आज तुमची खुपचं आठवण येत आहे
बरोबर डोळयांना पण अश्रुंची साथ आहे
कधी नव्हे त्या या डोहाला भरती आली आहे
खंबीर उभा असलेला बांध आज वाहून जात आहे
झरझरणा-या त्या पाण्यात मन चिबं भिजतयं
गतकाळाच्या आठवणीत रमण्याचा प्रयत्न करतयं
खरंच वेगळं नात असतं प्रत्येक बाप लेकीचं
काळजाला घरं करतात ते शब्दात व्यक्त करणं
प्रत्येक पोरीला आपल्या बापाचा सार्थ अभिमान असतो
फाटलेल्या बनियन मध्ये, खुंटलेल्या सफेद दाढीतही तोच तिचा सुपर हिरो असतो
आई जवळची असते पण तो काळजाचा तुकडा असतो
अंधारात लखलखणा-या दिव्याचा तो प्रकाश असतो
अजून तुमची साथ असायला हवी होती
आतापेक्षा अजून छान जगायला उभारी मिळाली असती
मुलांना त्यांचे आजोबा आणि मला माझ्या बाबांची खरतर अजून संगत लाभली असती
तुम्ही असताना मला मी लहान असल्यासारखं
वाटायचं
स्वतःचे लाड करवून घेताना कृतार्थ झाल्यासारखं वाटायचं
आता उगीच मोठी झाल्यासारखं वाटतयं
सगळयाना समजून घेताना माझ्या नाकीनऊ येतयं
मला न बोलता समजून घेणारे तुम्ही एकमेव होता बाबा
जादूची कांडी फिरवून परत येता येईल का तेवढं प्लिज बघा........