Bluepadमन शिल्प...
Bluepad

मन शिल्प...

Dr.Anil Kulkarni
Dr.Anil Kulkarni
30th Nov, 2021

Share

मन शिल्प...
दगडाचं अस्तित्व दुभंगल्या शिवाय शिल्प नाही
माणसाचे दुर्गुण दुभंगल्या शिवाय कायाकल्प नाही
विचारांचे पीक मेंदूच्या कोरडवाहू, बागायतीवर ठरतं.
विचार ठरवतं पिकांचा ग्लायसेमिक इंडेक्स.
नात्यांना ही पीएच लेव्हल असते म्हणूनत्यांनाही लॉक अनलॉक करता आलं पाहिजे.
इच्छाअकारहीन अमिबा आहे म्हणून तर व्यक्तिमत्त्वाला कंगोरे आहेत.
आपण कोणाच्या मर्जीत आहोत म्हणजे त्यांच्या देवघरात आपलीही छोटी मूर्ती असणं.
नातीं जेव्हा घरातून हद्दपार होतात तेंव्हा शोभेचे निवडुंग घर सजवतात.
क्षणांच ओझं जेव्हा मणांच होतं तेव्हां मनाच्या अस्तित्वाचा कसं लागतो.
शरीरातलं मन फुलवणें म्हणजे
स्वत:च्या जिवनाचं शिल्प स्वत:ला कोरता येणं.
डॉ.अनिल कुलकर्णी.


15 

Share


Dr.Anil Kulkarni
Written by
Dr.Anil Kulkarni

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad