निरंतर उभा तू विटेवरी
परी आज सुनसान आहे पंढरी
व्याकूळ मन झाकता अंतरी
दिसे मज माझा सावळा हरी
रिंगण तू ..
टाळ-मृदंगही तू...
टिळ्यातलं चंदन तू...
तुळशीवृंदावन तू...
वारीही तू ..
वारकरी ही तू ..
शब्द तू..
निशब्द ही तू...
वारीतला प्रवासही तू ...
पंढरी ही तू ..
माय तू ..
बाप ही तू..
इच्छाही तू ..
पूर्णत्व ही तू..
कणाकणात तू ..
मनामनात तू..
आस तू ..
विश्वास तू ..
उमेद तू..
ध्यास ही तू..
भेट तू ..
आलिंगन ही तू ..
अश्रू तू ..
आनंद ही तू..
कधी खाकी परिधान करूनी उभा तू ड्युटी वरी
कधी पी पी ई घालुनी उपचार करी
कधी सीमेवर उभा राहुनी रक्षण करी
कधी होऊनी सफाई कर्मचारी
जगाला आता तूच तारी
🙏🙏🙏