आदरणीय सारे गुरूजन
वंदन तुम्हांस मनोमन
तुमच्याच हातून घडले सारे
कच्च्या मातीचे पक्के घडे
शिकवून लिहायला वाचायला
सोबत गिरवून आयुष्याचे धडे
तुमच्याच अनुभवातून आम्हांला
अवगत झाली जगण्याची कला
नवनवीन तुमच्या प्रयोगातून
मग आवडू लागली शाळा ज्याला त्याला
जरी खाल्ला असला बेदम मार
आशिर्वादासाठीही उठायचे तेच प्रेमळ हात
सा-या मुलांसाठी एकच माया
जणू आईची पाघंरूण काया
असं हे गुरू शिष्याचं आपलं नातं
रक्ताच्या नात्या पलिकडचं
अतूट निरतंर न संपणार
तरी जिव्हाळ्याचं, प्रेमाचं
सदा असू देत गुरूआशिष
आम्हां सा-यांच्या शिरावरी
अनंत उपकार तुम्हां सा-यांचे
काय देऊ गुरूदक्षिणा तरी........