Bluepadप्रित माझी सदाफुली...
Bluepad

प्रित माझी सदाफुली...

संदिपकुमार
संदिपकुमार
29th Jun, 2020

Share

आज अचानक...
तुझी आठवण झाली,
बागेत जेव्हां मी...
भटकंती केली.

नजर माझी...
तुझ्यावर पडली,
नाव तुझे...
सदाबहार सदाफुली.

आजही तू...
तशीच बहरली,
पाहून मला तू...
खुलुन हसली.

असेल कदाचित...
तू स्वतःशीच म्हणाली,
भेटावया मला...
किती वेळ लावली.

स्पर्श माझा होता तुला...
लाजून तू चुर झाली,
कळले आता मला...
अधीर किती तू झाली.

सखी माझी सदाफुली...
प्रेम रंगात रंगली,
भेटीने तुझ्या माझ्या...
प्रित अपुली फुलली.

येता घटिका...
निरोपाची,
न राहवूनही...
तू गहिवरली.
प्रित माझी
तुच सदाफुली...

लेखन:- संदिपकुमार
दिनांक:- 20/02/2020

10 

Share


संदिपकुमार
Written by
संदिपकुमार

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad