Bluepadकविता
Bluepad

कविता

D
Deepak k. Ahire
3rd May, 2020

Share

माझ्या दुःखाचे गणित
तुम्ही घ्या समजून,
करावी सुखाची बेरीज
वजाबाकी वगळून
माझ्या दुःखाचे गणित
त्याला देताे आकार,
गुणाकार करताे आनंदाचा
नाही करत भागाकार
माझ्या दुःखाचे गणित
भाग काही उरत नाही,
वजाबाकी किती करावी
दुःख संपतच नाही
माझ्या दुःखाचे गणित
बेरजेने मी साठवताे,
आयुष्याच्या कढईत
सुखाची बेरीज करताे
-- दीपक के. अहिरे,
नाशिक

2 

Share


D
Written by
Deepak k. Ahire

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad