मानसिकता नेहमी सकारात्मक असते तेंव्हा आपण एखाद्या संकटाचा प्रॉब्लेम ओरिएंटेड विचार न करता सोलुशन ओरिएंटेड विचार करू लागतो.हाच सोल्युशन ओरिएंटेड विचार आपल्याला त्या प्रॉब्लेम च्या मुळाशी नेऊन त्याची उकल करतो..

थोडक्यात काय तर प्रत्येक प्रॉब्लेम ची उकल त्या समस्ये मध्येच दडलेली असते.फक्त ती ओळखण्याची आपली नजर आणि क्षमता आपण स्वतःमध्ये वाढवली पाहिजे....
स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखून आपल्यातला स्व.. ला आणखी सामर्थ्यशाली बनवायला हवे.तेंव्हा आपण नव्यानेच स्वतःला गवसतो आणि मग दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपण आरश्यात पाहून नक्कीच म्हणू शकतो....

की,
कोई.... मिल गया.
हो की नाही?

डॉ अमित.

14 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad