Bluepadआठवण
Bluepad

आठवण

मर्मस्पर्शी जीवन
मर्मस्पर्शी जीवन
30th Jun, 2020

Share


ओघ तिच्या येण्याचा काही केल्या थांबत नाही,
भान जाते हरपूनी काही केल्या उमगत नाही .
हाक मारे कोणी जेव्हा झोपेतुन जागा मी होई त्यावेळी समजले की ती फक्त आठवण होती.......

या लेखाची सुरुवात अशीच करण्यावाचून दुसरा पर्याय मला सापडला नाही. जीचे वर्णन करताना प्रत्येक जण हा हरवून जातो कळत न कळत भूतकाळाला जगू लागतो. ती ही कोणत्या मोहीनीपेक्षा कमी नाही ती आपल्याला मोहीत करते आणि डोळ्यात आसवाची मैफिल सजीवता तर कधी एकांतात हसवण्याची चेह-यावर आनंदाचे आणते . ती ही आठवण मानवाच्या ह्रदयपटलावर कोरून ठेवली गेलेली. असा कोणी ज्याच्याकडे आठवणीचा पेटारा नाही . लहान मोठ्या आकाराचा आठवणीचा हा संदूक सर्वाकडे असतोच. अगदी नवजात जन्मलेल्या बालका पासून ते मरणाच्या घटका मोजणा-या व्यक्ती पर्यंत हा आठवणीचा खजिना असतोच. आणि तो खजिना उलगडून सांगण्याचा सर्वस्व हक्क त्याच्या कडेच असतो ज्याचा तो खजिना आहे. आज अशीच एक आठवण घेवून मी आलो आहे व त्या आठवणीतून काही तरी शिकाल व बोध प्राप्त करताल आशी इच्छा ठेवतो...
सत्तर वर्षा वय असलेले एक अजोबा आज पहिल्यांदा आपल्या नातीला बागेत खेळायला घेवून जाणार आहे. मुलगा दुस-या शहरात राहत असल्यामुळे नातवंडासोबत वेळ कधी घालवता आलेला नाही . म्हणून अजोबा आपल्या नातीला विदिशाला घेवून निघाले. लहान गोंजीरवाणी ही विदिशा आपल्या अजोबाच्या हातात मऊ लुसलूशित हात देवून दोघेही बागेची वाट पायाखाली तुडवीत निघाले. चालत असताना अजोबा नाती सोबत गप्पा मारत मारत चालले होते. बोलत असताना अजोबा विदिशाला बोलले की, तुला आज मी एक गम्मंत दाखवणार आहे. हे ऐकू ती फार खुश होते. व आपल्या बालमनात विचारात रमली की मला काही खाऊ मिळणार असेल. हा विचार करत असतानाच ते दोघेही बागेत पोहचले. विदिशाला बागेत खेळायला सोडले व ती खेळ्यात दंग झाली....
इकडे अजोबा आपल्या मित्राजवळ येवून बसले व मित्र अजोबाशी बोलू लागला, आज उशीर केला येण्यास , तुझी वाट पाहत होतो बरं झालं तु आला नाहीतर आपली भेट झाली नसती . अजोबा बोलू लागले की आज उशिर होण्याच कारण पण विशेष आहे. आज माझ्या नातीला सोबत घेवून आलो आहे व तुझी ओळख करुन देणार आहे मी. मित्र हो ती पण माझ्या नातीच्या वयाची असेल. यात विदिशाने अजोबाला मोठ्याने आवाज दिला अजोबा लवकर एकडे या. अजोबा उठले व तिच्याकडे गेले व विचारु लागले काय झालं बाळा . विदिशा उत्तर देते थोड्या भेदरलेल्या आवाजात अजोबा लवकर घरी चला मला भीती वाटत आहे. खूप जोराचा वारा सुटला आहे हे ऐकून अजोबा लागलीच निघतात घाई गडबडीत मित्राला न भेटता व दोघे घरी पोहचतात . सोसाट्यावारा सुटतो थोड्या वेळात विजेसोबत पाऊस रात्र भर पडतो ......
दुसरा दिवस उजाडतो विदिशा सकाळ पासून अजोबांच्या मागे लागते की मला एक गंम्मत दाखवणार आहे . हो विदिशा तुला आज पुन्हा बागेत घेवून जाईल तेव्हा नक्की गंम्मत दाखवणार . विदिशा आनंदी होते सायंकाळची वेळ होते अजोबा पुन्हा तिला घेवून बागेत आले. ती परत बागेत मुक्तपणे खेळण्यात रमली . इकडे अजोबाची नजर त्याच्या मित्राला शोधू लागली . आज तो त्यांना दिसेना. अजोबा एक गृहस्थाना विचारतात की माझ्या मित्राला पाहिलं का ?? ते नाही बोलतात काल पाहिलं होत इथेच बसले होते ते. अजोबाच मन उदास होत आपण आपल्या नातीला सांगितलं आहे ती आज गंम्मत दाखवणार पण माझा मित्र मला दिसत नाही आहे तर आता काय करणार हा प्रश्न त्याच्या मनात फिरु लागला. तेवढ्यात विदिशा अजोबापाशी आली व विचारु लागली मला आज गंम्मत दाखवणार आहे ना तुम्ही अजोबा तीला हो बोलतात पण जरा थांब जरा बाळा. ऐवढ्या अजोबाना कोण तरी लांबून आवाच देतं व तो व्यक्ती अजोबांकडे येतो व बोलतो तुमच्या मित्राचा तुमच्यासाठी निरोप आहे . तो आता तुम्हांला कधी भेटू शकणार नाही . अजोबांना समजत नाही तो असं का बोलत आहे . त्यावर तो व्यक्ती बोलतो की तुमचा मित्र तुमची साथ सोडून निघून गेला आहे काल झालेल्या पावसात तो वादळाच्या कचाट्यात सापडला....
विचारात पडले असाल कदाचित नक्की तो मित्र कोण होता?? अजोबाच्या वडीलांनी असच एकदा ज्या ठिकाणी आता बागा आहे तिथे त्यांना घेवून आले व त्याच्या हातात एक गंम्मत दिली ती म्हणजे एक बीज आणि सांगितलं की हे या जमिनीत पेर व एक मोठ वृक्ष होई पर्यंत याची काळजी घे. अजोबानी इतक्या वर्ष हे केल पण जेव्हा नातीला पुढच्या पिढीला हा वारसा हाती देण्या आधीच तो खंडीत झाला . विदिशा समजले की अजोबा जसे आपल्या घराचे वटवृक्ष आहेत तसच या बागेचा आज आधार हरवला आहे. विदिशा अजोबांना म्हणते की अजोबा जसे या बागेच्या अजोबा ( वृक्षाची ) जागा दुसर कोण घेवू शकत नाही पण मी एक नविन बीज लावायला तयार आहे . हे बीज जेव्हा एका मोठ्या वृक्षात रुपांतरीत होईल तेव्हा मला तुमची आठवण येत राहील. की तुम्ही मला जी गंम्मत दाखवणार होते ती गंम्मत मी येणा-या पिढीला दाखवू शकेल .
आज आपल्याकडे पण अशा अनेक आठवणी आहेत. आजी अजोबाच्या तर असतीलचं. पण जेव्हा आपण त्याच्या वयाचे होवू तेव्हा एखादी आठवण तरी जीवंत असावी. हीच अपेक्षा करतो. लेख आवडला असेल तुमच्या प्रतिक्रिया ( comment ) टाळ्या, विविध मार्ग मधून मिळालेले अभिप्राय याच मला नविन नविन लेख लिहून तुमच्या समोर येण्यास उत्साहीत करतात. याबद्दल तुमचा आणि ब्लूपॅड मराठीचा आभारी आहे.

● लेखक :- शुभम ज्योती चव्हाण ● ©️

24 

Share


मर्मस्पर्शी जीवन
Written by
मर्मस्पर्शी जीवन

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad