Bluepadपुन्हा लहान होऊ या!
Bluepad

पुन्हा लहान होऊ या!

प्रतिष्ठा सोनटक्के
8th Jul, 2020

Share

मन...
कधीही न दिसणारी
कुणीही न पाहिलेली
एक चमत्कारिक गोष्ट
काल माझं मन भूतकाळात फिरून आलं..
अगदी बालपणात...
किती मस्त होते नाही ते दिवस
ना कशाची चिंता ना कशाची भीती
आई बाबा भाऊ बहीण हेच सखे सोबती
आपल्या घरापेक्षा इतरांच्या अंगणातच वाढलो
शेजारच्या काकूंना भूक लागली सांगायला कधी नाही कचरलो
तुझं माझं असं काहीच न्हवतं
होता तो फक्त जिव्हाळा
आजोळी जायची मजाही खूप भारी होती
आजीच्या हाताला मायेची चव होती
रुसवे फुगवे, दंगा, मस्ती असायची
हट्ट पुरवून घ्यायची मजाही न्यारी असायची
दिवस सरले, बालपण हरवलं
मामाचा गाव कधीच विसरला
पण आता पुन्हा वाटतं
जगू या ते दिवस पुन्हा
होऊ या लहान
पुन्हा मांडू या पत्त्यांचा डाव
पुन्हा मांडू या पत्त्यांचा डाव!!
प्रतिष्ठा कुलकर्णी - सोनटक्के
७०३०६१६६२२


13 

Share


Written by
प्रतिष्ठा सोनटक्के

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad