एक प्रश्न विचारला मनाला
आयुष्यात काय लावल पणाला
आळशी बनून दूर लोटत गेलो कष्टाला
अपयश आल्यावर दोष देत गेलो स्वतःला
भरपूर आदर्श लागलो वाचायला
पण विसरलो तस वागायला..
रंग नवनवीन जीवनाचे लागलो पहायला
पण विसरलो आयुष्यात रंग भरायला
कंटाळून शेवटी गेलो आयुष्य संपवायला
समोर आल्या नंतर आई वडिलांचा चेहेरा लागलो परतीला......
-पंकज बोरसे