Bluepad | Bluepad
Bluepad
ती आणखी ही भीत आहे स्री जन्म घ्यायला...ती आणखी ही भीत आहे स्री जन्म घ्यायला...
M
Mahadev Padghan Patil
2nd May, 2020

Share

त्या काळोख रात्री ती एकटीच चालत होती शांत पावलानी रस्ता पार करत होती रस्ता वरच्या वाईट नजरा चुकवत चालली होती त्या भयान रात्री ती घरी कडे धाव घेत होती... काळोख चहूकडे पसरला चंद्र ही ढगाआड लपला त्या पवित्र देहावर लांडग्यांचा कलप टूटन पडला... आरडाओरडा सर्व तीने केला पण मात्र एक ही तीच्या मदतीला नाही धावला पाया पडते सोड दादा जाऊदे मला घरला माझा लहान भाऊ वाट बघत असेल त्याला घेऊन जायचाय खाऊ खायला... पाया पडून विनवणी ही केली राक्षस वृत्ती त्यांची एक ही नाही थांबला होत नव्हत सार काही ओरबाडल गिधाडांची औलाद ती इतकावरही नाही थांबली... त्या भयाण रात्री देह तीचा जाळला त्या काळोख रात्री तीच्या देहाचा उजेड पडला ती आज ही सांगत आहे ओरडत आहे ती आणखी ही भीत आहे स्री जन्म घ्यायला...
- महादेव पडघण

5 

Share


M
Written by
Mahadev Padghan Patil

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad