Bluepadआषाढ मेघ.
Bluepad

आषाढ मेघ.

डॉ अमित.
डॉ अमित.
4th Jul, 2020

Share

आषाढ मेघ.

आषाढ मेघ बरसतो सुरेख घन निळया आभाळाने जणू ओढली काळी कुट्ट घोंगडी स्वतःभोवती एक

घनन घन मेघांचा नाद धरती हि देते त्याला साद जणू जुनी ओळख दोघांची साथ दोघांची जन्मो जन्माची

चिंब चिंब होते हि धरती जणू नववधू न्हाहून आली ओलेती हिरवाईचा नेसून शालू सुंदर सृष्टी ही नटली भेटण्या प्रियकर

इंद्रधनु ही करतो मग अचानक सप्तरंगांची उधळण ओढ लावतो जीवाला श्रावणा पूर्वीचा हा सावन.

डॉ अमित.

13 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad