Bluepadभूक नव्हे भक्ती.....अन्न या पूर्णब्रह्माची.
Bluepad

भूक नव्हे भक्ती.....अन्न या पूर्णब्रह्माची.

डॉ अमित.
डॉ अमित.
30th Jun, 2020

Share

भूक नव्हे भक्ती.....अन्न या पूर्णब्रह्माची."भुखे बच्चो की तसल्ली के लिये
माँ ने फिर पानी पकाया देर तक"

इतक्यातच या दोन ओळी वाचण्यात आल्या आणि अक्षरशः डोळे भरून आले.
मनातं खोलवरं कुठेतरी जाणवली भूक आणि गरिबी यांची दाहकता.
या दोन ओळी इतक्या अर्थपूर्ण आहेत की त्याच्या विश्लेषणाची यत्किंचितही आवश्यकता नाही.
हे इतकं प्रांजळ सत्य आहे की एखादी गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळाली तर त्याची किंमत माणसाला नसते.हा नियम सर्व ठिकाणी लागू पडतो.
मग ती एखादी वस्तू असो व्यक्ती असो अथवा पैसे.
जेंव्हा तुम्ही ती मिळवण्यासाठी जीवाचे रान केलेले असते,अपार कष्टाने ती मिळवलेली असते किंवा संघर्ष करून तिला प्राप्त केलेले असते तेंव्हा ती गोष्ट आपले जीव की प्राण असते.त्याची खरी किंमत आपल्याला उमगलेली असते.


अन्न हे पूर्णब्रह्म असे आपली भारतीय संस्कृती समजते.किती सुंदर उपमा आहे ही.
पण ही उपमा आपण आपल्या दैनंदिन जीवनात जगतो का?अन्नाचा आदर आपण करतो का?
थोड्या फार फरकाने प्रत्येकाच्या बाबतीत हा विचार लागू केला आणि त्याचे उत्तर शोधले तर खेदाने सांगावे वाटते की नाही...हेच उत्तर येते.
आज आपल्या देशात कितीतरी टन अन्न दररोज वाया जाते.ज्या देशात भूक बळी आणि गरिबीची संख्या इतकी असताना,आपला शेतीप्रधान देश असताना आपण या अन्नाची एवढी नासाडी करतो.
ही गोष्टच मनाला अक्षरशः टोचणी देते.

भूखे रहकर ही जानी हैं
हमने किमत तेरी असली
वरना कुछ निवाले तो हम
युंही छोड देते थे थाली मे

रोज सुद्धा आपण खरी भूक कुठे जाणवू देतो स्वतःला?थोड्या थोड्या वेळाने काही ना काही खाणे सुरूच ठेवतो.मग जेंव्हा जेवणाची वेळ येते तेंव्हा ती ओढ ते अन्नवराचे प्रेम, ती आत्मीयता थोडीच तितकी तीव्र राहते?यातूनच मग अन्नाची नासाडी होते.
त्यामुळे मला असे वाटते की सध्या डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांनी ५५ मिनिटांची जी दोन वेळा जेवणाची थेअरी सांगितली खरंच ती पूरक आणि प्रेरक आहे.
जी तुम्हाला खरी भूक आणि ती शमवणारे आपले अन्न हे पूर्णब्रह्म याची नकळत का होईना जाणीव करून देते.
असे सर्व होत असताना मात्र सध्या बऱ्याच अश्या संस्था पुढे येत आहेत ज्या अन्नाचे महत्त्व जाणून त्याला योग्य त्या गरजुंपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत आहेत.
काही तरुण तरुणी पुणे स्टेशन च्या परिसरात सर्व हॉटेल मध्ये उरलेले वाया जावू शकणारे अन्न एकत्र करून खऱ्या गरजवंत लोकांची भूक भागवत आहेत.खरोखर कौतुकास्पद आणि स्तुत्य उपक्रम आहे.असा उपक्रम सर्व गावांत आणि प्रत्येक समारंभाच्या ठिकाणी राबविला गेला पाहिजे.
याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे,स्वतःच्या घरापासून केली पाहिजे.
आपल्या मराठीत एक उपरोधात्मक म्हण आहे की माणसाने खाऊन माजावे पण टाकून माजू नये.तेंव्हा आपण प्रत्येकाने आज ही शपथ घेऊयात की मी आणि माझ्या परिवारातील एकही सदस्य अन्न वाया जाऊ देणार नाही.वाया जात असलेले अन्न योग्य त्या गरजुंपर्यंत पोहोचते करेन.

भूक हे दोन शब्दं नाहीत फक्त
गरज आहे पोटाची नि मानवतेची
एकेक कण वाचवू अन्नाचा आपणं
ठेवून जाणीव शेतकऱ्याच्या कष्टाची
हा फक्त एक सुंदर विचार नसून अश्या सुंदर विचारांची आपण सारे मिळून एक साखळी करूयात.
मी माझा हाथ त्यासाठी तुमच्या पुढे केलेला आहे तो तुम्ही हातात घ्यावा आणि ही साखळी अशीच वृद्धिंगत करावी.....ही प्रामाणिक इच्छा मी करतो.
आजपासून आपण घेणारा अन्नाचा प्रत्येक घास भक्तिभावाने घेऊ आणि अन्न वाया जावू न देण्याची भावना प्रत्येकाच्या मनात रुजवू.

कुछ सोचा हैं अच्छा आज
चलो इसे मिलके करे हम पुरा
आरजू हैं बस यही के अरमान ये
रह ना जाये ख्वाब बनके अधुरा


हा फक्त एक लेख नाही तर शब्दांतून उतरलेली मनातली तळमळ आणि काळाची गरज आहे.
जी तुम्ही मी आणि आपण सारे मिळून पूर्णत्वास नेऊ शकतो,हो की नाही?


डॉ अमित.18 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad