Bluepadप्रेम आंधळं असतं.. पण इतकं ..!!!!
Bluepad

प्रेम आंधळं असतं.. पण इतकं ..!!!!

अकल्पिता
अकल्पिता
2nd Jul, 2020

Share

(भाग-१ नक्की वाचा)


भाग-२

“असं काय केलं आहे या लोकांनी? ह्यांनी कोणाचा खून तर नाही ना केला??” असं म्हणून माधुरी हसु लागली.
”हो!!! केला आहे.” नम्रता असं सांगून तिच्या घरी निघून गेली.
नम्रता तर गेली पण माधुरी विचारात पडली. अमित आॅफिस मधून आला होता. माधुरीने स्वयंपाक केला पण तिच लक्ष्य काही लागत नव्हत. तिच्या मनांत तेच विचार येत होते. जेवणं आटपून माधुरीने सगळी कामं उरकुन घेतली. दोघेही झोपायला गेले. अमित लगेच झोपी गेला पण माधुरीला नम्रताच्या त्या बोलण्याने पडलेले ते अनेक प्रश्न झोपू देत नव्हते. “त्या लोकांनी त्यांच्या पहिल्या सुनेचा तर खून नसेल ना केला आणि मग ही दुसरी सुन केली, नाहीतर कोणी नातेवाईक !!!!” असे नानाविविध प्रश्न तिला पडत होते ती फक्त आता सकाळ होण्याची वाट पाहत होती म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिला नम्रता कडून मिळतील.
”माधुरी उठ आता... अगं बघ तर किती वाजले. मला उशिर होतोय.. उठ आता...” अमितने चहा टाकला आणि माधुरीला उठवले... विचारात कधी झोप लागली माधुरीला कळलंच नाही. तिने पटकन तिचे आवरले आणि अमितचा नाश्ता आणि डबा बनवू लागली. तिला काहीतरी झालं आहे हे एव्हाना अमितच्या लक्षात आले होते. “माधुरी कायं झालं आहे? काही प्राॅब्लेम आहे का? तुला करमत नाही का इथे? “ अमितने तिला विचारले. “नाही. काही नाही. असचं .... “ अमितला सांगितलं तर त्याला काही हे पटणार नाही आणि उलट कशाला दुसर्याच्या चौकश्या म्हणून ती इतकच बोलली. अमित डबा घेऊन आॅफिस गेला. माधुरीचे विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हते. तिने नम्रतालाच विचारायचे ठरवले.
माधुरी तिच्या घरी आली तेव्हा नम्रताचा नवरा सचिन आॅफिसला निघाला होता.
”अगं नम्रता काल असं अर्धवट बोलून का निघून आलीस?” माधुरीने विचारले.
नम्रता तिच्या मुलांचे आवरत होती. त्यांना पण शाळेत जायचे होते.
”अगं सांग ना. “ माधुरी बोलतच होती.
नम्रताने मुलांना शाळेत पाठवले. तिला दोन मुले, ओजस मोठा तर धाकटी ओवी.
“अगं नम्रता सांग ना काय झालं आहे??” माधुरी बैचेन होऊन विचारत होती.
“बरं ऐक.” नम्रता सांगू लागली. “ आठ नऊ वर्षापुर्वीची गोष्ट आहे. तु राहतेस ना त्याच्या वरच्या मजल्यावर प्रधान कूटुंब राहायला आले होते. ते काका काकु त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा. मोठी मुलगी अनुजा तिचं पदवीच शिक्षण घेत होती. मधला मुलगा अर्णव बारावीला होता तर धाकटी अभा दहावीत होती. खुप कमी वेळात माझी त्यांच्याशी खूप चांगली ओळख झाली होती. इतकी की आम्ही एकत्र जेवण करायचो, एकत्र बाहेर फिरायला जाणे. अगदी ओजस इकडे कमी तिकडेच जास्त असायचा. त्यांची मोठी मुलगी अनुजा माझी बेस्ट फ्रेंड झाली. आम्ही दोघी खुप मजा करायचोत तेव्हा...
काही दिवसांनी अचानक त्यांच्याकडे त्यांची कोणीतरी नातेवाईकाची मुलगी सोनिया शिक्षणासाठी त्यांच्याकडे रहायला आली. ती तिथे तिच पदवीच शिक्षण पुर्ण करायला आली होती. अनुजा तिच पदव्युत्तर शिक्षण घेत होती.
सोनिया आल्यामुळे माझे आणि अनुजाच पहिल्यासारखं राहिल नाही. त्यात मला दिवस गेले आणि माझा दिवस येणार्या बाळामध्ये आणि घरच्या कामात जाऊ लागला. कधीतरी माझ आणि अनुजाच बोलणं होत असे. सोनिया आणि अनुजा एकत्र बाहेर जात असत. एकदा मी सोनियाला एका मुलाने काॅलनीपर्यंत सोडताना पाहिलं मला ते खटकल पण परत विचार केला हल्लीची मुलं खुप वेगळी आहेत. मित्र असेल म्हणून मी सोडुन दिले. पण नेहमी असचं होत असे मुलगा मात्र वेगळा असायचा. नंतर मी बाळंतपणासाठी माहेरी गेले. तिकडून आल्यावर कळले की सोनिया परत तिच्या आई-बाबा कडे गेली आहे कायमची. “
“पण का? काय झालं असं? “, माधुरीने विचारले.
“हिच प्रश्नं मला देखील पडले होते.”, नम्रता म्हणाली.


क्रमश:

(तुम्हांला काय वाटतं काय झालं असेल. अभिप्राय अपेक्षित... कमेंट्स मध्ये नक्की सांगा)

1 

Share


अकल्पिता
Written by
अकल्पिता

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad