Bluepadप्रेमाची गोष्ट...... नि गोष्टी पलीकडले प्रेम.
Bluepad

प्रेमाची गोष्ट...... नि गोष्टी पलीकडले प्रेम.

डॉ अमित.
डॉ अमित.
5th Jul, 2020

Share

प्रेमाची गोष्ट...... नि गोष्टी पलीकडले प्रेम.

रविवार......सुट्टीचा वार.
नव्हे क्षणभर विश्रांतीचा हक्काचा वार.
कधी तो सुस्तावलेला असतो तर कधी स्फुर्तीला.
तर कधी तो आसुसलेला असतो नव्या अनोळखी अश्या गोष्टीला.मग ती गोष्ट रील लाईफ मधली असो वा रिअल लाईफ मधली. गोष्ट म्हणजे नक्की काय असं जर मला विचारलं तर मी म्हणेन,
' जी तुमच्या मनावर इस्ट असा परिणाम करते,जी तुमच्या मनाला मोरपीसागतं हलकां फुलकां करते तीचं खरी गोष्ट'.
अशीच एक रील लाईफ मधली गोष्ट आज पाहण्यात आली.'प्रेमाची गोष्ट'.
सतीश राजवाडे दिग्दर्शित आणि अतुल कुलकर्णी अभिनित प्रेमाची गोष्ट.
गोष्ट तशी साधी,विषय जिव्हाळ्याचा आणि तोही प्रेमाचा.एका नात्याच्या शेवटा पासून सुरू होवून नव्या नात्याची सुरुवात होण्यात संपणारा या चित्रपटातील गोष्टीचा शेवट.
'साथ आणि सहवास' यातला फरक नेमका टिपणारा एक सुरेख मराठी चित्रपट.

सोबत देशील सहवास देशील
साथ देशील की नाही मज सांग
या रंग बदलणाऱ्या दुनियेत तू
एकरंग एकरूप होशील का नाही सांगआज अशी किंवा थोड्या फार फरकाने वेगळी का असेना प्रत्येक जण ही प्रेमाची गोष्ट
जगत असतो किंवा जगलेला असतो.
प्रेम ही भावना व्यक्त करून किंवा अव्यक्त राहूनही तो ही भावना मनोमन जपत असतो.

व्यक्त होण्या भावना कधी कधी
शब्दही पडतात अर्धे अपूरे
अव्यक्त राहूनही मग त्या प्रेमाची
गोष्ट होते नि मग स्वप्न होते पुरे

गोष्टीत खूप पात्र असतात.कधी ते काल्पनिक तर कधी आपल्या अगदी आसपासचे असतात.चित्रपटातला नायक म्हणतो त्याप्रमाणे मग हे पात्र आपल्याशी हितगुज करतात.कधी मित्र बनून तर कधी आप्त बनून तर कधी अलिप्त राहून हे आपल्याशी बोलत राहतात आणि मग सुरू होतो आपलाचं आपल्याशी संवाद.सुरू होतो शोधं आपल्याच अस्तित्वाचा जे कधी या रोजच्या जीवनाच्या रहाटगाडग्यात धूसर झालेले असते.
मग अलगद सापडतो आपणच आपल्याला पुन्हा एकदा नव्याने ....आणि जाणवू लागते प्रेम त्या गोष्टी पलीकडले,
न अनुभवलेले.जे आपण मिळवण्याचा करत असतो प्रयत पण ते आपल्याला हुलकावणी देत असते किंवा असे प्रेम जे आपण मिळवलेले असते पण ते आपण ओळखू शकलेलो नसतो.
म्हणूनच मी म्हणतो आपण हे प्रेम ओळखुयात,ते जपुयात आणि ते आणखी जाणीवपूर्वक खुलवण्याचा प्रयत्नही मनापासून करूयात.
आपल्या जवळच्या प्रेमाच्या माणसांना पुन्हा नव्याने प्रेमाची ओळख करून देवूयात.प्रेम व्यक्त करून दाखवूयात.

प्रेमाने पूर्णत्व येते
प्रेमानेच येते शहाणपणं
माणूस म्हणून जन्मलो जरी
प्रेमाची चाहुलच देते माणूसपणं.डॉ अमित.

14 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad