Bluepad | Bluepad
Bluepad
कायापालट...
Vinisha Dhamankar
Vinisha Dhamankar
7th Jul, 2020

Share


कायापालट...
एक विषाणू आला काय,
सर्व गिळून बसला काय,
अन्नासाठी भटकंतीला
पर्याय काही उरला काय?...
एक विषाणू आला काय,
जगण्याचे बंध सुटले काय,
परप्रांताची कूस सोडून
त्याच आखाड्यात गेले काय...
एक विषाणू आला काय,
देवालाही भोवला काय,
दाराआडच्या गाभार्‍यात
राम काय नि अल्ला काय....
एक विषाणू आला काय,
दूर दूर झालो काय,
अंतर राखून असणार्‍यांचा
गर्व गळून गेला काय?
एक विषाणू आला काय,
धंदे बंद केले काय,
आकाशात उडणार्‍यांना
जमिनीवर आणलं काय?...
एक विषाणू आला काय,
पितळ उघडे पाडले काय,
महासत्तांचे महाकाण्ड
सर्व जगाने पाहिले काय?
एक विषाणू आला काय,
कामगार हित कळले काय?
काम तिथे घर असावे,
आता तरी पटले काय?
एक विषाणू आला काय,
नेत्यांना खजील केले काय,
सत्तरीतील स्वातंत्र्याने
गरीबांना दिले काय?...
एक विषाणू आला काय,
त्यांची वणवण काळीज चिरते काय?
लोकशाहीतील राजा असा
लाचार, दुबळा असतो काय?
एक विषाणू आला काय,
कानउघाडणी केली काय,
विनाशक सवयींचा
पर्दाफाश केला काय...
एक विषाणू आला काय,
उद्या तो नक्कीच जाणाराय,
तुमच्या माझ्या विश्वाचा
कायापालट होणाराय...
कायापालट होणाराय...
---विनिशा धामणकर

17 

Share


Vinisha Dhamankar
Written by
Vinisha Dhamankar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad