Bluepadआर यू वर्जिन..?...
Bluepad

आर यू वर्जिन..?...

Sangieta Devkar
Sangieta Devkar
3rd Jul, 2020

Share

विशाखा च्या घरी आज सगळे खुश होते आनंदात होते एका मोठ्या खानदानी घरातून तिला लग्नासाठी होकार आला होता. 15 दिवसा पूर्वी पाहुणे तिला बघून गेले होते आणि आज निरोप आला मुलगी पसंद आहे. मुलगा राजदीप त्याचे जेमतेम शिक्षण बी कॉम झालेले त्याचे वडील गावचे सरपंच आजोबा जिल्हाध्यक्ष,काका पण राजकारणात सक्रिय गावात खूप मान होता या कुटुंबाला. राजदीप दिसायला स्मार्ट त्याचा बिझनेस होता. विशाखा साधारण मध्यम वर्गीय कुटुंबातील बी.ए झालेली मुलगी नाकेडोळी छान आणि स्वभावाने शांत. लवकरच चांगला मुहूर्त बघून लग्न ठरवले होते. राजदीप गावात रुबाबात फिरायचा त्याच्या मागे मागे अनेक रिकामटेकडी मूल सतत असायची. राजदीप चे लग्न ठरले चे त्याच्या मित्रांना समजले तसे सगळे बोलू लागले त्याला राज ही मुलगी शहरात राहणारी तिचे काही अफेयर वैगरे असेल तर आणि ती अजून ही कोरीच असेल कशावरून? म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला राज ने विचारले. आज काल च्या मुली खूप फॉरवर्ड असतात, लग्नासाठी कुमारी म्हणजेच वर्जीन मुलगी मिळणं कठीणच . तसा राज म्हणाला,नाही विशाखा तशी वाटत नाही . बघ बाबा चांगली चौकशी कर नाहीतर तिलाच विचारून घे. असे काहीसे विचित्र विचार मित्रांनी राजदीप च्या मनात घातले. राजदीप ही याचा विचार करू लागला खरच विशाखा वर्जिन असेल? पण तिला विचारणार कसे ? काय करावे त्याच्या मनात गोंधळ चालला होता. त्याने या विषयावर आपल्या मोठया भावाशी बोलायचे ठरवले मग तो भावा कडे गेला आणि आपल्या मनातील शंका त्याने बोलून दाखवली. तसा भाऊ हसू लागला म्हणाला,काळजी नको करुस आपल्या घरीच ती पध्दत आहे मुलगी खरी आहे की नाही हे पाहान्याची. म्हणजे राज ला काही समजले नाही. तसा भाऊ बोलला,हे बघ तुझे लग्न झाल्यावर पहिल्या रात्री तुमचा संबंध आल्या नंतर जर विशाखा ला रक्तत्राव झाला तर समजायचे माल खरा काय समजले का ? ओहह समजले राज म्हणाला. थोड्याच दिवसात राजदीप विशाखा चे लग्न झाले . ती सासरी आली. तेव्हा तिच्या जावेने तिला विचारले विशाखा तुला एक विचारू का? हो विचारा ना ती म्हणाली. विशाखा लग्ना आधी तुझे बाहेर काही न्हवते ना? म्हणजे मी नाही समजले विशाखा बोलली . अग तुझे कोणावर प्रेम वगैरे,,, नाही पण तुम्ही असे का विचारता विशाखा म्हणाली. बर काही नाही काळजी घे इतकं जाऊबाई म्हणाली. विशाखा ला समजेना असे का विचारले. रात्री विशाखा राज च्या रूम मध्ये गेली. थोड्या वेळात राज आला तिच्या जवळ बसला तर त्याच्या तोंडातून दारू चा वास आला विशाखा म्हणाली हे काय तुम्ही ड्रिंक केलीय. हा मग त्यात काय एवढ,मी पुरुष आहे आणि पुरुष ड्रिंक करतात आमच्या घरी सगळे घेतात,त्यात विशेष काय राज म्हणाला. पण मला नाही आवडत हे ड्रिंक वगैरे ती म्हणाली . हे बघ इथे तुला काय आवडते याला काही ही किंमत नाही आम्ही जे करू सांगू ते निमूट ऐकायचं समजले सगळ्या घरातल्या बायका तेच करतात राज म्हणाला. इतक्यात दार वाजले म्हणून राज दार उघडायला गेला त्याची आई आली होती आणि त्यांच्या हातात पांढरी बेडशीट होती ती त्यांनी राज ला दिली आणि बेड वर टाक म्हणाल्या. विशाखा म्हणाली आता हे काय.? ही बेडशीट आहे बेडवर टाक विशाखा ला इतके काही समजले नाही तिने ती बेडशीट टाकली . आणि दिवे बंद करून राज फक्त लांडगया सारख्या तिच्यावर तुटून पडला तिला समजेना हा काय प्रकार अशी असते पहिली रात्र पन ती चुपचाप त्याचे अत्याचार सहन करत राहिली. सकाळी तिला जाग आली तिचे अंग वेदनेने ठणकत होते. तेवढ्यात दारावर थाप पडली तिने दार उघडले आई बाहेर होत्या तिने विचारले काय काम आहे तसे आई बेधडक आत आल्या आणि त्यांनी राज ला उठवले राज उठला आणि बेड वरची बेडशीट पहिली तर ती आहे तशी सफेद च होती हे पाहून आई भडकल्या म्हणाल्या राज ही मुलगी कोरी नाही बघ हिला रक्तत्राव झाला नाही . राज ने हे पहिले आणि विशाखा ला म्हणाला,तू फसवलेस मला तू वर्जिन नाही आहेस . विशाखा रडत रडत म्हणाली नाही मी खरे बोलते माझे लग्ना आधी कोणाशी संबंध न्हवता. तसा राज भडकला म्हणाला,मग तुला रक्तत्राव का नाही झाला,मला मूर्ख समजतेस का? आमच्या घरी ही पद्धत आहे या वरून समजत मुलगी कशी आहे आणि सगळ्याच जणी या परीक्षेतुन जातात समजल . तुझी बॅग भर आणि जा तुझ्या घरी असली उष्टी बायको मला नाही चालणार राजदीप बोलला. विशाखा ने त्याचे पाय धरले म्हणाली अहो अस काही नाही मी काही चुकीचे वागले नाही कोणाशी माझं अफेयर न्हवत,मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगते प्लिज माझ्या वर विश्वास ठेवा. पण त्या घरात तीच ऐकणार कोणी न्हवत. माल खोटा निघाला मग तिला या घरात जागी नसायची ही पद्धतच होती या खानदानी घराची. विशाखा ला आता तिथे काही स्थान न्हवते तिला तिच्या घरी पाठवून  दिले. विशाखा च्या घरी सर्वाना हा धक्काच होता. आज च्या काळात ही अशी प्रथा अजून ही अवलंबली जाते हा प्रश्न होता. विशाखा फक्त रडत होती तिने राजदीप ला फोन केला पण त्याने उचलला नाही. तिला हेच समजेना की यात तिची चूक काय? ती कुमारिकाच होती पण ते सिद्ध करावं लागतं हे तिच्या गावी ही न्हवते.रेणू विशाखाची मैत्रीण तिला भेटायला आली होती कारण तीला तिच्या लग्नाला यायला जमले न्हवते. रेणू आली तिने विशाखा ला विचारले काय मग कसे आहेत आमचे जीजू ? पण विशाखा  हे  ऐकून रडू लागली . काय झाले विशाखा तू रडतेस का? मग विशाखा ने जे घडले ते सगळं रेणू ला सांगितले तसे रेणू म्हणाली अग किती भयंकर आहे हे आणि आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या काळात हे घडत तू गप्प कशी काय राहू शकतेस विशाखा? हा एक प्रकारचा अन्यायच आहे याच्या विरोधात तुला आवाज उठवलाच पाहिजे नाहीतर अजून किती विशाखा या क्रूर प्रथेला बळी पडतील. पण रेणू मी काय करू शकते ते लोक खूप मोठी आहेत पैशाने आणि मानाने. कसली प्रतिष्ठा विशाखा असल्या लोकांची किती हलक्या वृत्तीचे लोक आहेत हे आज 21 व्या शतकात पण या अंधश्रधेला चीटकून आहेत तू चल माझ्या सोबत आपण त्याची पोलिसां कडे तक्रार करू हा तुझ्या चारित्र्य वर त्यांनी घेतलेला संशय आहे तुझे चारित्र्य हनन करण्याचा त्यांना काहीही हक्क नाही आज तुही तुझे अधिकार,हक्क मिळवू शकतेस अशा लोकांना धडा शिकवायलाच हवा चल उठ असे म्हणत रेणू विशाखा ला घेऊन घरा बाहेर पडली..
आज ही काही समाजात ही कौमार्य चाचणी ची परीक्षा घेतली जाते. भारतातच न्हवे तर बाहेरील देशात सुद्धा वर्जिनिटी चेक केली जाते. अलीकडे आपल्याच शहरात ही न्यूज पेपर आली होती की एका नवविवाहितेची कौमार्य चाचणी केली गेली ती ही सुशिक्षित घरामधये.स्वतंत्र भारतात एकविसाव्या शतकात काही समाजातल्या ‘तिची’ मात्र आजही लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेतली जाते. जग कितीजरी पुढे गेले असले तरी अजुनही काही समाज आपल्या प्रथांमध्ये घुटमळत आहेत. त्यांच्या या घुटमळीत कुठेतरी मुलींच्या सन्मानाचा आणि अभिमानाचा बाजार मांडला जातोय हे नक्की.
या समाजात केवळ मुलीगीच चारित्र्यवान आहे का ? हे पाहिलं जातं.  इथे कुठेच मुलासंदर्भात अशी चाचणी किंवा अशी प्रथा नाही. यामुळे स्त्री-पुरुष समानतेचादेखील प्रश्न उपस्थित होतो. मग मुले व्हर्जिन आहेत का? त्यांना चारित्र्यवान कसे ओळखायचे असे अनेक प्रश्न मुलींच्या मनात येतात. या प्रश्नांवर समजातील लोकांकडे उत्तर कुठेच नाही. यासर्व परिस्थितीवरून एकच लक्षात येते की मुलींना एक माणूस म्हणून वागवले जात नाही. म्हणूनच म्हणते स्त्रीला एक माणूस म्हणून जगू द्या. या गोष्टीत आहे का स्त्री पुरुष समानता?


28 

Share


Sangieta Devkar
Written by
Sangieta Devkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad