Bluepad | Bluepad
Bluepad
🍂अतर्क्य शेवट🍂
गणेश भगवान बगमारे
गणेश भगवान बगमारे
30th Jun, 2020

Share


🍂अतर्क्य शेवट🍂
🍂 अतर्क्य शेवट 🍂

कालपर्यंत, हताश खचलेल्यांना
आत्महत्येपासून परावृत्त करणारा मी
त्यांना जगण्याची नवी प्रेरणा देणारा
आज तोच फास जवळ करतो आहे

आयुष्यात प्राप्त जे आजवर
ते केलय मी स्वबळावर
प्रस्थापितांमधे ओळख नवी
तीही स्वकर्तुत्वाचीच..
नको मला स्पर्धेतली असूया
अन नको ती पुरस्कारांची चिरिमिरी
हवा होता फक्त तो
अभिनयातला निर्भेळ आनंद

माझी स्वप्न अनेक,
त्यांवर मनापासून प्रेम केलं
त्यातल्या काहींना कवेत घेतलं
तर काही दूरच राहिली.
आली असती तीही जवळ
पण ती निकडच उरली नाही

पैसा-प्रसिद्धि,यश-कीर्ति सर्वच मिळवलं
पण अजूनही मी रिताच.....
ती एक सल सोबत घेऊन जगतोय
कित्येक दिवसांपासून
कसली ही अतृप्ति, घुसमट हा उणेपना
हा संघर्ष आंतरिक, गूढ भीतीने ग्रासलो आहे.

जरी म्हटलं झटकावं नैराश्य हे
बोलावं जवळच्या कुणाशी तरी
कदाचित आधार मिळेलही
पण तोही क्षणिक, पूर्वीसारखाच
अर्ध्यावरती सोडून जाणारा.

खूप काही करायचं होतं
समाजासाठी,माझ्या देशासाठी
पण मीच दुबळा, वंचित आज
पुढे चालण्या पायात त्राण नाही.

कुणी ही पळवाट म्हणेल
तर कुणी माझ्या दुःखाशी एकरूप होऊन समर्थनही करेल
कुणी सुन्न होईल, कुणाची नजर पाणावेल
तर कुणी नुसताच टर उडवेल
कुणासाठी असेल हे अचंबित अनाकलनीय
तर कुणी अंतर्मुख विचारात बुडेल
या क्षणी निःशब्द मी.....
हा विवेकाधिकार तुमचा

मी हे ठरवून कराव
हे धारिष्टय, हे साहस माझ्यात कुठून याव?
हे आकस्मिक सहज घडतय
की कुणा निमित्त, जबाबदार धराव ?
अनुत्तरित मी, तुमच्यासारखाच
तुम्हा अंतिम अभिवादन करतो आहे
आज काळाच्या मर्जीवर स्वार मी
हा अतर्क्य शेवट करतो आहे.

~ गणेश भगवान बगमारे ~
दि. २० जून २०२०

16 

Share


गणेश भगवान बगमारे
Written by
गणेश भगवान बगमारे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad