Bluepadदेव माझा विठू सावळा
Bluepad

देव माझा विठू सावळा

Sangieta Devkar
Sangieta Devkar
1st Jul, 2020

Share

हॅलो दादा आबांची तब्येत पुन्हा बिघडली आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे . या वेळी जरा जास्तच तब्येत त्यांची डाऊन वाटते तू ये निघून लवकर घरी. अभिजित ला त्याच्या लहान भावाचा फोन आला होता. अभि नोकरी निम्मित मुंबईत राहत होता. त्याचे वडील आबा आता वृद्ध झाले होते त्यामुळे तब्येतीत सारखे चढउतार होत असत. काय झाले कोणाचा फोन होता? शिल्पा अभिला विचारत होती. अग गावाहून फोन होता आबांना अँडमीट केले आहे आपल्याला निघावे लागेल लवकर तू तयारी कर आपण निघुया. बर तुम्ही काळजी नका करू आपण जाऊया लगेच. आणि शिल्पा तयारीला लागली. त्यांच्याच कार ने ते मुलांना घेऊन गावी निघाले तसे पण आता मुंबईत कोरोना चा प्रसार वाढतच चालला होता त्या पेक्षा सर्वांनी गावी जाणेच ठीक होते. आता लॉकडाऊन थोडे शिथिल केले होते त्यामुळे गावी जाणे शक्य होत. अभि शिल्पा ला म्हणाला,गेल्या वर्षी पर्यंत आबा वारी ला नित्य नेमाने जात होते विठ्ठलाचे असीम भक्त ते. सगळे अभंग, आरत्या सगळं तोंडपाठ. ते अभंग ऐकतच आम्ही मोठे झालो . आणि आता या वर्षी बघ ना त्या कोरोना मुळे वारीच रद्द करावी लागली. इतक्या वर्षाची वारीची परंपरा खंडित झाली. हा ना सरकार चा पण नाईलाज आहे ना ओ. लोकांची सुरक्षा महत्वाची . हा पण आबाचे मन नक्की खात असेल बघ त्यांना हे पचनी पडणारच नाही की यंदा वारी जाणार नाही. वारकरी संप्रदायातले आबा हे कसे सहन करतील तो विठ्ठलच जाणे ! अभि आणि शिल्पा गावी पोहचले. कालच आबांना हॉस्पिटलमध्ये नेले होते. अभि पहिला आणि मोठा मुलगा म्हणून आबाचा खूप लाडका होता. शांत समंजस हुशार असा अभि कायम लहानपणापासून आबा सोबत देवळात कीर्तन,भजन ला आवर्जून जायचा आबांचा शब्द कधी त्याने मोडला नाही. आणि नोकरीला लागल्या नंतर अभि ने ही त्यांच्या सर्व इच्छा ,हौसमौज पूर्ण केली होती. अभिला काही त्यांनी सांगितले आणि ते त्याने ऐकले नाही असे कधीच झाले नाही.गेल्या वर्षी पासूनच जरा तब्येतीची तक्रार सुरू झाली तेव्हा आबांना बोलला होता अभि की यावर्षी वारी ला जाऊ नका.तर आबा म्हणाले नाही वारी काय मी मरे पर्यंत चुकवणार नाही. जे काही व्हायचे ते माझ्या विठ्ठलाच्या मर्जीने होईल पण मी जाणार वारीला. मग अभि ने एका इनोव्हा गाडी सोबत दिली त्यांच्या जितके पाय चालायला जमेल तितकच चाला बाकी मग गाडी ने प्रवास करा. स्वतःची काळजी घेणार असाल तर जा अन्यथा मी येईन सोडायला आणि न्यायला. तेव्हा आबा म्हणाले अरे वारकऱ्यांच्या सोबत टाळ मृदंगाच्या गजरात आणि मुखाने माऊली चा जयघोष करत जाण्यात जो आनंद आहे तो या त्रिभुवनात कुठेच नाही. पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे, वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे." ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला .अशी ही वारी पायी चालत जाऊन अनुभवायची म्हणजे साक्षात त्या विठ्ठलाशी एकरूप होणं आहे. अभिला हे सर्व आता आठवणत होते. अभि आणि शिल्पा फ्रेश होऊन हॉस्पिटल कडे निघाले. आबा डोळे मिटून बेडवर झोपले होते पण तोंडात नुसता विठ्ठलाच्या नावाचा जप सुरू होता. अभि त्यांच्या जवळ गेला म्हणाला,आबा कसे वाटते तुम्हाला? त्याचा आवाज ऐकून आबांनी डोळे उघडले, अभि तू आलास बरे झाले अरे मला वारी ला जायचं आता पुढच्या महिन्यात वारी निघणार . मागच्या वेळी सारखी गाडी दे मला सोबत. आबा आधी तुम्ही बरे व्हा मग बघू आपण वारीच काय ते. अरे मी बराच आहे मला काय होत नाही .काल जरा छातीत कळ आली बघ. बोलताना त्यांना दम लागत होता. आबा तुम्ही शान्त रहा बोलू नका त्रास होतोय तुम्हाला.मला कसला त्रास पोरा तो माझा विठोबा आहे की माझी काळजी घ्यायला! बर मी करतो सोय तुम्ही विश्रांती घ्या आता. मग थोडा वेळ अभि हॉस्पिटलमध्ये थांबला डॉकटरांना भेटला. मग घरी आला. आबांना मायनर हार्ट अटॅक आला होता . सत्तर वर्षा चे होते ते त्यामुळे तब्येत खालावली होती. चार दिवसांनी त्यांना घरी सोडले. पण काळजी घ्या असे डॉकटर बोलले होते. घरी आल्यावर आबाना फक्त वारी चे वेध लागले होते. तसा अभि म्हणाला, हे बघा आबा या वर्षी वारी पंढरपूर ला जाणार नाही . कोणीच वारकरी चालत वारी करणार नाही. तो आजार आला आहे ना कोरोना त्यामुळे सरकार ने सांगितले आहे की यंदा वारी जाणार नाही. असे कसे अभि इतक्या वर्षात कधी वारीत खंड नाही पडला आणि आता वारी जाणारच नाही म्हणतोस. होय आबा फक्त माऊलीच्या पादुका विमाना तुन नेणार आहेत पंढरपूरला. या वर्षी आषाढि एकादशी पण मोठ्या प्रमाणात साजरी नाही होणार.विठ्ठला काय आणि कसले हे कलयुग आले मला तू बोलवून घे पांडुरंगा,तुला न पाहता माझा प्राण पण नाही जायचा. वारी कशी चुकवू मी इटाक्या वर्षाची. आबा बोलतच राहिले. आणि मुखात त्या भंगवंतांचे अभंग सुरूच होते. अभि ची आई म्हणाली,अहो तुम्ही शांत झोपा तोंड बंद ठेवा. आहे तुमचा विठ्ठल तुमच्या जवळच. तो फक्त भक्तीचा भुकेला आहे. इथूनच त्याला तुमचा नमस्कार पोहचेल. पण आबा काही शान्त बसत नव्हते. अभि म्हणाला, आई असू दे त्यांना चैन नाही पडनार विठ्ठला शिवाय. मग रात्री अभि कडून आबांनी अभंग वाचून घेतले. मग त्यांना शांत झोप लागली. सकाळी सगळे जागे झाले आबा अजून झोपलेच होते. थोड्या वेळाने आबा उठले आणि त्यांनी अभि ला आवाज दिला म्हणाले,पोरा काय सांगतो तू अरे मी काल गेलो जाऊन आलो माझ्या विठ्ठला कडे ,त्याच ते सावळे साजिरे रूप डोळे भरून बघितलं. सगळे वारकरी होते दिंडी पताका,रिंगण सगळं केलं. अखंड ओव्या आरत्या म्हंटल्या. त्या पांडुरंगा ला बोललो मी काही झाले तरी तुझी वारी मी नाही चुकवणार. आलो बघ तुझ्या दर्शनाला. अभि तो बघ माझा विठ्ठल साक्षात माझ्या समोर मला त्याच्या कडे जाता येत नाही म्हणून तो स्वहता आला बघ मला न्यायला.. आणि आबांनी आपले हात जोडले बा विठ्ठला पांडुरंगा..आणि ते शान्त झाले. आबा आबा काय झाले तुम्ही स्वप्न पाहिले का आबा बोला अभि आबाना हलवून जागे करत होता पण आबा कधीच त्या आपल्या लाडक्या विठ्ठल सोबत अनंताच्या वारी ला निघून गेले होते. "देव भावाचा भुकेला, वैकुंठ सोडूनिया आला. पुंडलिक उभा केला,रूप सुंदर सावळा. धरियले कर कटी,सर्वांगी चंदनाची उटी. माळ गळा वैजयंती,दासी जनी ध्यान चित्ती.!! अभि ने ओळखले आई आबा गेले त्यांच्या लाडक्या विठ्ठलाला कडे. अगदी समाधानाने.

समाप्त....
19 

Share


Sangieta Devkar
Written by
Sangieta Devkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad