Bluepadभारत चीन
Bluepad

भारत चीन

तेजल
7th Jul, 2020

Share

सुरुवातीपासूनच चीनने शेजारी राष्ट्रांच्या नाकी नऊ आणले आहेत. पण आता जागृत झालेल्या सोशल मीडियामुळे दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणींसारखे चीनचे संबंध भासू लागले आहेत. चीन असं का करत असावं? कारण, चीन माओ त्से तुंग (१८९३-१९७६) यांचे तत्वज्ञान follow करते. माओ यांचा विश्वास होता की, कम्युनिस्ट तत्वानेच भारत साम्राज्यवादा पासून मुक्त होईल, स्वतंत्र होऊन देखील इतरांचे प्रभुत्व असलेले राष्ट्र अखंड चीन मध्ये समाविष्ट करण्याचे धोरण माओचे असले पाहिजे. त्यासाठी ते Cartographic Aggression वापरत असतात. ज्यात चीन मुद्दाम शेजारी राष्ट्रांच्या नकाशात एखादा भाग स्वतःचा म्हणून दाखवतात. आणि हीच गोष्ट जेव्हा भारताने केली -(ऑगस्ट २०१९ मध्ये अक्साई चीन भारताचा भाग म्हणून दाखविला गेला.) तेव्हा, चवताळून चीन ने पँगोंग त्सो सरोवर, हॉट स्प्रिंग व्हॅली, गेलवान येथे आपले सैनिक सशस्त्रांसोबत तैनात केले. आणि भारताचे कर्तव्य बजावताना लोप पावणारे राष्ट्रप्रेम उफाळून आणण्यात चीन यशस्वी झाले. अर्थात हे एक कारण झाले, अमेरिकेसोबतची भारताची सलगी, चीनने कोरोना वर मात करूनही आपले सामर्थ्य कायम ठेवले आहे हे दाखविण्याची खुमखुमी अशीही काही कारणं ह्या land capturing मागे असू शकतात.
चीनने नेहमीच आक्रमकता स्वीकारली मग भारताने का नाही स्वीकारली हा प्रश्न जन माणसांकडून होत असतो. परंतु, ह्याच जनमाणसातील एक जण जेव्हा निर्णय घेण्याच्या खुर्ची वर बसतो तेव्हा त्याला अथवा तिला चीनच्या एकूणच ताकदीचा अंदाज येतो. आणि अशा वेळी भारताने आपली ताकद प्रगत होत असलेल्या जनते वर, पाकिस्तान सारख्या कधी ही आक्रमण करू शकणाऱ्या राष्ट्रावरच खर्च करणं योग्य आहे, हे त्या डिसिजन making body ला समजलेले असते.
१८०० सालापासून ब्रिटन आणि रशिया मध्ये ग्रेट गेम सुरू होता. दोघांना स्वतःचा विस्तार करायचा होता, एकमेकांचे अस्तित्व नाकारायचे होते.. भेद नीतीचा अवलंब करे पर्यंत इंग्लंड भारताचे चीन पासून संरक्षण करत होता. कारण चीन वर रशिया च्या कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव होता. त्यांनी त्यासाठी मध्ये तिबेट ला buffer state बनवले होते.
१८६५ साली आखल्या गेलेल्या जॉन्सन रेषेला भारत मानत आला आहे, परंतु, चीन मॅक डोनाल्ड रेषेलाच अनुसरून आपली धोरणे आखत असतो.कारण, जेव्हा जॉनसन लाइन आखली गेली तेव्हा चीन मध्ये डंगण बंड चालू होते. ज्याचा फायदा उठवत ब्रिटिशांनी चीन ला जॉन्सन रेषे पासून अनभिज्ञ ठेवले. [ब्रिटिश नेहमी भेद निती अनुसरत असत.] ह्या रेषेनुसार अक्साई चीन भारताचा भाग होता. काश्मिरच्या राजाने शहीदुल्ला (Xaidulla) येथे किल्ला देखील बांधला होता. पण १८७७ साली जेव्हा डंगण बंड संपुष्टात आले, तेव्हा चीन ने सिंजियांग (Xinjiang) हा भाग पुन्हा ताब्यात घेतला.
१८९२- चीन ने काराकोरम पास पासून स्वतःचा नकाशा बनविण्यास सुरुवात केली.
१८९३ साली परत एकदा ब्रिटिश जनरल जॉर्ज मॅक कर्टे (Macartney) ह्यांच्या कडे नकाशा देण्यात आला.
१८९९ साली मॅकर्टणे (Macartney) यांनी सुचविल्यानुसार
ब्रिटन ने सुधारित सीमा रेषा बनवली.
हा नवीन नकाशा ब्रिटिश दूत MacDonald यांच्याकडून चीन मध्ये नेण्यात आला आणि त्यानुसार अक्साई चीन हा भाग चीनमध्ये दाखविण्यात आला.
ह्या ब्लॉग मध्ये सोबत दिलेल्या प्रतिमेत वेस्टर्न सेक्टर दाखविला आहे, त्यावर चीन सतत कुरापती काढण्याच्या तयारीत असतो. Middle sector चा Himachal Pradesh आणि उत्तराखंड चा भाग थोड्या उंचीवर असल्या कारणाने चीन ' सहसा ' ह्या भागात काही आडकाठी आणत नाही.
परंतु चीनला आडकाठी आणायचीच का असते? काय होतं माओचं तत्व ? जे आजही चीन पाळत आहे..
आशियातल्या अनेक राष्ट्रांना चीन साम्राज्य वादाचे चमचे समजते. भारता कडे सुद्धा चीन त्याच नजरेने बघते. चीन सारखे इतर देश स्वतंत्र नाही म्हणून त्यांचा दुस्वास करते.
माओचे तत्वज्ञान (१९५०) असे आहे की, चीन हा ' हात ' आहे. तिबेट हा तळहात आहे , आणि ५ बोटे आहेत - १.लडाख, २. नेपाळ, ३.अरुणाचल प्रदेश (तेव्हाचा नॉर्थ ईस्ट फ्रोंटियर एरिया) ४.भूतान ५.सिक्कीम.
ह्या हाताचा विस्तार करणे हाच माओचा प्लॅन होता. त्याचे स्वप्न अखंड चीन बनविण्याचे होते. (आपल्याला यात नवल वाटायला नको, कारण अशी दिवा स्वप्न बऱ्याच देशात म्हणजे आपल्या कडे पण बघितली जातात). चीन हा प्राचीन जगासारखाच Middle Kingdom आहे, अशी त्यांची समजूत आहे. इतिहासाकडे ज्ञान म्हणून न बघता त्यातच जगत ते धोरणे आखत असतात. त्यातही शांतीपूर्वक मार्ग न निवडता सतत आक्रमक शैलीचा वापर चीन कडून होत असतो. भारत ह्या नीतीचा अगदी विरुद्ध आहे. कारण, शाश्वत तेच असते जे शांतीच्या मार्गाने मिळत असते, हा धडा भारताने घेतलाय.
१९ व्या शतकात बनविलेल्या तिबेट ह्या buffer state वर चीनने आक्षेप घेतला. कारण, चीन तिबेट ला स्वतः पासून वेगळं मानतच नाही तर ते buffer state कसे बनविले असा त्यांचा प्रश्न होता. ह्या मुद्द्यावरून १९१४ साली ब्रिटिशांनी शिमला अकोर्ड बनविला. त्यात ब्रिटिश भारत, तिबेट आणि चीन चे प्रतिनिधी होते. ब्रिटन मधून हेन्री मॅक मोहन, आणि चीनकडून इवान चेन आले होते. सिक्कीम चे राजा सेक्योंग त्रुलकू हे देखील उपस्थित होते. परंतु, चीन ने चर्चा सत्रातून माघार घेतली. ईवान यांनी accord चा औपचारिक स्वीकार करून सुद्धा चीन ने तीन पार्टी करारावर सह्या केल्या नाहीत. त्यामुळे शिमला करारा वर फक्त ब्रिटिश भारत आणि तिबेटच्याच सह्या झाल्या. ह्या करारानुसार, तिबेटचे बाह्य आणि आंतर तिबेट असे दोन भाग झाले. बाह्य तिबेट तिबेटियन सरकार च्या अखत्यारीत तर आंतर तिबेट चीन सरकार कडे राहील अशी विभागणी झाली. तरीही चीनचा मॅक मोहन रेषेला विरोधच राहिला. पण ब्रिटिश आता यावर उपाय शोधू इच्छित नव्हते. कारण, त्यांना चीन च्या मदतीची गरज पहिल्या महायुद्धात हवी होती. चीन चा दावा आहे की, मॅकमोहन लाईन पासून दक्षिणेकडे साधारण ६५००० sq km भाग त्यांचा आहे, म्हणून अरुणाचल प्रदेशला ते भारताचा भाग मानत नाही. ह्या क्षेत्राला ते दक्षिण तिबेट म्हणतात. आणि तिबेट सार्वभौम नाहीये तर ते करारावर सही करू शकत नाही असे चीनचे मत आहे.
ह्याच विचारातून ऑक्टोबर १९५० मध्ये चीनने चामदो चे युद्ध केले. तिबेट वर स्वतःचे सार्वभौमत्व दाखवणे आणि चामदो ला चीन मध्ये समाविष्ट करून घेणे हा त्या मागचा उद्देश होता. भारताने जेव्हा हा प्रश्न दुसऱ्या मार्गाने सुटला असता, असे म्हटले तेव्हा तिबेट हा चीन चा अंतर्गत प्रश्न असून ,आम्ही ३०लाख तिबेटियन लोकांना पाश्चिमात्य प्रभावापासून स्वतंत्र करण्यासाठी असे करत असून, इतरांनी त्यात बोलू नये असे चीन ने सांगितले.
यानंतर पटेलांनी सर गिरिजा शंकर बाजपाई यांच्याशी बोलून नेहरूंना पत्र लिहिले आणि त्या नुसार हिंमत सिंघ यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर आणि उत्तर पूर्व सीमा सुरक्षा कमिटीची स्थापना झाली. एप्रिल १९५४ ला व्यापार आणि अंतर्गत हालचाली यासाठी चीनच्या ताब्यातील तिबेट आणि भारत यांच्यात पंचशील करार झाला. यानुसार पाच तत्वांचा स्वीकार नेहरूंनी केला. बांडुग येथील ह्या कार्यक्रमात १० तत्वे जाहीर केली. भारताची तत्कालीन लष्करी परिस्तिथी माहीत असल्याने चीन ने तिबेट आमचेच आहे, असे भारतास मान्य करण्यास सांगितले होते. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतापुढे असलेले प्रश्न पाहता मजबूत असलेल्या चीनसमोर हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता.
६ ऑक्टोबर १९५७ रोजी वृत्तपत्रात बातमी आल्यानंतर सर्वांना समजले की, ११७९ km चा highway Sinkiang येथून बांधला आहे. १९५९ साली, चीनने १७ पॉइंट अग्रीमेंट चे उल्लंघन केल्या नंतर दलाई लामा यांना भारताने आश्रय दिला. आणि कुरापती काढायला तयार असलेल्या चीनला आयते कोलित मिळाले. शेवटी, १९६२ ला आपली प्रतिकूल परिस्थिती असताना चीन ने केलेल्या हल्ल्याचा सामना करावा लागला. चीनची ही लष्करी पद्धत आहे - ते तुकड्यात पुढे पुढे सरकतात..पूर्णतः विरोध करत नाहीत. याला ' सलामी '
असे म्हटले जाते.
१९६२ पासून भारत खूप काही शिकला. पायदळ युनिट वाढवण्यात आले, नत्थु ला पास जवळ भारतीय आणि चिनी असे दोन्ही सैनिक तैनात राहू लागले. ११ सप्टेंबर १९६७ रोजी दोन्ही कडच्या सैनिकांच्या झालेल्या चकमकीत १५ सप्टेंबर १९६७ या दिवशी भारताची सरशी झाली. ऑक्टोबर मधील चो ला पास घटनेत सुद्धा चीनला माघारी फिरावे लागले. या विजयानंतर इंदिरा गांधी पुन्हा एकदा १९८० ला सत्तेत आल्या तेव्हा त्यांनी जनरल के व्ही कृष्णा राव यांच्या कडे सुरक्षा योजना मागवल्या होत्या. त्यानुसार पश्चिम पूर्व असं दोन्ही बाजूंना आपली सुरक्षा यंत्रणा उत्तम रित्या तैनात होती.
असा भारताचा सुरक्षेच्या दृष्टीने प्रगतीचा आलेख चालू झाला. नंतर उत्तर पूर्व भागांना राज्याचा दर्जा दिल्यानंतर काय दिसू लागले.. हे बघुया पुढच्या भागात..

21 

Share


Written by
तेजल

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad