Bluepadआयुष्य..... मेमरी नि आठवण यांच्या मध्ये गुंफलेले.
Bluepad

आयुष्य..... मेमरी नि आठवण यांच्या मध्ये गुंफलेले.

डॉ अमित.
डॉ अमित.
29th Nov, 2021

Share

आयुष्य..... मेमरी नि आठवण यांच्या मध्ये गुंफलेले.


आजकाल सगळीकडे 'मेमरी' हा शब्द खूप प्रचलित झाला आहे...नुसता प्रचलित नाही तर ज्याच्या त्याच्या ओठावर मेमरी हा शब्द आहे....
मग ती स्मार्टफोन ची असो किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची असो...जितकी जास्त मेमरी मिळेल अमुक जीबी तमुक जीबी, तितकी हवी आहे आपल्याला ..हो की नाही?
पण या स्मार्ट वाटणाऱ्या मेमरी पुढे माणसाच्या भाव भावनांची,आयुष्य जगताना अनुभवणाऱ्या गोष्टींची,नात्यातल्या परस्पर संबंधांची आणि त्या आठवणींची मात्र आपण गफलत करतो आहोत...मेमरी पुरेपूर ठेवण्याच्या नादात आपण आठवणींचा मात्र पार विसर पाडतो आहोत..
आजही आपल्याला सगळ्यात जास्त काही सुख देत असतील तर त्या म्हणजे बालपणीच्या सुखदं आठवणी नि आयुष्यातील आनंदाच्या, महत्वाच्या प्रसंगातील अनुभवलेले क्षणं..नव्हे का?
गॅझेटसच्या मेमरी चा आपण एवढा विचार करतो पण देवाने आपल्याला बहाल केलेल्या सगळ्यात जास्त मोठी क्षमता असलेले मेमरी कार्ड ज्याला आपण मेंदू असे संबोधतो त्याचे काय?
गॅझेट्सच्या मेमरी ला भावनांची जोड थोडीच असते?पण मेंदू ला मात्र मनाची,संवेदनांची जोड असते.
आपण सहज विसरतो आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी लहानपणी काढलेल्या खस्ता...आपण आजारी असताना जागवलेली आख्खी रात्र,प्रेमाने भरवलेला चिऊ-काऊचा तो इवलासा घास,आपल्याला आपल्या पायावर उभे करण्यासाठी,आपल्या शिक्षणासाठी झिजवलेले त्यांचे संपूर्ण आयुष्य..
प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांच्या वृद्धापकाळात आपले भविष्यातील म्हातारपणं पहावे आणि त्यांच्या डोळ्यात आपले भूतकाळातील बालपणं पुन्हा अनुभवावे....नव्याने जगावे.
आपल्या पत्नीने आपल्यासाठी,आपल्या घरासाठी,आपल्या मुलांसाठी केलेलं समर्पण आठवावे....तिला तिच्या या कामाची कौतुकाने न चुकता पावती द्यावी...
आपल्या मित्रांनी आपल्या अडचणींच्या वेळेस दाखविलेल्या सहृद्याची,केलेल्या मदतीची सदैव आठवण ठेवावी...
मैत्री...मरेपर्यंत इतरावी,मिरवावी अशी मैत्री जपावी..
आणि हो त्या ईश्वराची ज्याने आपल्याला हे सुंदर आयुष्य दिले....ते उत्स्फूर्त पणे जगायला एक सुंदर मन दिले...त्या ईश्वराची सुद्धा फक्त संकटात आठवण न काढता...आपल्या सुखात देखील त्याची आठवण काढावी...त्याचे मनापासून आभार मानावे...
खरेच जेंव्हा आपण या आर्टिफिशियल मेमरी तून बाहेर पडून खऱ्या खुऱ्या आठवणींना उजाळा देऊ,
मेंदूच्या अमर्याद G B- GOD BLESSED मेमरी ला जपू तेंव्हा आयुष्य आणखीनच सुदंर होईल.... मेमोरेबल होईल..नाही का?


आठवावे किती स्मरावे किती
आयुष्य हे इतके सुंदर जपावे किती..

मायेची ओढ नि प्रेमाची ऊब
आयुष्य जगताना लपेटून घ्यावी किती

मैत्रीची खाण नि आपुलकीची खाण
ईश्वराच्या या कृपेचा धन्यवाद द्यावा किती

सुख वाटावे नि दुःख विसरुनी जावे
जगण्याची हीच सुंदर रीत वर्णावी किती.


डॉ अमित.


15 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad