Bluepadशेतीविषयक लेख
Bluepad

शेतकरीपुत्राने शून्यातून उभारला कृषीप्रक्रिया उद्योग

D
Deepak k. Ahire
3rd May, 2020

Share


नासिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील श्री संतोष गायकवाड यांनी शास्त्र शाखेतील पदवी घेतली एकत्र कुटुंबात शिक्षण घेतले. वडिलांचा शेती व्यवसाय म्हणून अभ्यासाऐवजी शेतात कामाला प्रथम प्राधान्य दिले. शेतीचे तुटपुंजे उत्पन्नावर उदरनिर्वाह चालवायचा, निव्वळ शेतीवर कुटुंबकबिला चालवणे अवघड व्हायचे ही परिस्थिती बदलण्याचा चंग श्री. संतोष गायकवाड यांनी बांधला त्यांनी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या बंधू दीपक सोबत चर्चा केली. प्रथम शेती आधारित रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू केला आणि सुदर्शन नर्सरी हा व्यवसाय आकारास आला. शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांना विविध रोपांची गरज असते ही रोपे देण्याचे काम सुदर्शन नर्सरीमध्ये चालू केले सुरुवातीला द्राक्ष रोपे देण्याचे काम केले. आपण स्वतः द्राक्ष लागवडीला सुरुवात करावी या हेतूने प्रथम पाच एकरावर व टप्प्याटप्प्याने दहा एकरावर द्राक्ष शेती वाढवली नर्सरीच्या माध्यमातून शेतीचा विकास घडवून आणला. द्राक्ष नर्सरी ग्राफ्टिंगचा यशस्वी प्रयोग केला असल्याची माहिती संतोष गायकवाड यांनी दिली. सुदर्शन नर्सरी उद्योगाचा विस्तार चांगल्या प्रकारे परिसरात झाला म्हणून एक पाऊल पुढे टाकावा या उद्देशाने शेतीच्या बी बियाणे व खते, औषधाचे दुकान असलेले सुदर्शन शेती उद्योग या व्यवसायाची मुहूर्तमेढ केली उद्योग व्यवसायाच्या सर्वच टप्प्यावर बंधू दीपक यांची मोलाची साथ मिळत गेली म्हणून सुदर्शन शेती उद्योग हे कृषी सेवा केंद्र सुरू केले. परिसरातील शेतकऱ्यांशी संबंध नर्सरीच्या निमित्ताने होते. खात्रीशीर व वाजवी दर ठेवत शेतीच्या साहित्याची विक्री सेवा सुरू केली यातून शेती विकासाची सर्वांगीण वाढ होण्यास मदत झाली परंतु सतत काही ना काही चांगले बदल घडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असलेल्या श्री संतोष गायकवाड यांचे मन अस्वस्थ होते या सर्व उद्योगातून व्यवस्थित घडी बसली होती परंतु त्यांचे मन एवढ्यावर समाधानी नव्हते म्हणून त्यांनी स्वतंत्र बेदाणा निर्मितीचा व्यवसाय करण्याचे ठरवले अशाप्रकारे श्री संतोष गायकवाड यांनी सुरु केलेल्या सुदर्शन बेदाणा निर्मिती उद्योगाची सुरुवात झाली एवढं सगळं करत असतांना द्राक्ष एक्सपोर्ट शेतकरी ते बेदाणा उत्पादक शेतकरी एवढी ओळख त्यांनी निर्माण केली. सतत काहीतरी नवीन आणि आश्वासक वाटचाल व्हावी म्हणून शेतीतले त्यांचे स्टार्टअप चांगल्या रीतीने त्यांनी विकसित केले यामागे कुठलेही व्यावसायिक मार्गदर्शन किंवा प्रेरणा नव्हती असे श्री संतोष गायकवाड यांनी सांगितले. जे उद्योग-व्यवसाय सुरू केले त्या त्या वेळेस त्यांचा मार्केट सर्वे करायचा, बाजारातील मागणी यांचा ताळमेळ बसवायचा आणि उद्योग व्यवसायाला सुरुवात करायची असा सरळ सोपा सिद्धांत श्री गायकवाड यांनी अंगीकारला आणि उद्योग व्यवसायात यशस्वी होत गेल्याचे त्यांच्या उद्योजकीय जीवन प्रवासावरून लक्षात येत राहते स्वतः द्राक्ष उत्पादक शेतकरी असल्यामुळे बेदाणा निर्मिती करणे अवघड गेले नाही परंतु बेदाणा निर्मिती उद्योगच का करावासा वाटला या माझ्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले की, मी या व्यवसायात येण्याचा हा विचार होता की आपल्या बागेतले द्राक्षमणी पिंपळगावला जाऊन विकायचे मग पैसे मिळायचे जाण्या-येण्यात दोन तासाचा वेळ जायचा तेवढा वेळ बेदाणा निर्मितीसाठी दिला तर त्यातून प्रक्रिया हाेवून मूल्यवर्धन होईल व चांगला भाव मिळेल या दृष्टीने विचार करण्यास सुरुवात केली हा विचार त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रा.राजपूत सर,पाटील सर यांची भेट घेऊन बाेलून दाखवला त्यांनी तांत्रिक माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. सुयाॆ गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले या सर्वांच्या विचारातून बेदाणा निर्मिती केली असल्याचे श्री. गायकवाड यांनी सांगितले. बेदाणा निर्मितीचा प्रारंभ करण्यापूर्वी काही बेदाणा निर्मितीचे प्लॉट बघितले प्रारंभी शेड बांधणीचा खर्च नको म्हणून घरच्याच तयार कांद्याच्या चाळीचा उपयोग केला. सय्यद पिंपरीचे मामा मुरलीधर उखाडे यांच्याकडून बेदाणा निर्मितीसाठी जे केमिकल लागते ते आणले. कमीत कमी संसाधनावर बेदाणा निर्मिती सुरू केली कुठल्याही प्रकारचे शास्त्रोक्त प्रशिक्षण नव्हते. फक्त प्रॅक्टीकली करण्यावर भर दिल्यामुळे मला थोडी धास्ती होती म्हणून दुसरा कोणाचा माल खरेदी करण्यापेक्षा घरच्या द्राक्षबागेतील निघालेल्या मालावर केमिकलची प्रक्रिया केली साधारणतः २० हजार किंमतीचा तो माल होता त्याचे बेदाणे तयार केले. बेदाण्याची साठवणूक कशी करावी हे माहीत नसल्याने ते घरातच ठेवले असे श्री. गायकवाड यांनी सांगितले वातावरणाच्या परिणामाने म्हणा किंवा व्यवस्थित काळजी न घेतल्याने बेदाणे काळे पडून कीड लागली श्री संतोष गायकवाड यांच्याकडून बेदाणा बनवण्याची पद्धत चुकली होती. प्रथमच चुकीच्या पद्धतीने बेदाणे केल्यामुळे फटका बसला असल्याचे त्यांनी सांगितले.तयार केलेल्या मालाचे किरकोळ पैसे मिळाले. मेहनत,वेळ,निर्मिती खर्च याचा विचार केला तर हा मोठा तोटा श्री गायकवाड यांना बसला त्यानंतर आपले काय चुकले? पद्धत कशी वापरावी?याबाबतीत स्वतःच स्वतःचे परीक्षण केले.काय चुका घडल्या त्या दुरुस्त करून दुसऱ्या वर्षी मोठ्या उमेदीने बेदाणा निर्मिती केली ती आजतागायत चालू आहे. सुरुवातीला श्री गायकवाड यांच्याकडे मालवाहतुकीसाठी साधन नसल्यामुळे बैलगाडीने द्राक्ष मण्यांची वाहतूक करत. अनेक वेळा द्राक्ष माल मिळत नव्हता. मालाचे पेमेंट लगेच द्यावे लागायचे, बेदाण्याचा तयार माल व्यापारी कमी किंमतीत घ्यायचे अशा अनेक समस्या गायकवाड यांना आल्या ते यामुळे खचायचे. पण त्यांचे काका वेळाेवेळी धीर द्यायचे, त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे माझा उत्साह वाढल्याचे श्री संतोष गायकवाड यांनी सांगितले आज सुदशॆन बेदाणा उद्योगाची उलाढाल ८० ते ९० लाखांच्या जवळपास आहे. मागील वषीॅ १८० टन बेदाण्याचे उत्पादन केले असून वाहतूकीसाठी २ वाहने आहेत. अशा प्रकारे श्री. संताेष गायकवाड या शेतकरीपुत्राने शून्यातून कृषी प्रक्रिया उद्योग उभारला आहे. - दीपक केदू अहिरे, नाशिक ईमेल- deepakahire 1973@gmail.com      

7 

Share


D
Written by
Deepak k. Ahire

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad