Bluepadबापमाणूस
Bluepad

बापमाणूस

Nutan Gurav
Nutan Gurav
5th Jul, 2020

Share

बाबा...... खूप काही सांगून जातो हा शब्द...... वाचला तर फक्त शब्द पण अनुभवला तर खूप साऱ्या आठवणी....... माझ्यासाठी सुद्धा असच...
खरं सांगायचं तर माझं नि बाबांचं relation हे long distance relationship आहे...... पण हो.. यात आठवणी देखील खूप आहेत..... दोन वर्षानी एकत्र अनुभवलेली बाबांसोबतची तीन महिन्यांची सुट्टी, network च्या आवारात जाऊन phone वरच ते तासनतास बोलणं.., आणि आता तर काय video call......
आता सांगायचं झालं तर... माझा जन्म झाला नि बाबांना बहरीन ला job offer आली. आता तुम्हाला हे फिल्मी वाटेल.... पण खरं आहे. त्याचवेळी आम्हाला गावाला सोडून बाबांनी मुंबई सोडली, ती कायमची.. आता फक्त airport ला उतरून गावाला यायची train पकडेपर्यंतचंच काय तो मुंबईशी संबंध येतो....
बाबा ज्यावेळी पहिल्यांदा गावी आले त्यावेळी मी पाच वर्षाची होते मी बाबांना भेटायला गाडीवर गेले जाताना सोबत बाबांचं एक जुना फोटो घेऊन गेले बाबा भेटल्यानंतर तो त्यांच्या चेहऱ्याशी match केला आणि मग बाबांना पहिली मिठी मारली..... आता ते आठवल्यावर खूपच बालिश असल्यासारखं वाटत.. पण मग लक्षात येत आपणही लहानच होतो कि......
त्यांनतर दिवस पुढे जात होते, मी मोठी होत गेले, बाबांचं हे असच दोन वर्षानी येन सवय होऊन गेली या सर्वांची........
पण आईसोबत नेहमी जवळ राहून देखील आम्ही तिघीही बाबांच्या जास्त जवळ गेलो....., ते बोलतात ना जर एखादी गोष्ट लांब असेल तरच त्याची किंमत जास्त समजते, तसच काहिस आमच्या बाबतीतही झालं असावं कदाचित.
पण आमच्यात आजवर communication gap नावाचा प्रकार कधीच जाणवला नाही.
पण ते बोलतात ना वाट पाहताना खूप मज्जा येते, त्यामध्ये त्या गोष्टीची आतुरता, ओढ सर्वच लपलेल असत तसेच काहीस बाबा गावाला येण्याची वाट पाहताना होत.
मला बाकीच्यांसारखं बाबांचे कष्ट, थोरवी याबद्दल नाही बोलायचंय कारण या सर्व गोष्टी असतातच पण त्यासोबतच प्रेम आणि बोलण्यातला मोकळेपणाही खूप महत्वाचा असतो. असा मोकळेपणा आमच्यात तरी नक्कीच आहे. यामध्ये तर शाळेतल्या crush पासून ते या मुलाला पटवेपर्यंत अगदी......... !!!!
So........ ही सर्व आहे माझ्या बापमाणूसाची story जास्तीत जास्त दूर राहून एकमेकांच्या आठवणीत रमणारी आणि ही आठवण बाबा परत येईपर्यंत साठवून ठेवणारी.......... !!
या दोन ओळी बाबांसाठी.........
तू येतोस तेव्हा खूप आठवणी देऊन जातोस...,
तू जाताना मात्र, अश्रू साठवून जातोस....,
तुझ्या येण्याची तयारी पूर्ण वर्षभर चालू असते....,
तुझ्या परतन्याची तयारी.., मात्र करूच नये असे वाटते..... !!
I love you papa......
@nutansujit25

9 

Share


Nutan Gurav
Written by
Nutan Gurav

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad