Bluepad | Bluepad
Bluepad


असावा तो आयुष्यात..
P
Pritam
29th Jun, 2020

Share

असावा तो आयुष्यात, मला complement करणारा माझ्या एका smile ने ही अगदी खळखळून हसणारा.
असावा तो आयुष्यात, माझ्यासाठी जगणारा ज्याला मी सांगेन दोन क्षण थांब आणि त्या क्षणांसाठीआयुष्यभर थांबणारा.
असावा तो आयुष्यात, माझं वर्णन करणारा जो मला म्हणेल, काजळ नाही घातलं तरी चालेल कारण इतकं प्रेम मी करेल,की तुझ्या डोळ्यात नेहमी मीच दिसेल.
असावा तो आयुष्यात, माझी आवड जपणारा दोघांच्या choice ची सांगड घालून, माझ्या lipstick वर त्याची tie मॅच करणारा.
असावा तो आयुष्यात, माझा प्रत्येक मूड समजून घेणारा कधी वाटरलेल्या डोळ्यांना घाबरणारा, तर कधी डोळे वटारून घाबरवणारा.
असावा तो आयुष्यात, माझ्यासाठी झुरणारा काही क्षणांची राधा बनवून, मिरेचा ही अधिकार मलाच देणारा. असा तो नक्कीच असावा माझ्या आयुष्यात.

12 

Share


P
Written by
Pritam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad