Bluepad | Bluepad
Bluepad
व्यक्त होणं इतकं अवघड आहे का ?
मयुर
मयुर
6th Jul, 2020

Share

1) *खरंच, व्यक्त होणं इतकं अवघड आहे का?* - लेखांकन *मयुर वाघमारे लातूर अगदी काल परवाच सुशांत.... शांत झाला. अर्थात त्याने तसे का??? केल किंवा त्याच्याकडून ते तस का झालं हे विचारण्यास आता खूप उशीर झाला आहे....येणाऱ्या काळात त्याच्याशी निगडित अनेक बाबी समोर येतीलच...पण तरीही.. पण का? याचा विचार केल्यास असंख्य उत्तरे समोर येतील... पण त्यातील एक म्हणजे त्याला व्यक्त होण्यापेक्षाही मरण अधिक श्रेयस्कर वाटलं... म्हणजे निश्चितच एका अर्थाने व्यक्त होणं त्याला खरंच किती अवघड वाटलं असेल.... खरंच व्यक्त होणं एवढं आहे का???...तर याच उत्तर हो असंच द्यावे लागेल... अगदी दोनच दिवसापूर्वीच संजय आवटे यांचा 'जगू या, जिकू या! हा लेख वाचनात आला त्यातील सलमान खान याच्या मुलाखतिचा भाग मी इथं एक उदाहरणं म्हणून देत आहे...कारण हे उदहारण आपल्या विषयाची दाहकता अत्यन्त प्रकर्षाने करून देते म्हणून... सलमान खान याला त्याच्या एका मुलाखती दरम्यान विचारलं गेलं होतं की...तुझं दुःख तू कोणाशी शेअर करतोस?... तोवर पोरकट हसत जोक्स मारणारा सलमान एकदम थबकला... गंभीर झाला.... म्हणाला... कोणाशीच नाही! कारण समजा मी माझ्या सहकाऱ्यासोबत दुःख शेअर केलं, तर ते मला समजावतील. पण, खासगीत हसतील. माझा रडका चेहरा बघून खुश होतील. माझ्या काही मित्रांशी मी ते शेअर करू शकतो. पण, मला भीती आहे की, त्यांना याचाच आनंद होईल की साक्षात सलमान आपल्याशी एवढं पर्सनल काही शेअर करतोय! माझ्या खांद्यावर हात ठेऊन, मला समजावताना काही लोकांचा इगो सुखावेल. आईसारखे काही खूप जवळचे लोक आहेत, ज्यांच्याशी मी हे शेअर करू शकतो. पण चिंता अशी आहे की, हे लोक त्यामुळे स्वतःच एवढे निराश होतील, की मला भीती वाटते. त्यामुळे अद्याप तरी मला असं कोणी मिळालेलं नाही की ज्यांच्याशी मी माझं दुःख शेअर करू शकेन! अर्थात वरील घटनेत जे सलमान खानला वाटत ते आपल्यातील प्रत्येकाला... हो प्रत्येकाला वाटत... पण फरक फक्त एवढाच की..ते वाटणं कमी अधिक प्रमाणात असत... तसेच प्रत्येकजण आपल दैन्य, अगतिकता, एकाकीपण मान्य करून... ते असं उघडपणे व्यक्त करेल किंवा बोलेलच असं नाही...कारण बहुतेकजण आपलं एकाकीपण एकवेळ मान्यही करतील... पण ते असं उघडपणे व्यक्त करणारे मोजकेचं... कारण हे असं उघडपणे मान्य करण्यास धाडस लागते...आणि ते प्रत्येकाकडे असेलच असे नाही....सलमानची ही गोष्ट अप्रत्यक्षरित्या व्यक्त होणं किती कठीण झालं आहे हेच सूचित करते.. खरंच, व्यक्त होणं इतकं अवघड का होत चाललं आहे.. याचा जरा थोडासा खोलवर जाऊन विचार करू. प्रकृती अंतर्गत व्यक्ती आणि समाज हे हळू हळू विकसित होत गेले...व्यक्ती आदी आणि समाज नंतर विकसित होत गेला... व्यक्ती हा निसर्ग निर्मित घटक...तर समाज ही मानव निर्मित संस्था आहे... हे सर्वप्रथम लक्षात घेणे गरजेचं आहे... हळू हळू समाज जस जसा उक्रांत होत गेला तसा व्यक्ती आणि समाज यामध्ये सुप्त असा संघर्ष निर्माण झाला... तो कसा हे आपण पुढे सविस्तरपणे पाहूच... पण याची परिनीती आज व्यक्ती अधीक समृद्ध होण्याऐवजी त्याच्या मुळ प्रवृत्तीच दमन झाल्यामुळे ती अधिक विकृत होण्यास सुरवात झाली आहे... आज प्रत्येक व्यक्तीला स्वतःला तो जसा आहे तसा व्यक्त होणंही कठीण होऊन बसलं आहे... मुळातच मानवी मन आणि त्याचे स्वरूप... तसेच त्यामध्ये येणारे विचार हे अनाकलनिय असेच असतात...वैज्ञानिक असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये दैनंदिन साठ हजार विचार येतात...अर्थात ते विशिष्ट प्रकारचे असतात त्यामुळे यावर विश्वास ठेवणं थोडं जड जात... मानवी मनामध्ये कधी कोणता विचार येइल हे सांगणं अत्यन्त कठीण... कारण त्याला काळ, वेळ, स्थळ, परिस्थिती, नैतिक -अनैतिक, शील-अश्लील, बरे-वाईट, कायदेशीर-बेकायदेशीर... यासारखी असंख्य बंधने किंवा भेद नसतात... बस ते येतात... जे विचाराच्या बाबतीत घडत तेच कमी अधिक प्रमाणात भावनांच्या बाबतीतही घडत...आणि कोणत्याही व्यक्तीची वर्तनुक निर्धारित करण्यात... त्याच्या मुळ उपजत प्रेरणा म्हणजेच... त्याच्या भावना आणि विचार हे अधिक प्रभावी ठरत असतात... पण जस जसा मानवी समाज अधिक विकसित होऊ लागला तस तसे कळतं नकळत मानवाच्या मुळ वृत्तीवर बंधने घालणाऱ्या अनेक सामाजिक... प्रथा, परंपरा, संकेत, नीती, नियम, जात, धर्म, पंथ, बरे - वाईट, योग्य - अयोग्य, शील - अश्लील, नैतिक - अनैतिक, पाप - पुण्य, स्वर्ग - नर्क, देव - दानव... यासारखे असंख्य भेद उदयास आले... त्यामुळे अप्रत्यक्षरित्या व्यक्तीच्या व्यक्त होण्यावर पावलोपावली असंख्य मर्यादा येऊ लागल्या... त्यामुळे व्यक्तीला आपल्या मुळ भावना आणि विचार यांच्याशी प्रामाणिक राहून व्यक्त व्हावं म्हटलं तरी पंचायत आणि न व्हावं तरी पंचायत...अशी परिस्थिती आहे... कारण व्यक्तीच्या मुळ प्रवृत्ती या भेद मानायला तयार नाहीत आणि समाजात जगताना व्यक्तीला क्षणा क्षणाला तुलनात्मक भेदास अनुसरूनच आपले जीवन जगावे लागत आहे... त्यामुळे असणं आणि दिसणं... यात कमालीचा फरक पडू लागला आहे... व्यक्तीच दैनंदिन जीवन म्हणजे जणू काही रंगभूमी झाली आहे... प्रत्येक पावलागणिक त्याला अभिनय करावा लागत आहे. चालणं, बोलण, लिहणं, हसणं, उठणं, खान, पिन.. यासारख्या असंख्य छोटया - मोठया गोष्टीच्या माध्यमातून तो स्वतःला सतत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.... पण या छोट्या वाटणाऱ्या गोष्टीही नैसर्गिकपणे व्यक्त करण्यावर असंख्य बंधने येत आहेत... एखादा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मोठयाने हसली तरी लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने बगतात... एखादी व्यक्ती भावनाप्रधान असते... त्यामुळे कधीतरी त्याच्या भावना अनावर होतात... साहजिकच डोळ्यामध्ये अश्रू येतात....आणि त्यात तो जर पुरुष असेल तर, पुन्हा त्याच्याकडेही तेच आश्चर्यजनक नजरेन पाहणं आलंच ! एखाद्याच्या लग्नात थोडं जरी अंग सैल सोडून नाचले की... लगेच म्हणतात... पिला असेल! म्हणजे मनमुराद नाचन्यासाठी पिन ही जणू पूर्वअटच !... हे असं प्रत्येक बाबतीत घडत आहे... एखादी गोष्ट एका विशिष्ट पद्धतीने केली तरच ती योग्य... थोडं जरी इकडं तिकडं झालं तरी... ती गोष्ट करणाऱ्या व्यक्तीला लगेच निकालात... म्हणजे वेड्यातच काढले जाते... वरील सर्व कारणामुळे व्यक्ती आज कमालीचा कृत्रिमपणे वागू आणि जगू लागला आहे... त्यामुळे दैनंदिन जीवन जगत असताना पावलो पावली त्याच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या... राग, द्वेष, दुःख, इर्षा, हसणं, रडणं.. यासारख्या कित्येक नैसर्गिक भावना तो दाबून ठेवू लागला आहे.... आणि या दमीत झालेल्या भावनाच त्याला शारीरिक आणि मानसिकरित्या विकृत करत आहेत... आज मानवाला होणारे कित्येक आजार हे मनोशारीरिक आहेत... सिग्मड फ्रॉइडचे संपूर्ण मानसशास्त्र हे मानवी मनामध्ये दमीत झालेल्या भावनावरतीच कार्य करते... मानसिक रुग्णावर उपचार करणे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून... केवळ व्यक्तीच्या मनामध्ये दमीत झालेल्या भावनांना एका विधायक रीतीने व्यक्त होण्यास उपलब्ध करून दिलेली संधीच असते.... वरील सर्व सामाजिक अडथळे स्वीकारून... एखादा व्यक्ती जरी आपल्या मनातील सर्व खदखद, वैचारिक - भावनिक वादळे, स्वतःचे सर्व गुण - दोष स्वीकारून... तो स्वतःला जसा आहे तसा... व्यक्त होण्यास तयार झाला तरी... आपला समाज त्याला पूर्णतहा स्वीकारू शकेल??? ...आज प्रत्येक बाबतीत चांगल ते स्वीकारायच आणि वाईट ते झीडकारायच हा जणू अलिखित नियमच झाल्यासारखे सर्वजण वागत आहे... खरंच कोणी सर्व गुणसंप्पन असत का?... मग का हा अट्टहास ! निश्चितच आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणं हे चांगलंच... पण त्याचा अतिरेक वाईट. काटे हे फुलांच्या सुरक्षिततेसाठी असतात... अंधार आहे म्हणूनच येणारा दिवस आपण अधिक उत्साहाने जगू शकतो... दुःख आहे म्हणूनच सुखाला गोडी आहे... मृत्यू आहे म्हणूच जन्म होतो ना.... हे असं प्रत्येक बाबतीत आहे..... याचा अर्थ असा होत नाही की.. पहिली गोष्टी आहे म्हणून दुसरीला किंमत आहे... तर दोन्ही गोष्टी या संपूर्ण अस्तित्वाचा म्हणजेच...पर्यायाने जीवनाचा अविभाज्य भाग आहे.... हे ज्या वेळी आपण पुर्णता स्वीकार करू त्यावेळी जगणं आणि व्यक्त होणं हे अधिक आनंददायी होईल. खरंच, पूर्णतः व्यक्त होणं खूप अवघड असत... त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन चांगला... पण संपूर्ण स्वीकार अतिशय सुंदर आणि सर्वसमावेश... व्यक्ती आणि समाज दोन्हीसाठीही...

18 

Share


मयुर
Written by
मयुर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad