Bluepadकॅप्टन कूल माहीचा मैदानावरचा झंझावात
Bluepad

कॅप्टन कूल माहीचा मैदानावरचा झंझावात

A
Ashwin Sathye
30th Nov, 2021

Share


“कॅप्टन कूल” म्हणून ज्याला अख्खं क्रिकेट विश्व ओळखतं तो माही अर्थात महेंद्र सिंह धोनी मैदानावर मात्र एक झंझावात घेऊन येतो. त्याच्या आक्रमक शैलीमुळे भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक ठरला आहे.


शाळेत असतांनाच माहीने क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती. सुरूवातीच्या काळात क्रिकेटपेक्षा बॅडमिंटन आणि फूटबॉलची माहीला आवड होती. शाळेच्या फूटबॉल टीमचा तो गोलकिपर असायचा. या दरम्यान त्यांच्या फूटबॉल कोचने त्याला स्थानिक क्लबच्या क्रिकेट टीमचा विकेटकिपर म्हणुन पाठवलं आणि तिथून क्रिकेट त्याच्या आयुष्याशी जोडलं गेलं.

बिहार क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष देवल सहाय जे त्यावेळी रांची जिल्हा क्रिकेट अध्यक्ष होते, यांनी माहीला त्यांच्या सेंट्रल कोल फील्ड्सच्या क्रिकेट संघात खेळण्याची संधी दिली. ते त्याला प्रत्येक षटकारासाठी ५० रुपये द्यायचे. कदाचित यामुळेच माहीला बॅटिंगमध्ये आवड निर्माण झाली. त्याचा खेळ बघून सहाय खूप प्रभावित झाले आणि त्यांनी बिहार क्रिकेट असोसिएशनकडे त्याची शिफारस केली. त्याची निवड झाली आणि १९९७ – ९८ मध्ये त्याला विनु मंकड चॅम्पियन ट्रॉफी करीता १६ वर्षाखालीत टीममधून तो खेळला. रांची संघ, कनिष्ठ बिहार क्रिकेट संघ आणि अखेरीस ज्येष्ठ बिहार रणजी संघ असा एक एक टप्पा गाठत १९९९ – २००० च्या मोसमात तो खेळला आणि ह्यातील ५ सामन्यात मिळून त्याने २८३ धावा केल्या आणि आपलं फर्स्ट क्लास क्रिकेट मधलं पहिलं शतक देखील झळकवलं.

यानंतर तो रणजी आणि देवधर ट्रॉफीमध्ये कधी शतक तर कधी अर्धशतक अशी खेळी करत राहिला आणि त्याला २००३- २००४ मध्ये भारताच्या राष्ट्रीय संघाच्या “अ” टीममध्ये जिम्बाब्वे, केनिया आणि भारत या त्रिराष्ट्रीय सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने उत्तम विकेट कीपिंग करत ७ स्टंप तर ४ झेल घेतले. त्यानंतर झालेल्या केनिया, भारत अ, पाकिस्तात अ या त्रिस्तरीय सामन्यात त्याने पाकिस्तान विरुद्ध एका सामन्यात २२३ धावा ठोकल्या. यामुळे त्यावेळच्या भारतीय टीमचा कॅप्टन सौरव गांगुलीची त्याच्याकडे नजर गेली आणि त्याला भारतीय संघासोबत २००४- २००५ मध्ये बांग्लादेशात एक दिवासीय सामना मालिका खेळण्यची संधी मिळाली. ह्या मालिकेतील दुसर्‍या सामन्यात त्याने केवळ १२३ चेंडूत १४८ धावांचा वर्षाव केला आणि हीच “धोनी पर्व” सुरू झाल्याची नांदी होती.

त्यानंतर माहीने अनेक सामने गाजवले. पण कधी त्याच्या पदरात निराशा देखील पडली. त्याच्या कडून लोकांच्या अपेक्षा इतक्या वाढल्या होत्या की जेंव्हा तो यात अपयशी ठरला तेंव्हा लोकांनी त्याच्या रांची मधल्या घरावर हल्ला केला. २००७च्या विश्वकप भारताने गमावला असला तरी माहीच्या कामगिरीची पावती त्याला सामनावीर आणि मालिकावीर हे खितबांनी मिळाली. ह्या सामन्यांनंतर त्याला उपकर्णधार पद देण्यात आलं. त्याच्या सातत्यपूर्ण खेळण्याने त्याची नियुक्ती विश्व कप २०११ साठी कर्णधार पदी करण्यात आली. अखेरच्या सामन्यात २७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेविरूद्धच्या फाइनलमध्ये धोनीने अटीतटीचा उत्तम दाखवत हा सामना जिंकला. त्याला या सामन्यात सामनावीर हा पुरस्कार मिळाला.

भारतीय कर्णधार झाल्यानंतर सप्टेंबर २००७  साली दक्षिण अफ्रिकेत आयोजित विश्व टी-20 मध्ये धोनीने भारतीय संघाचं नेर्तृत्व केलं आणि या स्पर्धेत भारताला विजयी देखील केलं. विश्व टी-20 चषक जिंकल्यानंतर धोनीकडे एक दिवसीय सामना आणि कसोटी सामना याच्या कर्णधार पदाची देखील सूत्रं आली. माही कर्णधार असताना भारतीय संघाने २००९ साली आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिलं स्थान मिळवलं. या शिवाय माहीने दोन विश्वचषकात भारतीय संघाचं नेर्तृत्व केलं. कर्णधार असताना २०११ साली त्याच्या नेर्तृत्वात भारताने विश्वचषक आपल्या नावावर केला. आणि २०१५ मध्ये विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतीय संघाने उपांत्यफेरी पर्यंत मजल मारली होती. आइसीसी चैम्पियंस ट्रॉफी २०१३ आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली ज्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ४-० ने हरवलं. ०२ सितम्बर २०१४ रोजी माहीच्या नेतृत्वात २४ वर्षांनंतर भारताने इंग्लंडला त्यांच्या मातृभूमीत धूळ चारली.

माहीला २०११ मध्ये डी मोंटफोर्ट विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केलं गेलं. २००९ साली भारताच्या ’’पद्मश्री’’ तर २ एप्रिल २०१८ रोजी ’पद्मभुषण’’ या देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आलं आहे. महेंद्र सिंग धोनी महान क्रिकेटपटु कपिल देव नंतर दूसरा असा खेळाडु आहे ज्याला इंडियन आर्मीचे ‘लेफ्टनंट कर्नल’ हे सन्मान पद मिळालं आहे. २०११ साली जगातील सर्वात १०० प्रभावशाली व्यक्तिमत्वांच्या यादीत धोनीचे नाव समाविष्ट करण्यात आले होते.

37 

Share


A
Written by
Ashwin Sathye

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad