Bluepadमी की चहा...🤔
Bluepad

मी की चहा...🤔

प्रमिला प्रभु
प्रमिला प्रभु
4th Jul, 2020

Share

मी विचारलं त्याला, 'तुला मी आवडते की चहा?'
हसून मला म्हणाला, "तुझ्या हातचा चहा..."

कोडे उलगडले नाही अजून
चहामुळे मी की माझ्यामुळे चहा...

मी म्हटलं ...'आता तर निर्णय व्हायलाच हवा'
तर म्हणे ...'आपला साथीदार चहाच हवा'

मग मनात ठरवलं आता निश्चय करायलाच हवा
कारण मला संसार थाटायचाय नवा

आल्याचा तिखटपणा ,साखरेचा गोडवा आणि चहाचा रंग
दोघे नव्या संसारात होऊ अगदी दंग

आनंद- दुःख किंवा असो कसली भ्रांत
चहाच्या कपाने कधी जाणवुच दिली नाही कसली खंत

कितीही भांडलो तरी स्वारीच घेते नमते
म्हणे.. 'तुझ्या हातच्या चहानेच चहाची तलब भागते'

कुठे कसा आहे कधी कुणी पाहिला नाही स्वर्ग
आनंदी संसाराचा मात्र चहा हाच राजमार्ग...!

- प्रमिला प्रभू


15 

Share


प्रमिला प्रभु
Written by
प्रमिला प्रभु

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad