Bluepadआयुष्य जगतांना...
Bluepad

आयुष्य जगतांना...

S
Sachin Muley
2nd May, 2020

Share

आयुष्यात चाललेल्या घडामोडी ह्या कुठे तरी वेगळं वळण घेणार याची प्रचिती आपण आपल्या स्वत:ला देत असतो अगदी न चुकता.. जिवन जगत असतांना सुख-दु:खाचे खाच खळगे भरतच पुढे चालत जावं लागत असतं,
एखाद्या नदीप्रमाणे रस्ता काढत....
नदीचं काय तरी ती बिचारी शेवटी सागराला मिळून तिचं अस्तित्व संपूण घेणार आणि त्यामध्ये विलीन होऊन कायमची त्याची होणार...

मनुष्याचं तरी काय हो शेवटी राखचं पण ती होण्याआधी जगून घेणं देखील त्याला जमत नाही.. का तर त्याच्या जबाबदाऱ्या त्याला जगू देत नाही, ह्या जबाबदाऱ्या येतात तरी कुठून शेवटी एका हातुन दुसऱ्या हातीच आलेली असते ना..
ती कधी संपलेली आहे ना कधी संपेल
आयुष्य असंच जगायचं असतं कारण त्याची ना सुरूवात माहिती असते ना त्याचा शेवट त्यामुळे लेका
घे दिर्घ श्वास आणि सुट सुसाट..
आयुष्य हे कुणासाठी नि:स्वार्थ होऊन जगायचं असतं
तर कुणासाठी स्व:ताचं दु:ख लपवून हसायचं असतं
दु:ख आणि अश्रुंना मनात कोंडुन ठेवायचं असतं
हसता नाही आलं तरी हसवायचं मात्र असतं
जे घडेल ते सहन करायचं असतं
जग बदलतयं म्हणून आपण बदलायचं असतं
शेवटी काय तर नाव घेतील असं काहीतरी करायचं असतं
जगतांना कुठं तरी नाव कोरायचं असतं
मरणानं समोर येऊन जीव जरी मागीतला,
मागुन मागुन काय मागीतलं असं म्हणायचं असतं
मरताना मात्र हसतमुख मरायचं असतं
आयुष्याच्या श्वासाचं शेवटचं गाठोडं बांधताना
पाप-पुण्याचा हिशोब चुकता करायचा असतो
श्वास सोडीत शेवटचा जगाचा निरोप घ्यायचा असतो.....


6 

Share


S
Written by
Sachin Muley

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad